Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Layoffs : Amazon चा दणका! 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी; गोदामे बंद करण्याचा इशारा, नेमकं घडतंय काय?

Amazon Layoffs : नवीन कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीवरून ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी ॲमेझॉन आणि सरकार/प्रशासन यांच्यात मोठा संघर्ष उभा राहिला आहे. कंपनीने तब्बल ५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी दिली असून आपली गोदामे बंद करण्याचा इशारा दिला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 20, 2026 | 04:02 PM
5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी ( सौजन्य - सोशल मीडिया )

5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Amazon चा दणका!
  • 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी
  • गोदामे बंद करण्याचा इशारा, नेमकं घडतंय काय?
Amazon Layoffs : एकीकडे IT क्षेत्रामध्ये नोकरकपाती संदर्भात खळबळ माजली असताना आता तेच वारं इतर क्षेत्रात उभं राहतंय का ? असा प्रश्न निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकतीच Amazon कंपनी 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनामध्ये बरीच खळबळजन्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. पण नेमका हा निर्णय का घेतला जात आहे? काय आहे परिस्थिती? सगळं प्रकरण काय सविस्तर जाणून घेऊयात. ( Amazon Layoffs ) 

Govt DA Hike : सरकारने घेतला मोठा निर्णय! ऑक्टोबरच्या पगारात वाढून मिळणार DA; ‘या’ तारखेपासून लागू होणार निर्णय

आज ऑनलाइन शॉपिंग लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्सपासून ते रोजच्या वापरातील घरगुती वस्तूंपर्यंत, लोक ॲमेझॉनसारख्या प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्यास प्राधान्य देतात. पण आता, अमेरिकेतील ॲमेझॉनच्या डिलिव्हरी सेवा संकटाचा सामना करत आहेत. कंपनीने इशारा दिला आहे की, जर न्यूयॉर्कमध्ये प्रस्तावित नवीन कामगार कायदा लागू झाला, तर ५,००० हून अधिक डिलिव्हरी ड्रायव्हर्सच्या नोकऱ्या जाऊ शकतात.

या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे. असेही म्हटले जात आहे की शहरातील १५ डिलिव्हरी केंद्रे बंद केली जातील. या निर्णयाचा परिणाम केवळ डिलिव्हरी कामगारांवरच नाही, तर हजारो वेअरहाऊस कामगारांच्या नोकऱ्यांवरही होऊ शकतो.

न्यूयॉर्कचा नवीन कामगार कायदा काय?

न्यूयॉर्कमधील प्रस्तावित ‘डिलिव्हरी प्रोटेक्शन ॲक्ट’नुसार, ॲमेझॉनला सध्या थर्ड-पार्टी कंपन्यांमार्फत काम करणाऱ्या हजारो डिलिव्हरी ड्रायव्हर्सना थेट कामावर ठेवण्यास भाग पाडले जाऊ शकते. या कायद्याचा मुख्य उद्देश डिलिव्हरी कामगारांच्या कामाच्या परिस्थितीत आणि हक्कांमध्ये सुधारणा करणे हा आहे.

ॲमेझॉन डिलिव्हरी सेंटर का बंद करू शकते?

ॲमेझॉनचे म्हणणे आहे की, नवीन कायद्यामुळे त्यांच्या डिलिव्हरी प्रणालीमध्ये मोठे बदल करण्यास भाग पाडले जाऊ शकते. याला प्रतिसाद म्हणून, कंपनी शहरातील आपली १५ लास्ट-माईल डिलिव्हरी केंद्रे बंद करू शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर तिला आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा लागला, तर ती न्यूयॉर्कमधील काही केंद्रे बंद करून आपले कामकाज इतर भागांमध्ये हलवू शकते. ही केंद्रे बंद केल्याने डिलिव्हरी ड्रायव्हर्स आणि सुमारे २,००० वेअरहाऊस कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.

ग्राहकांच्या खिशावरही परिणाम होणार?

जर ॲमेझॉनने न्यूयॉर्कमधील आपली डिलिव्हरी केंद्रे बंद केली, तर त्याचा परिणाम ग्राहकांवरही होऊ शकतो. कंपनीचे म्हणणे आहे की, शहरातील सध्याची केंद्रे बंद झाल्यामुळे डिलिव्हरीला जास्त वेळ लागू शकतो आणि वस्तूंच्या किमतीही वाढू शकतात.

Cheap Flight Ticket Scheme : स्वस्त विमान तिकीट हवंय? आता सरकार करणार मदत; फक्त लक्षात ठेवा ‘ही’ महत्त्वाची अट

💡

Frequently Asked Questions

  • Que: ॲमेझॉनने किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा इशारा दिला आहे?

    Ans: कंपनीने नवीन कामगार कायद्यांच्या चौकटीत काम करणे कठीण असल्याचे सांगत सुमारे ५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची आणि गोदामे बंद करण्याची धमकी दिली आहे.

  • Que: या वादाचे मुख्य कारण काय आहे?

    Ans: नवीन कामगार कायद्यांमधील कामाचे तास, कर्मचाऱ्यांचे वेतन, ओव्हरटाइम आणि सुरक्षेबाबतचे कडक नियम ई-कॉमर्स व्यवसायासाठी आव्हानात्मक ठरत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

  • Que: निर्णयाचा ॲमेझॉनच्या डिलिव्हरी आणि वेअरहाउस नेटवर्कवर काय परिणाम होऊ शकतो?

    Ans: जर ॲमेझॉनने गोदामे बंद केली, तर प्रादेशिक पातळीवरील डिलिव्हरी सेवेवर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि हजारो लॉजिस्टिक कामगारांचा रोजगार धोक्यात येऊ शकतो.

Web Title: Amazon threatens 5000 layoffs and warehouse closure over new labor laws marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • amazon
  • layoffs

संबंधित बातम्या

Netflix Biggest Layoffs : मोठा धक्का… नोकऱ्यांवर पुन्हा टांगती तलवार! नेटफ्लिक्स 6% कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
1

Netflix Biggest Layoffs : मोठा धक्का… नोकऱ्यांवर पुन्हा टांगती तलवार! नेटफ्लिक्स 6% कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.