केंद्र सरकारने गरीब कुटुंबांसाठी आरोग्य संबधित मोठा निर्णय घेतला आहे. आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता लाखो कुटुंबांना आता 5 लाख नाहीतर 10 लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार…
केंद्र सरकारकडून देशातील १७ कोटी कुटुंबांना मोठा दिलासा दिला जाणार आहे. सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आगामी अर्थसंकल्पात आता ५ लाखांऐवजी १० लाख रुपयांपर्यंतचा इलाज देशातील कोणत्याही दवाखान्यात मोफत मिळणार आहे.
गेल्या १० वर्षांत महिला सक्षमीकरणावर भर, महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल, तिहेरी तलाक हा मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, पीएम आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागात ७० टक्के महिलांना घरं मिळाली आहेत.
सरकारी आरोग्याच्या सुविधा शहरासोबतच गाव खेड्यामधील गरिबांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकारातून 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या काळात आयुष्यमान भवः अभियान राबविले जात आहे.