Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AM/NS India ची ऐतिहासिक कामगिरी! जगातील सर्वाधिक मजबुतीचे वेल्डेड पाइप्स तयार करणारी ठरली पहिली स्टील कंपनी

AM/NS India ने एपीआय 5एल एक्स 100 समतुल्य सर्वाधिक मजबुतीचे वेल्डेड पाइप्स तयार करत जागतिक स्टील उद्योगात मोठी कामगिरी नोंदवली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 26, 2026 | 08:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया (AM/NS India) ने जागतिक स्टील उद्योगात महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवत एपीआय 5एल एक्स 100 समतुल्य सर्वाधिक मजबुतीचे वेल्डेड पाइप्स तयार करणारी जगातील पहिली स्टील कंपनी होण्याचा मान मिळवला आहे. समुद्री अभियांत्रिकी आणि ऑफशोअर प्रकल्पांसाठी वापरल्या जाणाऱ्या या ईक्यू 70 ग्रेड पाइप्सना अमेरिकन ब्युरो ऑफ शिपिंग (ABS) कडून अधिकृत प्रमाणनही मिळाले आहे. हे प्रमाणपत्र जागतिक दर्जाच्या मजबुती, सुरक्षितता आणि सागरी मानकांचे पालन झाल्याची स्वतंत्र खात्री देते.

Rupee Falling: ‘रुपया कमजोर होऊ देणं RBI चा योग्य निर्णय!’ प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अहलुवालिया यांचं धक्कादायक विधान?

या यशामुळे ऑफशोअर अभियांत्रिकी क्षेत्रात भारताने नवा मानदंड प्रस्थापित केला असून, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत’ अभियानांना मोठे बळ मिळाले आहे. आतापर्यंत तेल आणि वायू प्रकल्प, ऑफशोअर विंड स्ट्रक्चर्स आणि खोल समुद्रातील पाइपलाइनसाठी लागणारे उच्च मजबुतीचे पाइप्स प्रामुख्याने युरोपमधून आयात केले जात होते. मात्र आता देशांतर्गत उत्पादनामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार असून, ग्राहकांना कमी वेळेत आणि अधिक किफायतशीर दरात पाइप्स उपलब्ध होणार आहेत.

AM/NS India च्या या प्रगतीमागे मूळ कंपन्या आर्सेलरमित्तल आणि निप्पॉन स्टील यांचे जागतिक तांत्रिक कौशल्य, संशोधन-विकास क्षमता आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. “Smarter Steels, Brighter Futures” या कंपनीच्या ध्येयाशी सुसंगत असलेली ही कामगिरी भारतातील स्टील उद्योगाला अधिक सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवणारी ठरत आहे.

कंपनीने गुजरातमधील हजीरा प्रकल्पात सबमर्ज्ड आर्क वेल्डिंग (SAW) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ABS EQ70 ग्रेड प्लेट्सपासून या पाइप्सची निर्मिती केली आहे. अत्यंत उच्च मजबुती आणि टिकाऊपणा राखत तयार करण्यात आलेले हे पाइप्स कठीण सागरी वातावरणातही सुरक्षित आणि विश्वासार्ह ठरणार आहेत. त्यांच्या उच्च यिल्ड स्ट्रेंथमुळे हलक्या आणि पातळ पाइप्सचा वापर शक्य होत असून, संरचनात्मक सुरक्षितताही कायम राहते.

ईक्यू 70 ग्रेड हा अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट (API) 5L X100Q समतुल्य उच्च मजबुतीचा स्टील ग्रेड असून, त्याची किमान यिल्ड स्ट्रेंथ 690 मेगापास्कल (MPA) आहे. हे पाइप्स जॅक-अप रिग्स, ऑफशोअर लेग ब्रेसींग आणि खोल समुद्रातील पाइपलाइनसारख्या कठीण प्रकल्पांसाठी उपयुक्त मानले जातात. कंपनीने देशातील अग्रगण्य तेल आणि वायू उत्पादक संस्थेला मोठ्या प्रमाणावर या वेल्डेड पाइप्सचा पुरवठाही सुरू केला आहे.

Maruti Suzuki चा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा लागू केले ‘वर्क फ्रॉम होम’, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर उचलले पाऊल

ABS प्रमाणनामुळे या उत्पादनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑफशोअर आणि सागरी प्रकल्पांमध्ये वापरासाठी अधिकृत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे भारतीय स्टील उद्योगासाठी ही कामगिरी महत्त्वाचा टप्पा मानली जात असून, भारताच्या उच्च मूल्यसाखळी उत्पादन क्षमतेला नवी दिशा मिळणार आहे.

Web Title: Amns india becomes the first steel company in the world to manufacture the strongest welded pipes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 08:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.