Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांग्लादेशात राजकीय अस्थिरता; संकट मात्र भारतावर, वाचा… नेमका काय परिणाम होणार?

सध्याच्या घडीला बांग्लादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. ज्यामुळे आता त्याचा थेट परिणाम भारत-बांगलादेश यांच्यातील व्यापारिक संबंधांवर देखील पाहायला मिळणार आहे. भारताकडून बांगलादेशला तब्बल वार्षिक 11.25 अब्ज डॉलर ते 14 अब्ज डॉलर इतकी निर्यात केली. ही भारतीय वस्तूंची निर्यात प्रभावित होणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 05, 2024 | 05:18 PM
बांग्लादेशात राजकीय अस्थिरता; संकट मात्र भारतावर, वाचा... नेमका काय परिणाम होणार?

बांग्लादेशात राजकीय अस्थिरता; संकट मात्र भारतावर, वाचा... नेमका काय परिणाम होणार?

Follow Us
Close
Follow Us:

भारताचा शेजारील देश असलेल्या बांग्लादेशात सध्या मोठा हिंसाचार उफाळला आहे. परिस्थिती ही टोकाला पोहचली आहे की, आंदोलकांनी थेट पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे त्यांनी बांगलादेश सोडून भारतात आसरा घेतला आहे. तसेच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, बांगलादेशात आता सत्ता लष्कराकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या सर्व राजनीतिक संकटाचा भारताला मोठा फटका आहे.

आतापर्यंत व्यापारिक संबंध राहिले चांगले

तुम्ही म्हणाल हिंसाचार बांग्लादेशात उफाळला असताना, भारतावर त्याचा काय परिणाम होणार आहे. व्यापारिकदृष्ट्या भारत आणि बांगलादेश यांच्यात मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो. विशेष म्हणजे शेख हसीना या पंतप्रधान असल्याने, आतापर्यंत भारत आणि बांगलादेश यांचे व्यापारिक संबंध चांगले राहिले आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कॉमट्रेड डेटाबेसनुसार, भारताने बांगलादेशला आर्थिक वर्ष 2023-२४ मध्ये तब्बल 11.25 अब्ज डॉलर मूल्याची निर्यात केली आहे. जी आर्थिक वर्ष 2022-२३ मध्ये 13.8 अब्ज डॉलर आणि 2021 में ये 14.1 अब्ज डॉलर मूल्याची नोंदवली गेली आहे.

हेही वाचा : नोकरी सोडली, व्यवसायात उतरली; वर्षाला करतीये तब्बल 351 कोटींचा टर्नओव्हर!

भारत बांगलादेशला काय-काय निर्यात करतो? (आकडेवारी आर्थिक वर्ष 2023-२४)

– खनिज इंधन, तेल, डिस्टिलिशन उत्पादने – 2.19 अब्ज डॉलर
– कापूस 2.18 अब्ज डॉलर्स
– अन्न उद्योग, पशुखाद्य – 733.42 दशलक्ष डॉलर्स
– रेल्वे व्यतिरिक्त इतर वाहने, ट्रामवे – 593.97 दशलक्ष डॉलर्स
– यंत्रसामग्री, अणुभट्ट्या, बॉयलर – 552.41 दशलक्ष डॉलर्स
– भाजीपाला अन्य नाशवंत शेतमाल उत्पादने – 464.31 दशलक्ष डॉलर्स
– साखर आणि साखर कन्फेक्शनरी – 391.60 दशलक्ष डॉलर्स
– सेंद्रिय रसायने – 369.71 दशलक्ष डॉलर्स
– कॉफी, चहा, सोबती आणि मसाले 293.73 दशलक्ष डॉलर्स
– लोह आणि पोलाद – 287.42 दशलक्ष डॉलर्स

हेही वाचा : केंद्र सरकारचे चिनी कंपन्यांवर पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 400 कंपन्या सरकारच्या रडारवर!

व्यापारिकदृष्ट्या भारताचे मोठे नुकसान होणार

परिणामी, आता बांगलादेशात राजकीय स्थिरता निर्माण झाली आहे. ज्याचा थेट परिणाम हा भारतीय निर्यात आणि व्यापारावर होणार आहे. भारत आणि बांगलादेश हे शेजारी असल्याने, दोन्ही देशांमध्ये अनेक व्यापारी करार झाले आहे. त्यावर देखील आता थेट परिणाम होणार आहे. काही बाबींमध्ये भारत बांगलादेशकडून आयात करतो. मात्र, बांगलादेश ही भारतासाठी मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे आता बांगलादेशात राजनीतिक संकट उभे ठाकल्याने त्याचे मोठे नुकसान हे व्यापारिकदृष्ट्या भारताला सोसावे लागणार आहे.

Web Title: Bangladesh news bangladesh political instability affected india export trade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 05:09 PM

Topics:  

  • sheikh hasina

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.