
एटीएमधारकांनो 'या' बँकेच्या ATM ट्रान्झॅक्शनवर लागणार शुल्क
एसबीआयने स्पष्ट केले आहे की, हा नियम बँकेच्या सर्व खातेदारांना लागू होणार नाही. हा बदल प्रामुख्याने बँकेच्या शाखांद्वारे उघडण्यात आलेल्या Basic Savings Bank Deposit (BSBD) म्हणजेच बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट खात्यांशी संबंधित ग्राहकांसाठी लागू करण्यात आला आहे. एसबीआयच्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर 2026 नंतरही BSBD खातेदारांना दरमहा ठराविक मर्यादेत मोफत पैसे काढण्याची सोय कायम राहील.
महिन्यातून एकूण 4 वेळा (एटीएम किंवा बँक शाखेतून) पैसे काढणे पूर्णपणे मोफत असेल. 4 वेळा मोफत मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त रोख व्यवहारावर 15 रुपये शुल्क आकारले जाईल. या 15 रुपयांच्या शुल्कासोबतच ग्राहकाला लागू असणारा जीएसटी (GST) देखील अतिरिक्त भरावा लागेल.
एसबीआयच्या ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे या बदललेल्या नियमांचा डिजिटल व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहक आधीप्रमाणेच यूपीआय (UPI), नेट बँकिंग किंवा डिजिटल पेमेंटद्वारे कितीही वेळा मोफत व्यवहार करू शकतात. त्यावर कोणतीही मर्यादा किंवा अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
बँकेने आधार सक्षम पेमेंट सिस्टीम म्हणजेच AePS (Aadhaar Enabled Payment System) द्वारे होणाऱ्या व्यवहारांच्या नियमांमध्येही मोठा बदल केला आहे. आधी AePS द्वारे केलेल्या कॅश व्यवहारांना डिजिटल व्यवहार मानले जायचे आणि त्यांना 4 मोफत व्यवहारांच्या मर्यादेत धरले जात नव्हते. मात्र, आता बँकेने ही सूट काढून घेतली आहे. म्हणजेच AePS द्वारे काढलेली रोख रक्कमही आता महिन्यातून मिळणाऱ्या 4 मोफत व्यवहारांच्या मर्यादेतच मोजली जाणार आहे.
Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
यापूर्वी एसबीआयने ऑगस्ट महिन्यात 3 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या बल्क फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजाचे दर 15 ऑगस्टपासून सुधारित केले होते. याशिवाय, चालू आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) बँकेचा निव्वळ नफा (Net Profit) 10.23% ने वाढून 21,121 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 19,160 कोटी रुपये होता.