Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Now ची भारतात प्रचंड क्रेझ! ऑर्डर झाल्या दुप्पट; १ बिलियन डॉलर विक्रीचा टप्पा ओलांडला

Amazon Now Record Sales : अ‍ॅमेझॉन इंडियाच्या अल्ट्रा-फास्ट डिलिव्हरी सेवा 'Amazon Now चे भारतात अवघ्या काही महिन्यांत १ बिलियन डॉलरच्या वार्षिक एकूण विक्रीचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. लॉन्च झाल्यापासून दर तिमाहीत ऑर्डर्स दुप्पट झाल्याने हा अ‍ॅमेझॉन इंडियाच्या इतिहासातील सर्वात वेगाने वाढणारा बिझनेस ठरला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 15, 2026 | 06:01 PM
अ‍ॅमेझॉन नाऊचा भारतात महा-धमाका! ( सौजन्य - सोशल मीडिया )

अ‍ॅमेझॉन नाऊचा भारतात महा-धमाका! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • अ‍ॅमेझॉन नाऊचा भारतात महा-धमाका!
  • १ बिलियन डॉलर विक्रीचा टप्पा ओलांडला
  • मिनिटांत डिलिव्हरीचा मोठा विस्तार
Amazon Now Record Sales : अ‍ॅमेझॉन ने आज जाहीर केले की त्यांच्या अल्ट्रा-फास्ट डिलिव्हरी सेवा अ‍ॅमेझॉन नाऊ ने गेल्या तीन महिन्यांत भारतात 1 बिलियन डॉलर वार्षिक एकूण विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. लॉन्च झाल्यापासून प्रत्येक तिमाहीत अ‍ॅमेझॉन नाऊ च्या ऑर्डर दुप्पट झाल्या आहेत, ज्यामुळे ती अ‍ॅमेझॉन इंडियाच्या इतिहासातील सर्वात वेगाने वाढणारी ई-कॉमर्स बिझनेस बनली आहे. ( Amazon Now Record Sales )

Best Home Loan Option : तुमच्यासाठी कोणता होम लोन सर्वोत्तम? फिक्स्ड, फ्लोटिंग की हाइब्रिड? कशात होईल सर्वात कमी EMI

अ‍ॅमेझॉन नाऊ चा विस्तार 4 पट अधिक शहरांमध्ये

सणासुदीच्या हंगामापूर्वी कंपनीने 10 आठवड्यांपेक्षा कमी वेळात अ‍ॅमेझॉन नाऊ चा विस्तार 4 पट अधिक शहरांमध्ये करून मिनिटांत डिलिव्हरी भारतातील 60 पेक्षा अधिक शहरे व गावांपर्यंत पोहोचवली आहे. मेट्रो शहरांव्यतिरिक्त, ही सेवा पदुबिद्री, तिरुपती, गुंटूर, गुरदासपूर, जालंधर, वेल्लोर, धारवाड, वारंगल आणि बरहामपूर यांसारख्या शहरांमधील ग्राहकांसाठीही उपलब्ध आहे. या ऑर्डर 750 पेक्षा अधिक मायक्रो-फुलफिलमेंट आणि अर्बन फुलफिलमेंट सेंटर्सच्या नेटवर्कद्वारे मिनिटांत डिलिव्हर केल्या जातात.

दिवाळीपर्यंत 100 शहरांपर्यंत विस्तार मार्गावर

समीर कुमार, कंट्री मॅनेजर, अ‍ॅमेझॉन इंडिया,”अगदी कमी काळात, अ‍ॅमेझॉन नाऊ ने भारतात 1 बिलियन डॉलर वार्षिक एकूण विक्रीचा टप्पा ओलांडला आहे, ज्यामुळे ती अ‍ॅमेझॉन इंडियाच्या इतिहासातील सर्वात वेगाने वाढणारी ई-कॉमर्स बिझनेस युनिट बनली आहे. प्रत्येक तिमाहीत ऑर्डर दुप्पट होत असल्याने, ग्राहकांच्या या प्रतिसादाने आम्ही विनम्र झालो आहोत. आम्ही दिवाळीपर्यंत 100 शहरांपर्यंत विस्तार करण्याच्या मार्गावर आहोत आणि मिनिटांत डिलिव्हरी उत्तरेकडील गुरदासपूर व होशियारपूरपासून दक्षिणेकडील वेंबायम व अलमकोडपर्यंत नेत आहोत. या सणासुदीच्या हंगामात देशभरातील ग्राहक सर्वात वेगवान गतीने सर्वात विस्तृत निवडीच्या डिलिव्हरीची अपेक्षा करू शकतात.”

एक मिलियनपेक्षा अधिकची विस्तृत निवड

जून 2026 मध्ये, अ‍ॅमेझॉन ने अ‍ॅमेझॉन नाऊ चा विस्तार देशभरातील 300 पेक्षा अधिक शहरांतील ग्राहकांपर्यंत करून भारतातील सर्वात मोठे ‘डिलिव्हरी-इन-मिनिट्स’ नेटवर्क उभारण्याच्या योजनांची घोषणा केली होती. देशभरातील ग्राहकांना सेलर्सच्या उत्पादनांची सर्वात मोठी निवड त्यांना जेव्हा हवी तेव्हा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी आपल्या विशेष फुलफिलमेंट इन्फ्रास्ट्रक्चरचा विस्तार सतत करत आहे: हजारो उत्पादने मिनिटांत किंवा काही तासांत डिलिव्हर होतात, एक मिलियनपेक्षा अधिकची विस्तृत निवड त्याच दिवशी, चार मिलियनपेक्षा अधिक दुसऱ्या दिवशी आणि लाखो उत्पादने अमर्यादित, मोफत प्राइम डिलिव्हरीसह पोहोचतात.

अ‍ॅमेझॉन नाऊ वरील सेलर्स दैनंदिन गरजेच्या वस्तूंची विस्तृत निवड सादर करतात किराणा (फळे व भाज्या आणि फ्रोझन फूडसह), पर्सनल केअर, फॅशन व ब्युटी उत्पादनांपासून छोटी उपकरणे, होम व किचन उत्पादने आणि बरेच काही जे सर्व मिनिटांत डिलिव्हर केले जाते.

Tata Group च्या गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले! RBI च्या एका निर्णयाने शेअर्स सुसाट; 20% चे अप्पर सर्किट

Web Title: Amazon now crosses 1 billion dollar annual sales in india expansion details marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • amazon
  • record sales

संबंधित बातम्या

Tata Motors Car Sales in August 2026: EV मार्केटमध्ये टाटाची ‘चौकार’ कामगिरी! दर चारपैकी एका कारवर टाटाचा शिक्का
1

Tata Motors Car Sales in August 2026: EV मार्केटमध्ये टाटाची ‘चौकार’ कामगिरी! दर चारपैकी एका कारवर टाटाचा शिक्का

पर्यावरणासाठी Amazon चे मोठे पाऊल! पुण्याच्या ‘NCL’ कॅम्पसमध्ये दरवर्षी १७८ दशलक्ष लिटर पाणी पुनर्भरण प्रकल्प
2

पर्यावरणासाठी Amazon चे मोठे पाऊल! पुण्याच्या ‘NCL’ कॅम्पसमध्ये दरवर्षी १७८ दशलक्ष लिटर पाणी पुनर्भरण प्रकल्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.