
MakeMyTrip Travel Sale: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
• ‘ट्रॅव्हल का मुहूर्त सेल’चे दुसरे पर्व १४ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू
• प्रवाशांना विमान, हॉटेल्स, होमस्टे, हॉलिडे पॅकेजेस, बस, रेल्वे, कॅब, टूर्स व आकर्षणे, फॉरेक्स आणि व्हिसा सेवा – या सगळ्यांचे नियोजन आणि बुकिंग एकाच प्लॅटफॉर्मवर करता येईल, तेही सर्व श्रेणींमध्ये खास ऑफर्ससह
• ब्रँड ॲम्बेसेडर आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची मुख्य भूमिका असलेल्या, ‘अब तो जाना पडेगा’ या टॅगलाइनवर आधारित सहा नवीन फिल्म्स
• MMTBLACK सदस्यांना १३ नोव्हेंबर २०२६ रोजी अर्ली ॲक्सेस, तसेच दर शुक्रवारी खास ब्लॅक फ्रायडे डील्स
गुरुग्राम, नोव्हेंबर २०२६: मेकमायट्रिपने आज जाहीर केले की, वर्षअखेरच्या सुट्ट्यांचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘ट्रॅव्हल का मुहूर्त सेल’चे दुसरे पर्व १४ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होत आहे. या सेलमध्ये ३०,०००+ देशांतर्गत आणि ३,५००+ आंतरराष्ट्रीय निवासस्थाने – हॉटेल चेन्स, रिसॉर्ट्स, स्वतंत्र हॉटेल्स, होमस्टे आणि व्हिला – तसेच ३५ देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या आणि ८ बँका भागीदार म्हणून सहभागी आहेत (११ नोव्हेंबर २०२६ पर्यंतच्या स्थितीनुसार). MakeMyTrip
वर्षअखेरीस प्रवास करायचा म्हटले की किमतींची चिंता मनात येतेच. डिसेंबरमध्ये दर वाढतील आणि पर्याय कमी उरतील, अशी भीती प्रवाशांना वाटते. ‘ट्रॅव्हल का मुहूर्त सेल’ त्यांना पुढचा विचार करून निश्चिंतपणे बुकिंग करण्यासाठी हक्काची बुकिंग विंडो देतो. विमान, हॉटेल्स, होमस्टे, हॉलिडे पॅकेजेस, बस, कॅब, रेल्वे, टूर्स व आकर्षणे, फॉरेक्स आणि व्हिसा सेवा या सर्व श्रेणींमध्ये यात ऑफर्स आहेत.
जवळच्या तसेच लांबच्या प्रवासांसाठीच्या ऑफर्सचा यात समावेश आहे. देशांतर्गत ठिकाणांमध्ये कूर्ग, अंदमान, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर, केरळ, राजस्थान, ईशान्य भारत आणि गोवा यांसारख्या पर्यटकांच्या आवडत्या स्थळांचा, तर आंतरराष्ट्रीय ठिकाणांमध्ये जपान, दुबई, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम, श्रीलंका, यूके आणि उर्वरित युरोपचा समावेश आहे. जगभरातील लोकप्रिय आकर्षणेही या मोहिमेत सहभागी झाली आहेत, जसे की Ferrari World (यूएई), Universal Studios (सिंगापूर), Madame Tussauds (सिंगापूर), Mandai Wildlife Group – Night Safari आणि Singapore Zoo (सिंगापूर), तसेच Sun World Ba Na Hills (व्हिएतनाम).
देशातील सर्वात मौल्यवान ब्रँड Airtel! 43.2 अब्ज डॉलरच्या मूल्यासह पटकावले अव्वल स्थान
राज ऋषी सिंग, मुख्य परिचालन अधिकारी – कॉर्पोरेट, फ्लाइट्स, GCC आणि मार्केटिंग, मेकमायट्रिप, म्हणाले, “भारतातील खरेदीदार सणासुदीच्या सेल्सची आतुरतेने वाट पाहतात, आणि आमचा विश्वास आहे की प्रवासालाही स्वतःचा एक नियोजनाचा हंगाम असायला हवा. या दुसऱ्या पर्वात, केवळ आणखी एक सेल न ठरता, भारतातील प्रवाशांना सुट्टीचा ‘विचार’ करण्यापासून प्रत्यक्ष ‘बुकिंग’ करण्यापर्यंत पोहोचण्याचा आत्मविश्वास देण्यावर आमचा भर आहे. ‘ट्रॅव्हल का मुहूर्त सेल’ हा कॅलेंडरमधील एक ठरलेला दिवस व्हावा, अशी आमची इच्छा आहे; त्या दिवशी प्रवाशांना माहीत असते की ते विविध बचतींसह आपल्या वर्षअखेरच्या सुट्टीचे नियोजन करू शकतात, आणि आमच्या भागीदारांना पीक सीझनमधील मागणीचा अंदाज, तयारी करता येईल इतक्या आधीच मिळतो.”
