Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Credit Card Rule Change: कार्ड स्वाइप करण्याआधी सावध! 28 ऑगस्टपासून बदलणार क्रेडिट कार्डचे ‘हे’ ४ नियम

Credit Card Rule Change: बँकेने कार्डशी संबंधित शुल्क, पेमेंट आणि रिवॉर्ड्सच्या नियमांमध्ये बदल केले असून हे बदल २८ ऑगस्ट २०२६पासून लागू होणार आहेत. विशेषतः परदेशातील व्यवहार करणाऱ्या ग्राहकांवर याचा परिणाम होऊ शकतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 22, 2026 | 01:11 PM
Credit Card Rule Change: कार्ड स्वाइप करण्याआधी सावध! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Credit Card Rule Change: कार्ड स्वाइप करण्याआधी सावध! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

New Changes In Axis Bank Credit Card Services:  क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. ॲक्सिस बँकेकडून कार्डशी संबंधित काही शुल्क, पेमेंटची पद्धत आणि रिवॉर्ड्सच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. हे नवीन नियम २८ ऑगस्ट २०२६ पासून लागू होणार आहेत. त्यामुळे परदेशात कार्ड वापरणारे, बिल उशिरा भरणारे किंवा प्रत्येक महिन्याला पूर्ण रक्कम न भरता काही रक्कम आधीच भरावी लागणारा आहे.

नवीन नियमांमधील सर्वात महत्त्वाचा बदल परदेशातील व्यवहारांशी संबंधित आहे. परदेशात खरेदी करताना अनेकदा दुकानदार भारतीय रुपयांमध्ये बिल देण्याचा पर्याय देतात. यालाच डायनॅमिक करन्सी कन्व्हर्जन म्हणजेच DCC म्हटलं जातं. हा पर्याय सोपा वाटत असला तरी त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारलं जातं.

आतापर्यंत ॲक्सिस बँकेच्या कार्डवर अशा व्यवहारांसाठी १.५ टक्के मार्कअप आकारला जात होता. पण आता हाच दर तुम्हाला ३.५ टक्के करण्यात आला आहे. दरम्यान त्यावर GST वेगळा असेल. त्यामुळे परदेशात खरेदी करताना INR मध्ये पेमेंट करण्याचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना आधीपेक्षा जास्त खर्च करावा लागू शकतो. Credit Card Rule Change:

बिल उशिरा भरलं तर खिशाला फटका

क्रेडिट कार्डचं बिल वेळेत न भरल्यास लागणाऱ्या दंडाच्या रचनेतही बदल करण्यात आला आहे. थकीत रक्कम वाढत गेली की लेट फीही वाढणार आहे.

नवीन शुल्करचना अशी आहे:

  • ५०० पर्यंतची थकबाकी — कोणतीही लेट फी नाही
  • ५०१ ते ५,००० — ५००
  • ५,००१ ते १०,००० — ७५०
  • १०,००१ ते ५०,००० — १,२००
  • ५०,००० पेक्षा जास्त — १,३००
याचा साधा अर्थ असा की मोठं क्रेडिट कार्ड बिल बाकी ठेवलं आणि देय तारखेपर्यंत पेमेंट केलं नाही, तर ग्राहकाला अधिक रक्कम दंड म्हणून भरावी लागू शकते. त्यामुळे बिलाची तारीख लक्षात ठेवणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडे पैसे भरल्यावर आधी काय वजा होणार?

  • फक्त ‘मिनिमम ड्यू’ भरून उर्वरित रक्कम पुढच्या महिन्यासाठी ठेवण्याची सवय असलेल्या ग्राहकांनीही सावध राहण्याची गरज आहे.
  • ग्राहकाने काही रक्कम भरल्यानंतर ती थेट खरेदीच्या मूळ रकमेतून कमी केली जाणार नाही.
  • नवीन पद्धतीनुसार जमा केलेली रक्कम आधी बाकी असलेले शुल्क, व्याज आणि कर यासाठी वापरली जाईल.
  • EMI, नियमित खरेदी आणि शेवटी ATM मधून काढलेल्या रोख रकमेच्या मुद्दलाकडे ती रक्कम वळवली जाईल.
  • यामुळे केवळ किमान रक्कम भरून कार्ड वापरत राहणाऱ्या ग्राहकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
  • कॅश अॅडव्हान्सवर व्याजाचा भार जास्त असल्याने पूर्ण बिल न भरल्यास खर्च वाढण्याची शक्यता असते.
Sugar Price Hike: इथेनॉलमुळे वाढतेय साखरेची किंमत? सरकारने अखेर सांगितलं कारण, सामन्यांना माहीत हवेच

रिवॉर्ड पॉईंट्समध्येही बदल

क्रेडिट कार्ड वापरण्याचा मोठा फायदा म्हणून अनेक ग्राहक रिवॉर्ड पॉईंट्स आणि कॅशबॅककडे पाहतात. मात्र, काही व्यवहारांवर आता हे फायदे मिळणार नाहीत.

टोल, रोड फी आणि ब्रिज चार्ज यांसारख्या प्रवासाशी संबंधित काही पेमेंटवर रिवॉर्ड पॉईंट्स किंवा कॅशबॅक मिळणार नाही. त्याचप्रमाणे गिफ्ट कार्ड खरेदीलाही रिवॉर्डच्या गणनेतून बाहेर करण्यात आलं आहे.

RBI FD Rules 2026: FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI ने बदलले बँक डिपॉझिटचे नियम; 1 ऑक्टोबरपासून नवे नियम लागू

म्हणजेच कार्डवर खर्च केल्यावर प्रत्येक व्यवहारासाठी पॉईंट्स मिळतीलच, असं आता गृहीत धरता येणार नाही. त्यामुळे मोठी खरेदी करण्यापूर्वी त्या व्यवहाराला रिवॉर्ड लागू आहे की नाही, हे तपासणं फायद्याचं ठरेल.

Web Title: Axis bank credit card rules change new charges effective from august 28 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • axis bank
  • Business News
  • Credit Card Rules

संबंधित बातम्या

Sugar Price Hike: इथेनॉलमुळे वाढतेय साखरेची किंमत? सरकारने अखेर सांगितलं कारण, सामन्यांना माहीत हवेच
1

Sugar Price Hike: इथेनॉलमुळे वाढतेय साखरेची किंमत? सरकारने अखेर सांगितलं कारण, सामन्यांना माहीत हवेच

‘विकसित भारत @२०४७’ साठी मजबूत…’; Assocham च्या परिषदेत उद्योग जगतातील दिग्गजांचे प्रतिपादन
2

‘विकसित भारत @२०४७’ साठी मजबूत…’; Assocham च्या परिषदेत उद्योग जगतातील दिग्गजांचे प्रतिपादन

Sukanya Samriddhi: सरकारी योजनेची कमाल, 1200 रुपयांची गुंतवणूक पण व्याजात मिळणार तब्बल 4.74 लाख
3

Sukanya Samriddhi: सरकारी योजनेची कमाल, 1200 रुपयांची गुंतवणूक पण व्याजात मिळणार तब्बल 4.74 लाख

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण
4

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.