
Ayushman Bharat Yojana
Ayushman Bharat Yojana: केंद्र सरकारने गरीब कुटुंबांसाठी आरोग्य संबधित मोठा निर्णय घेतला आहे. आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता लाखो कुटुंबांना आता 5 लाख नाहीतर 10 लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार मिळणार आहे. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेतून यापूर्वी प्रत्येक कुटुंबाला 5 लाखापर्यंत आरोग्य विमा मिळत होता. आता मात्र, काही कुटुंबांना 10 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा लाभ मिळण्याची तरतूद सरकारने केली आहे. जाणून घेऊया कोण घेऊ शकतं या योजनेचा लाभ?
भारत देशात वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागतात. यामध्ये आर्थिक समस्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारने आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली. या योजनेत नंतर काही बदलही करण्यात आले. आता तसाच बदल केंद्र सरकारने केला आहे. याआधी 5 लाखापर्यंत मदत मिळत होती आता ती 10 लाखांपर्यंत विमा देणार आहेत.
हेही वाचा : Apple Layoffs: iPhone बनविणाऱ्या Apple कंपनीमध्ये डझनभर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले, सेल्स टीमवर परिणाम
आयुष्मान भारत योजना
केंद्र सरकारची आरोग्य विमा योजना असून यामुळे गरीब कुटुंबांना वैद्यकीय निगडीत बाबींमध्ये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ही योजना प्रत्येक कुटुंबाला गंभीर आजारांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देणार आहे. देशात जारो रुग्णालये या योजनेद्वारे कॅशलेस आणि पेपरलेस सेवा देत असून यामुळे अनेक रुग्णांना फायदा झाला आहे. या योजनेत सर्व आजारांबाबत उपचार घेताना पहिल्या दिवसापासून त्याची आर्थिक दखल घेतली जाते.
आयुष्मान भारत योजनेत कुटुंबातील मुख्य लाभार्थी व पात्र कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये पती-पत्नी सह मुलं, आई-वडील तसेच, आजी आजोबा यांचा ही समावेश आहे.
गेल्या वर्षी केंद्र सरकारनं 70 वर्षांपेक्षा जास्त वयस्कर नागरिकांसाठी 5 लाख रुपयांचं विमा जाहीर केला असल्याने उर्वरित अतिरिक्त रक्कम अन्य गरज असलेल्या कुटुंबातील सदस्यासाठी राखीव आहे. कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीचं वय 70 वर्षांपेक्षा जास्त असावं आणि ज्याची आधार कार्डवर देखील नोंद असावी.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आरोग्य महत्त्वाचा भाग आहे. अचानक आजारपण आल्यास उपचाराचा खर्च करणं कुटुंबासाठी अडचणीच ठरू शकत. मात्र या योजनेमुळे आर्थिक अडचण निर्माण होणार नाही. केंद्र सरकारनं विविध योजनांचं एकत्रीकरण करत आरोग्य विमा जे घेऊ शकत नाहीत ते प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतात, अशी सोय केली आहे. महाराष्ट्रातील महात्मा फुले जनआरोग्य योजना देखील त्यासोबत संलग्न केली आहे.