
फोटो सौजन्य सोशलमिडीया
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या इंडियन सायबरक्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) सोबत ‘स्कॅमस्मार्टइंडिया’ मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. ग्राहकांना फसवणूक ओळखण्यासोबतच त्याविरोधात तातडीने योग्य कृती करता यावी, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
या मोहिमेअंतर्गत दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि कोलकाता या प्रमुख शहरांमधील ॲमेझॉनच्या १० लाख डिलिव्हरी पॅकेजेसवर ऑनलाइन सुरक्षिततेविषयी जनजागृती करणारे संदेश दिले जात आहेत. सणासुदीच्या खरेदीदरम्यान ग्राहकांनी अधिक सतर्क राहावे आणि संशयास्पद संदेश किंवा पेमेंट लिंकपासून सावध राहावे, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
सायबर सुरक्षेसाठी ॲमेझॉनने आयआयटी दिल्लीच्या सहकार्याने ‘रक्षम नॅशनल एआय सायबरसिक्युरिटी हॅकेथॉन २०२६’ आयोजित केले. या स्पर्धेत जवळपास ५ हजार विद्यार्थी टीम्सनी सहभागासाठी नोंदणी केली. व्हॉईस क्लोनिंग, डीपफेक आणि ऑनलाइन घोटाळ्यांचे प्रकार ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाय विकसित करण्यावर भर देण्यात आला. २५ ऑक्टोबर रोजी अंतिम विजेत्यांची घोषणा करण्यात येणार होती.
X युजर्ससाठी Elon Musk चा मोठा प्लॅन! Like बटण दाबा अन् पाठवा $1 टिप… नव्या फीचरची सर्वत्रच चर्चा
ग्राहकांना ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार प्रत्यक्ष उदाहरणांमधून समजावेत यासाठी विशेष डिजिटल गेम सादर करण्यात आला आहे. यामध्ये बनावट डिलिव्हरी अलर्ट, खोट्या रिफंड विनंत्या आणि संशयास्पद पेमेंट लिंक्स ओळखण्याचे प्रशिक्षण दिले जाते. गृह मंत्रालयाच्या I4C चे संचालक निशांत कुमार यांनी सांगितले की, सायबर धोक्यांपासून बचावासाठी केवळ जागरूकता नव्हे, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणेही आवश्यक आहे.
ॲमेझॉन इंडियाचे व्हाइस प्रेसिडेंट (लीगल) राकेश बक्षी यांनी ग्राहकांचा विश्वास आणि सुरक्षा हे कंपनीचे प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. या मोहिमेद्वारे ग्राहकांना संशयास्पद व्यवहारांची पडताळणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाइन फसवणूक झाल्यास नागरिकांनी राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असेही सांगण्यात आले आहे.