Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chess Tournament : इवान दुबेची सातही डावांत शंभर नंबरी कामगिरी

Chess Tournament : एसबीआय लाइफ महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत इवान दुबेने सातही डाव जिंकत शंभर टक्के गुणांची कमाई केली. सहा गटांत सहा विजेते; अव्वल दोन खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 06, 2026 | 07:24 PM
Chess Tournament : इवान दुबेची सातही डावांत शंभर नंबरी कामगिरी

Chess Tournament : इवान दुबेची सातही डावांत शंभर नंबरी कामगिरी

Follow Us
Follow Us:
  • लिया, कौशिक, त्वेषा, संविदनेही पटकावले विजेतेपद
  • अव्वल दोघांना राष्ट्रीय स्पर्धेची संधी
  • स्पर्धेला उत्तुंग प्रतिसाद
Chess Tournament : एसबीआय लाइफ महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सहा गटांत सहा नवे विजेते मिळाले. इवान दुबे, लिया कृष्णन, कौशिक अजिंक्य रायते, त्वेषा आशिष जैन, संविद पासबोला आणि खनक पहारिया यांनी आपापल्या गटांत विजेतेपदावर नाव कोरले. यामध्ये इवान दुबेने सातही फेऱ्यांत विजय मिळवत सात गुणांची शंभर टक्के कमाई केली. स्पर्धेतील ही सर्वाधिक प्रभावी कामगिरी ठरली.

इंडियन चेस स्कूलच्या आयोजनाखाली दहिसर (पश्चिम) येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये ही फिडे मानांकित सात फेऱ्यांची स्पर्धा पार पडली. सात, अकरा आणि पंधरा वर्षांखालील खुल्या व मुलींच्या अशा सहा गटांत तब्बल 417 खेळाडूंनी सहभाग घेतला. अखेरच्या फेरीपर्यंत रंगलेली विजेतेपदाची चुरस आणि टायब्रेकची गणिते यामुळे स्पर्धेत चांगलीच रंगत निर्माण झाली.

इवान दुबेची सातही डावांत विजयाची घोडदौड

सात वर्षांखालील खुल्या गटात अग्रमानांकित इवान दुबेने सातही डाव जिंकत निर्विवाद विजेतेपद पटकावले. ब्रेनियाक्स इंटरनॅशनल स्कूलच्या इवानने सात गुणांसह अव्वल स्थान मिळवले. ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलचा युवांश निमजा सहा गुणांसह दुसरा, तर विबग्योर हायस्कूल, खारघरचा अद्विक वर्मा सहा गुणांसह टायब्रेकच्या आधारे तिसरा ठरला.

याच वयोगटातील मुलींच्या विभागात कानाकिया इंटरनॅशनल स्कूलची अग्रमानांकित लिया कृष्णन सहा गुणांसह विजेती ठरली. विटी इंटरनॅशनल स्कूलची एलेनॉर डिसोझा आणि नीरजा जाधव यांनी प्रत्येकी साडेपाच गुण मिळवत अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले.

IND vs NEP: आधी गोलंदाजांनी नेपाळला गुंडाळलं, मग आर्यवीर-लक्ष्यने मैदान गाजवलं; Team India चा एकतर्फी विजय

कौशिक आणि त्वेषाची अकरा वर्षांखालील गटात बाजी

अकरा वर्षांखालील खुल्या गटात एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, रहाटणीचा कौशिक अजिंक्य रायते याने साडेसहा गुणांसह विजेतेपद पटकावले. सीएनएम मुंबईचा अगस्त्य एन. कसाट आणि मॅट्रिक्स अकॅडमी स्कूलचा वीरेन रोहित बोरिचा यांनी प्रत्येकी सहा गुण मिळवत अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले.

मुलींच्या गटात ग्रीनलॉन्स हायस्कूलची अग्रमानांकित त्वेषा आशिष जैन हिनेही साडेसहा गुणांसह विजेतेपदाला गवसणी घातली. गुंदेचा एज्युकेशन अकॅडमीची आश्वी अंकित अग्रवाल सहा गुणांसह उपविजेती ठरली, तर आर. एन. पोदार स्कूलची सानामरी जॉन पॉल हिने पाच गुणांसह तिसरे स्थान मिळवले.

