अॅमेझॉन नाऊचा भारतात महा-धमाका! ( सौजन्य - सोशल मीडिया )
सणासुदीच्या हंगामापूर्वी कंपनीने 10 आठवड्यांपेक्षा कमी वेळात अॅमेझॉन नाऊ चा विस्तार 4 पट अधिक शहरांमध्ये करून मिनिटांत डिलिव्हरी भारतातील 60 पेक्षा अधिक शहरे व गावांपर्यंत पोहोचवली आहे. मेट्रो शहरांव्यतिरिक्त, ही सेवा पदुबिद्री, तिरुपती, गुंटूर, गुरदासपूर, जालंधर, वेल्लोर, धारवाड, वारंगल आणि बरहामपूर यांसारख्या शहरांमधील ग्राहकांसाठीही उपलब्ध आहे. या ऑर्डर 750 पेक्षा अधिक मायक्रो-फुलफिलमेंट आणि अर्बन फुलफिलमेंट सेंटर्सच्या नेटवर्कद्वारे मिनिटांत डिलिव्हर केल्या जातात.
समीर कुमार, कंट्री मॅनेजर, अॅमेझॉन इंडिया,”अगदी कमी काळात, अॅमेझॉन नाऊ ने भारतात 1 बिलियन डॉलर वार्षिक एकूण विक्रीचा टप्पा ओलांडला आहे, ज्यामुळे ती अॅमेझॉन इंडियाच्या इतिहासातील सर्वात वेगाने वाढणारी ई-कॉमर्स बिझनेस युनिट बनली आहे. प्रत्येक तिमाहीत ऑर्डर दुप्पट होत असल्याने, ग्राहकांच्या या प्रतिसादाने आम्ही विनम्र झालो आहोत. आम्ही दिवाळीपर्यंत 100 शहरांपर्यंत विस्तार करण्याच्या मार्गावर आहोत आणि मिनिटांत डिलिव्हरी उत्तरेकडील गुरदासपूर व होशियारपूरपासून दक्षिणेकडील वेंबायम व अलमकोडपर्यंत नेत आहोत. या सणासुदीच्या हंगामात देशभरातील ग्राहक सर्वात वेगवान गतीने सर्वात विस्तृत निवडीच्या डिलिव्हरीची अपेक्षा करू शकतात.”
जून 2026 मध्ये, अॅमेझॉन ने अॅमेझॉन नाऊ चा विस्तार देशभरातील 300 पेक्षा अधिक शहरांतील ग्राहकांपर्यंत करून भारतातील सर्वात मोठे ‘डिलिव्हरी-इन-मिनिट्स’ नेटवर्क उभारण्याच्या योजनांची घोषणा केली होती. देशभरातील ग्राहकांना सेलर्सच्या उत्पादनांची सर्वात मोठी निवड त्यांना जेव्हा हवी तेव्हा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी आपल्या विशेष फुलफिलमेंट इन्फ्रास्ट्रक्चरचा विस्तार सतत करत आहे: हजारो उत्पादने मिनिटांत किंवा काही तासांत डिलिव्हर होतात, एक मिलियनपेक्षा अधिकची विस्तृत निवड त्याच दिवशी, चार मिलियनपेक्षा अधिक दुसऱ्या दिवशी आणि लाखो उत्पादने अमर्यादित, मोफत प्राइम डिलिव्हरीसह पोहोचतात.
अॅमेझॉन नाऊ वरील सेलर्स दैनंदिन गरजेच्या वस्तूंची विस्तृत निवड सादर करतात किराणा (फळे व भाज्या आणि फ्रोझन फूडसह), पर्सनल केअर, फॅशन व ब्युटी उत्पादनांपासून छोटी उपकरणे, होम व किचन उत्पादने आणि बरेच काही जे सर्व मिनिटांत डिलिव्हर केले जाते.






