नोकरी सोडली, व्यवसायात उतरली; वर्षाला करतीये तब्बल 351 कोटींचा टर्नओव्हर!
सध्याच्या घडीला अनेक तरुण-तरुणी नोकरीऐवजी व्यवसाय करण्यास प्राधान्य देत आहे. विशेष म्हणजे हे तरुण आपल्या शिक्षण आणि ज्ञानाच्या जोरावर व्यवसायामध्ये मोठे यश मिळवत आहे. बाजारपेठ आणि ग्राहकांची मानसिकता लक्षात घेऊन हे तरुण आपल्या व्यवसायाची निवड करत आहे. त्यामुळे त्यांना मोठा फायदा देखील होत आहे. आज आपण अशाच एका उच्चशिक्षित तरुणीची यशोगाथा पाहणार आहोत. जिने आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर आपले स्टार्टअप सुरु करत, वार्षिक 351 कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे.
दिल्ली येथून हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात पदवीधर
कैनाज मेसमान हरचंद्राय असे या उद्योजक तरुणीचे नाव असून, तिने देशातील आघाडीच्या हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आणि ओबेरॉय सेंटर ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट (दिल्ली) येथून पदवी मिळवली आहे. त्यानंतर तिने काही काळ राजस्थानमधील उदयपूर ‘द ओबेरॉय उदयविलास’ येथे काही काळ नोकरी देखील केली. मात्र, नोकरीत मन रमत नसल्याने, तसेच पाठीच्या आजारपणामुळे शेफचे काम करणे अवघड जात होते. त्यामुळे तिने आपल्याच क्षेत्रातील व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिने केवळ एका छोट्या कॅफेमधून आपल्या व्यवसायाला सुरुवात मिळाली.
हेही वाचा : केंद्र सरकारचे चिनी कंपन्यांवर पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 400 कंपन्या सरकारच्या रडारवर!
कशी मिळाली प्रेरणा?
लहानपणीपासून कैनाज मेसमान हरचंद्राय हिला स्वयंपाकाची आवड होती. त्यामुळे आईला स्वयंपाकात नेहमी मदत करायची. अशातच वयाच्या सोळाव्या वर्षी ती फ्रान्सला सहलीसाठी गेली. ज्या ठिकाणी तिला शेफ होण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर तिने आपले पुढील शिक्षण देखील हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात घेतले. काही काळ नोकरी केल्यानंतर तिला या क्षेत्रातील व्यवसायाचा आवाका लक्षात आला. त्यामुळे तिने यात पूर्ण क्षमतेने उतरण्याच्या निर्णय घेतला.
छोटेखानी कॅफेपासून सुरुवात
सुरुवातीला तिने आपल्या वडिलांची मदत १.५ कोटी रुपयांची मदत घेतली. या मदतीच्या आधारे तिने २००४ साली मुंबईतील कुलाबा येथे ‘थिओब्रोमा पॅटिसरी’ नावाने एक छोटेखानी कॅफे सुरु केला. सुरुवातीला पहिली सहा वर्ष आपला व्यवसाय केवळ मुंबईत सुरु ठेवला. त्यानंतर हळूहळू तिने या व्यवसायात मोठी प्रगती केली आहे. विशेष म्हणजे तिला आपली आई आणि आजी यांच्यापासून या व्यवसायात प्रगतीची प्रेरणा मिळाली.
हेही वाचा : हायस्कुलला असतानाच शिक्षण सोडले; तरुणाने 19 व्या वर्षीच उभी केली 136 कोटींची कंपनी!
गाठला वार्षिक 351 कोटींच्या टर्नओव्हरचा पल्ला
सध्याच्या घडीला कैनाज मेसमान हरचंद्राय हिचे देशभरात 100 हुन अधिक आउटलेट्स कार्यरत आहे. विशेष म्हणजे हे सर्व आउटलेट्स हे फ्रेंचायझिंगशिवाय चालवली जात आहे. कैनाज मेसमान हरचंद्राय हिने गेल्या आर्थिक वर्षात २०२३-२४ मध्ये आपल्या ‘थिओब्रोमा पॅटिसरी’ च्या माध्यमातून तब्बल 351 कोटींचा टर्नओव्हर गाठला आहे. यापूर्वीच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात तिने वार्षिक 254 कोटींच्या टर्नओव्हरचा पल्ला गाठला होता. तर आर्थिक वर्ष २०२१-२२ तिने आपल्या स्टार्टअप्सच्या माध्यमातून 121 कोटींचा टर्नओव्हर कमावला.