Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FICCI Executive Committee: राष्ट्रीय उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा ठसा; रवींद्र माणगावे यांची FICCI कार्यकारी समितीवर निवड

FICCI Executive Committee: महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासाठी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांची देशातील अग्रगण्य उद्योग संघटना FICCI च्या कार्यकारी समितीवर निवड झाली आहे. इंडस्ट्री कॉन्स्टिट्युएन्सीमधून त्यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 20, 2026 | 06:44 PM
राष्ट्रीय उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा ठसा; रवींद्र माणगावे यांची FICCI कार्यकारी समितीवर निवड

राष्ट्रीय उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा ठसा; रवींद्र माणगावे यांची FICCI कार्यकारी समितीवर निवड

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा ठसा
  • रवींद्र माणगावे यांची FICCI कार्यकारी समितीवर निवड
  • राष्ट्रीय स्तरावर उद्योजकांचे प्रश्न मांडणार
FICCI Executive Committee: महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासाठी अभिमानास्पद घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) चे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांची देशातील अग्रगण्य शिखर उद्योग संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) च्या कार्यकारी समितीवर निवड झाली आहे. कार्यकारी समितीच्या निवडणुकीत इंडस्ट्री कॉन्स्टिट्युएन्सीमधून त्यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या या निवडीमुळे महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.(FICCI Executive Committee)

FICCI ही देशातील महत्त्वाची उद्योग संघटना असून, उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील विविध प्रश्नांवर धोरणात्मक पातळीवर काम करते. सध्या ही संघटना आपल्या स्थापनेच्या शतकमहोत्सवी वाटचालीचा टप्पा साजरा करत आहे. अशा महत्त्वाच्या काळात महाराष्ट्रातील अनुभवी नेतृत्वाचा कार्यकारी समितीत समावेश होणे ही राज्याच्या औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाची बाब मानली जात आहे. रवींद्र माणगावे यांनी आतापर्यंत उद्योजकता विकास, औद्योगिक धोरणे आणि स्थानिक पातळीवर व्यवसाय उभारणीसाठी योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आल्याचे या निवडीवरून स्पष्ट होत आहे.

देशातील सर्वात मौल्यवान ब्रँड Airtel! 43.2 अब्ज डॉलरच्या मूल्यासह पटकावले अव्वल स्थान

राष्ट्रीय स्तरावर उद्योजकांचे प्रश्न मांडणार

आपल्या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना रवींद्र माणगावे म्हणाले की, उद्योग क्षेत्राने आपल्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली सर्वाधिक मते ही मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्रासह देशातील उद्योजकांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे मांडण्याचा आपला प्रयत्न राहील. तसेच सर्वसमावेशक औद्योगिक वाढ आणि ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘गाव तिथे उद्योजक’ उपक्रमाला मिळणार व्यापक व्यासपीठ

महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून रवींद्र माणगावे यांच्या कार्यकाळात ‘गाव तिथे उद्योजक’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जात आहे. या संकल्पनेचा मुख्य उद्देश गावागावांत स्थानिक उद्योजक घडवणे आणि ग्रामीण भागात व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण करणे हा आहे. आता FICCI च्या कार्यकारी समितीवरील निवडीमुळे या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर व्यापक व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण उद्योजकता, लघुउद्योग आणि स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग होऊ शकतो.

रवींद्र माणगावे यांच्या नव्या जबाबदारीमुळे महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Stock Market Holiday: गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील आठवड्यात सलग तीन दिवस शेअर बाजाराला सुट्टी

💡

Frequently Asked Questions

  • Que: रवींद्र माणगावे यांची कोणत्या समितीवर निवड झाली आहे?

    Ans: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांची फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) च्या कार्यकारी समितीवर निवड झाली आहे.

  • Que: रवींद्र माणगावे यांनी FICCI निवडणुकीत कोणत्या गटातून विजय मिळवला?

    Ans: त्यांनी FICCI च्या कार्यकारी समितीच्या निवडणुकीत इंडस्ट्री कॉन्स्टिट्युएन्सीमधून विजय मिळवला आहे.

  • Que: 'गाव तिथे उद्योजक' हा प्रकल्प काय आहे?

    Ans: महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून राबवला जाणारा 'गाव तिथे उद्योजक' हा उपक्रम ग्रामीण आणि स्थानिक पातळीवर नव्या उद्योजकांची निर्मिती करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.

Web Title: Ravindra mangave elected ficci executive committee maharashtra chamber president sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • Business News
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

Karjat Municipal Council: कर्जत नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचा बोजवारा! प्रकल्प बंद पडल्याने परिसरात दुर्गंधी
1

Karjat Municipal Council: कर्जत नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचा बोजवारा! प्रकल्प बंद पडल्याने परिसरात दुर्गंधी

जायकवाडी कालव्यात फेकलेल्या श्यामचाही मृतदेह सापडला; दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा
2

जायकवाडी कालव्यात फेकलेल्या श्यामचाही मृतदेह सापडला; दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा

सावंगी बायपासवरील लुटमारीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3

सावंगी बायपासवरील लुटमारीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Uttan Fishermen Attack: भर समुद्रात उत्तनच्या मच्छिमारांवर हल्ला; लाकडी दांडक्यांनी मारहाण, मासळी-जाळी लुटल्याचा आरोप!
4

Uttan Fishermen Attack: भर समुद्रात उत्तनच्या मच्छिमारांवर हल्ला; लाकडी दांडक्यांनी मारहाण, मासळी-जाळी लुटल्याचा आरोप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.