सेलची घोषणा करण्यासाठी मेकमायट्रिपने ब्रँड ॲम्बेसेडर आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची भूमिका असलेल्या सहा फिल्म्सची नवीन मोहीम सादर केली आहे. या मोहिमेत सेलच्या वेगवेगळ्या भागांवर प्रकाश टाकला आहे. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हॉटेल्स, व्हिला आणि अपार्टमेंट्स, हॉलिडे पॅकेजेस आणि आऊटस्टेशन कॅब्स. ही मोहीम क्रिएटिव्ह एजन्सी Talented यांनी संकल्पित केली आहे.
मेकमायट्रिपचा लॉयल्टी प्रोग्राम MMTBLACK च्या सदस्यांना १३ नोव्हेंबर रोजी सेलचा अर्ली ॲक्सेस मिळतो. दर शुक्रवारी ही मोहीम केवळ MMTBLACK सदस्यांसाठी ब्लॅक फ्रायडे डील्सही घेऊन येते, तर रोज संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत ‘लाइटनिंग ड्रॉप्स’मध्ये सर्व युजर्ससाठी मर्यादित साठ्यातील डील्स उपलब्ध होतात.
OneCircle हा हॉटेल्स आणि होमस्टेसाठीचा जागतिक रिवॉर्ड्स प्रोग्राम मेकमायट्रिपने यावर्षीच्या सुरुवातीला सुरू केला होता. सेलदरम्यान तो सदस्यांना त्यांच्या बुकिंग्सवर अतिरिक्त फायदा देतो.
• विमान कंपन्या: Air France, Air India, Air India Express, Akasa Air, British Airways, Etihad Airways, IndiGo, Lufthansa, Qatar Airways, Singapore Airlines, SWISS, Turkish Airlines, Virgin Atlantic इत्यादी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या.
• हॉटेल्स: Bloom Hotels, Club Mahindra, Ginger Hotels, GRT Hotels & Resorts, ITC Hotels, Kamat Hotels, Leisure Hotels Group, Lemon Tree Hotels, Lords Hotels & Resorts, Neemrana Hotels, Pride Hotels & Resorts, Roseate Hotels & Resorts, Royal Orchid Hotels, Sarovar Hotels & Resorts, Sayaji Hotels, Hotel Sonar Bangla, Sterling Holiday Resorts, Taj Hotels, The Leela Palaces, Hotels and Resorts, The Postcard Hotel, Wyndham Hotels & Resorts आणि इतर भारतीय व आंतरराष्ट्रीय हॉटेल चेन्स.
• होमस्टे, व्हिला आणि अपार्टमेंट्स: amã Stays & Trails, The Blue Kite, ELIVAAS, goSTOPS, The Hosteller, Lohono Stays, Moustache, SaffronStays, StayVista, Zostel इत्यादी.
• बँका: Axis Bank, DBS Bank, HDFC Bank, ICICI Bank, Kotak Mahindra Bank, Punjab National Bank, RBL Bank, YES Bank.
Ans: या सेलचे दुसरे पर्व १४ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू झाले आहे.
Ans: ३० हजारांहून अधिक देशांतर्गत आणि ३,५०० हून अधिक आंतरराष्ट्रीय निवासस्थाने सहभागी आहेत.
Ans: विमान तिकिटे, हॉटेल्स, होमस्टे, हॉलिडे पॅकेजेस, बस, रेल्वे, कॅब, टूर्स, आकर्षणे, फॉरेक्स आणि व्हिसा सेवांवर ऑफर्स आहेत.