Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Netflix Biggest Layoffs : मोठा धक्का… नोकऱ्यांवर पुन्हा टांगती तलवार! नेटफ्लिक्स 6% कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Netflix Biggest Layoffs : जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या ओटीटी जायंट नेटफ्लिक्सने आपल्या कंपनीच्या इतिहासामधील सर्वात मोठी कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयांतर्गत कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ६ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 15, 2026 | 10:01 AM
नोकऱ्यांवर पुन्हा टांगती तलवार! ( सौजन्य - सोशल मीडिया )

नोकऱ्यांवर पुन्हा टांगती तलवार! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • नोकऱ्यांवर पुन्हा टांगती तलवार!
  • नेटफ्लिक्सने घेतला मोठा निर्णय
  • 6% कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
Netflix Biggest Layoffs : IT क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा सिलसिला सुरुच आहे. गेल्या काही काळांपासून या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीची लाट दिसून येत आहे. आता हा वारा सगळ्याच क्षेत्रात घुसतोय का ? असा प्रश्न उभा राहिला आहे. कारण जगातील सर्वात मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने मोठा निर्णय घेतला आहे. नेटफ्लिक्सदेखील लवकरच कर्मचारी कपात करणार आहे. कंपनी आपल्या कर्मचारी संख्येत अंदाजे 6 % इतकी कमात करण्याची योजना आखत आहे. याचा तब्बल 1000 कर्मचाऱ्यांना फटका बसू शकतो. या कपाती मागे नेमकं काय आहे कारण? ( Netflix Biggest Layoffs ) 

Railway Bonus 2026: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ७८ दिवसांचा बोनस मंजूर; कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या…

२०२२ नंतरचा हा कर्मचारी कपातीचा सर्वात मोठा टप्पा आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या कर्मचारी कपातीचा सर्वात मोठा परिणाम प्रॉडक्ट, टेक्नॉलॉजी, लीगल आणि एचआर विभागांवर होईल. गेल्या वर्षाच्या अखेरीस नेटफ्लिक्समध्ये अंदाजे १६,००० कर्मचारी होते.

कर्मचाऱ्यांना याबाबत देण्यात आली माहिती

‘व्हेरायटी’नुसार, नेटफ्लिक्सचे को-सीईओ टेड सारँडोस आणि ग्रेग पीटर्स यांनी कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत स्पष्ट केलंय की, कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय कंपनीसाठी सोपा नाहीये. या स्थित्यंतराच्या काळात कंपनी कामावरून कमी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देईल.

दोन्ही अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, नेटफ्लिक्सचा व्यवसाय मजबूत आहे आणि कंपनी या वर्षासाठीची आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहे. कंपनी अशा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करत राहील, ज्यामुळे व्यवसायाच्या वाढीस आणि सेवांमध्ये सुधारणा करण्यास मदत होईल.

कर्मचारी कपातीचा निर्णय का?

नेटफ्लिक्सचा व्हयुवर गट मोठा असला तरीही त्याला मोठी स्पर्धा आहे. यूट्यूब आणि टिकटॉकसारख्या प्लॅटफॉर्मकडून तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. या प्लॅटफॉर्मवर बराचसा कंटेंट विनामूल्य उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रेक्षक थेट या विभागांकडे ओढले जातात आणि त्यांचा बराचसा वेळ या विभागला जातो. यामुळे नेटफ्लिक्ससाठी आपल्या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना टिकवून ठेवणे आव्हानात्मक बनले आहे. कंपनीला आता केवळ सबस्क्रिप्शनच्या कमाईवर अवलंबून राहायचे नाही. तर त्यांची यासाठी वेगवेगळी स्ट्रॅटर्जी आहे. कंपनी जाहिरात, लाइव्ह प्रोग्रामिंग आणि गेमिंग यांसारख्या क्षेत्रांमध्येही आपला व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी प्रयत्नदेखील सुरु आहे.

२०२२ मध्ये झाली होती कर्मचारी कपात

नेटफ्लिक्सने यापूर्वी २०२२ मध्ये कर्मचारी कपात केली होती. त्यावेळी घेतलेल्या निर्णयात अंदाजे ४५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. तेव्हापासून झालेली ही सर्वात मोठी कपात आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे जागतिक तंत्रज्ञान आणि मनोरंजन क्षेत्रातील रोजगाराच्या चिंतेत वाढ होऊ शकते. त्यामुळे कर्मचारी कपाताची झळ आणि इतर क्षेत्रांनाही बसते आहे का अशी चिंता प्रत्येक वर्गातील कर्मचाऱ्यांना लागून राहिली आहे.

Amazon News : महाराष्ट्रात अमेझॉन बाजाराची तिप्पट झेप; पुणे ठरले प्रमुख शहर, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२६ ची ऐतिहासिक सुरुवात

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेटफ्लिक्स कर्मचारी कपातीत किती कर्मचाऱ्यांना फटका?

    Ans: तब्बल 1000 कर्मचाऱ्यांना फटका बसू शकतो.

  • Que: कर्मचारी कपातीचा निर्णय का?

    Ans: नेटफ्लिक्स समोर वेगवेगळी आव्हानं आहे. त्यावर मात करण्यासाठी वेगवेगळी स्ट्रॅटर्जी वापरली जात आहे.

  • Que: यापूर्वी कधी झाली होती कर्मचारी कपात?

    Ans: 2022 मध्ये कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता.

Web Title: Netflix announces biggest layoffs in history cutting 6 percent employees marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • layoffs
  • Netflix
  • Netflix India

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.