Andre Russell: T20 क्रिकेटचा किंग! आंद्रे रसेलचा ऐतिहासिक रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू

संविद आणि खनकची पंधरा वर्षांखालील गटात विजयी मोहोर

पंधरा वर्षांखालील खुल्या गटात हिरानंदानी फाउंडेशन इंटरनॅशनल स्कूलचा अग्रमानांकित संविद पासबोला याने सहा गुणांसह विजेतेपद मिळवले. सीएनएम स्कूल, विलेपार्लेचा एएफएम रायन मर्चंट आणि सेंट तेरेसा कॉन्व्हेंट हायस्कूलचा एएफएम तसीन रफिक तडवी यांनी प्रत्येकी साडेपाच गुणांसह अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले.

मुलींच्या विभागात नारायणा ई-टेक्नो स्कूल, अंधेरीची खनक पहारिया सहा गुणांसह विजेती ठरली. सीएनएम स्कूलची महुआ विघ्नेश देशपांडे साडेपाच गुणांसह दुसऱ्या, तर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालयाची प्रणिता भावा पाच गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिली.

अव्वल खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेची संधी

या स्पर्धेतील निकालाला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या नियमानुसार सहाही गटांतील पहिल्या दोन क्रमांकांच्या खेळाडूंना आगामी राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे राज्यस्तरीय विजेतेपदाबरोबरच राष्ट्रीय स्पर्धेचे तिकीट मिळवण्यासाठीही खेळाडूंमध्ये अखेरपर्यंत चुरस पाहायला मिळाली.

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी आंतरराष्ट्रीय पंच पी. बी. भिलारे आणि इंडियन चेस स्कूलचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक तसेच स्पर्धा संचालक प्रफुल झवेरी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकांच्या खेळाडूंना एसबीआय लाइफचे चषक देऊन गौरविण्यात आले. चौथ्या ते दहाव्या क्रमांकावरील खेळाडूंना पदके देण्यात आली. तसेच सहाही गटांतील पहिल्या दहा खेळाडूंना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. अशा प्रकारे एकूण सहा लाख रुपयांची बक्षीस रक्कम वितरित करण्यात आली.

मुख्य पंच आंतरराष्ट्रीय पंच पी. बी. भिलारे यांच्या देखरेखीखाली स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. स्पर्धेला प्रमुख प्रायोजक एसबीआय लाइफ आणि आयोजनस्थळ भागीदार रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल यांचे सहकार्य लाभले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद कोणी पटकावले?

    Ans: इवान दुबे, लिया कृष्णन, कौशिक अजिंक्य रायते, त्वेषा आशिष जैन, संविद पासबोला आणि खनक पहारिया यांनी सहा गटांत विजेतेपद मिळवले.

  • Que: इवान दुबेने किती गुण मिळवले?

    Ans: इवान दुबेने सातही फेऱ्यांत विजय मिळवत सात गुणांची शंभर टक्के कमाई केली.

  • Que: स्पर्धेत किती खेळाडूंनी सहभाग घेतला?

    Ans: या स्पर्धेत सात, अकरा आणि पंधरा वर्षांखालील खुल्या व मुलींच्या सहा गटांत एकूण 417 खेळाडूंनी सहभाग घेतला.

Web Title: Chess tournament ivan dubey wins all seven rounds maharashtra school rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • Chess Championship
  • Dahisar
  • SBI

संबंधित बातम्या

Chess Tournament : बुद्धिबळाच्या पटावर 17 खेळाडूंचा चौकार; चार फेऱ्यांनंतर संयुक्त आघाडी
1

Chess Tournament : बुद्धिबळाच्या पटावर 17 खेळाडूंचा चौकार; चार फेऱ्यांनंतर संयुक्त आघाडी

Chess Championship : राष्ट्रकुल पदकविजेत्या मायशाची विजयी चाल; राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धेत मानांकितांची सलामी
2

Chess Championship : राष्ट्रकुल पदकविजेत्या मायशाची विजयी चाल; राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धेत मानांकितांची सलामी

Chess Championship : महाराष्ट्रातील 800 युवा बुद्धिबळपटूंचा महासंग्राम! बुधवारपासून राज्य अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात
3

Chess Championship : महाराष्ट्रातील 800 युवा बुद्धिबळपटूंचा महासंग्राम! बुधवारपासून राज्य अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.