डोंबिवली-कल्याणकरांसाठी मोठी खुशखबर! एमएमआरडीएकडून ३६ कोटींची निविदा जाहीर (photo-social media)
MMRDA: डोंबिवलीतील ठाणे-ठाकुर्ली उन्नत उड्डाणपूल प्रकल्प गेल्या सात वर्षांपासून रखडलेला होता. आता लवकरच या उन्नत मार्गाच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरू होणार आहे. यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाकुर्ली रेल्वे गेट ते म्हसोबा चौक या उड्डाणपुलाचा उर्वरित भाग पूर्ण करण्यासाठी ३६ कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण आणि डोंबिवलीला जोडणारा पर्यायी समांतर मार्ग पूर्णपणे कार्यरत होईल. त्यामुळे ठाकुर्लीतील गर्दीच्या अंतर्गत रस्त्यांपेक्षा जलद आणि अधिक सुरळीत प्रवास शक्य होणार आहे.
हेही वाचा : Donald Trump: ट्रम्पचं आर्थिक साम्राज्य धुळीस! बिटकॉईन क्रॅशने 9,800 कोटींचा फटका
सुमारे ६० बाधित कुटुंबांना भरपाई जाहीर या प्रकल्पात बधित होणाऱ्या संतनगर आणि म्हसोबा नगरातील रहिवाशांना न्याय मिळणार आहे. येथील रहिवाशांचे पुनर्वसन झाल्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सुमारे ६० बाधित कुटुंबांना भरपाई जाहीर केली आहे. याच जमिनी आणि भरपाईच्या मुद्द्यांमुळे या प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण झाला होता.
लवकरच प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरू
डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा एमएमआरडीए-निर्मित उड्डाणपूल २०१८ मध्ये पूर्ण झाला होता. परंतु या प्रकल्पात बाधित रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न आणि भरपाईच्या समस्यामुळे ठाकुर्लीकडे जाणारा ९० फूट रस्त्याला जोडणारा विस्तार अपूर्ण राहिला होता. प्रकल्प बाधित कुटुंबाचे प्रश्न आता निकाली लावल्याने लवकरच या उन्नत मार्गाच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरू होणार आहे.
हेही वाचा : घर घेणाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी भेट! Home Loan वर ४% व्याजात सबसिडी; जाणून घ्या योजनेचा फायदा कोणाला?
निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर एक किंवा दोन महिन्यांत बांधकाम पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्यावर एमएमआरडीएकडे नियमितपणे पाठपुरावा केला होता. या उन्नत मार्गाच्या कामांसाठी निविदा घोषणेचा आनंद साजरा करण्यात आला.
परिसरातील वाढता वाहतुकीवरील ताण, प्रवासातील विलंब, तसेच दुर्घटना आणि अपघातांचा धोका रोखण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. ठाकुर्ली, मानपाडा, डोंबिवली परिसरातील नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि जलद वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प निर्णायक ठरणार असून, स्थानिक भागातील वाहतूक जलदगतीने होण्यास हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे.






