60 वर्षांचे झालेत अमित शाह, वाचा... कितीये त्यांची संपत्ती? कोणत्या कंपन्यांमध्ये शेअर्स आहेत?
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा आज वाढदिवस आहे. ते आज 60 वर्षांचे झाले आहे. अमित शहा गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. अमित शहा हे केवळ राजकारणाचे चाणक्य मानले जात नाहीत. तर ते शेअर बाजाराचेही चाहता आहे. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे ते मालक आहेत. अमित शाह यांच्या एकूण संपत्तीचा मोठा हिस्सा त्यांनी शेअर बाजारात गुंतवला आहे. त्यांनी अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे.
कितीये अमित शहा यांची संपत्ती
याच पार्श्वभुमीवर आज आपण त्यांची एकूण संपत्ती किती आहे. त्यांनी कोणकोणत्या कंपन्यांमध्ये आपली रक्कम गुंतवली आहे. याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना अमित शहा यांनी आपल्या संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली होती. त्या प्रतिज्ञापत्रानुसार, अमित शहा आणि त्यांची पत्नी सोनल शाह यांच्याकडे एकूण 65.67 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
एकट्या अमित शाह यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ती 36 कोटींहून अधिक आहे. त्यांच्याकडे 20.23 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 16 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. प्रतिज्ञापत्रामध्ये रोख रक्कम, बँकेतील बचत, ठेवी, सोने, चांदी आणि वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेचा तपशील देण्यात आला आहे. त्याच्याकडे स्वतःचे कोणतेही वाहन नाही.
शेअर मार्केटमध्ये केलीये मोठी गुंतवणूक
अमित शहा यांनी शेअर मार्केटमध्ये भरपूर पैसा गुंतवला आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार अमित शाह यांच्याकडे 17 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स आहेत. त्यांनी 179 सूचीबद्ध कंपन्यांच्या आणि 79 अनलिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर, एमआरएफ, कोलगेट-पामोलिव्ह इत्यादी कंपन्यांमध्ये त्याचे शेअर्स आहेत.
कोणत्या कंपनीत सर्वाधिक गुंतवणूक
अमित शहा यांनी अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र, त्यांनी सर्वाधिक गुंतवणूक ही हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये केली आहे. त्यात सुमारे दीड कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यांनी ITC, Infosys, Nerolac Paints इत्यादी कंपन्यांच्या शेअर्समध्येही गुंतवणूक केली आहे.
हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअर्सची स्थिती कशी आहे?
अमित शहा यांनी हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. सध्या त्याच्या शेअरची किंमत सुमारे 2703 रुपये आहे. गेल्या एका महिन्यात यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 11 टक्के नुकसान झाले आहे. जर आपण एका वर्षाबद्दल बोलायचे झाले तर एक वर्षाच्या कालावधीत या शेअरने सुमारे 9 टक्के वाढ नोंदवली झाली आहे. तर 5 वर्षात या शेअरने जवळपास 26 टक्के परतावा दिला आहे.