Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank Strike Today: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! आज संप, शनिवार-रविवार सुट्टी; सलग 4 दिवस बँकिंग सेवांवर परिणाम?

Bank Strike Today: बँक ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची असून देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी राष्ट्रव्यापी संप पुकारला आहे. पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करणे ही प्रमुख मागणी आहे. सणानिमित्त बँकांना सुट्टी असल्याने शाखांमधील कामकाजावर सलग काही दिवस परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 11, 2026 | 12:17 PM
बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! आज संप, शनिवार-रविवार सुट्टी; सलग 4 दिवस बँकिंग सेवांवर परिणाम? (फोटो सौजन्य-ChatGPT)

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! आज संप, शनिवार-रविवार सुट्टी; सलग 4 दिवस बँकिंग सेवांवर परिणाम? (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • आज बँकांचा देशव्यापी संप
  • त्यानंतर सलग 3 दिवस सुट्ट्या!
  • तुमची महत्त्वाची कामे 4 दिवस ठप्प राहणार?
Bank Strike Today: बँकेच्या शाखेत जाऊन एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी राष्ट्रव्यापी संप पुकारला आहे. या संपामुळे बँकांच्या शाखांमधील प्रत्यक्ष कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे संप होतात शनिवार आणि रविवारच्या नियमित सुट्ट्या येत असल्याने ग्राहकांची काही कामे पुढे ढकलली जाऊ शकतात. त्याचबरोबर लाडक्या गणरायाचे आगमन देखील होणार आहे. यानिमित्ताने राज्यातील काही बँकां बंद असण्याची शक्यता आहे.

बँक कर्मचारी संपावर का?

बँक कर्मचारी संघटनांच्या अनेक मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये बँकांमध्ये पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा म्हणजेच ‘5 Day Working’ लागू करण्याची मागणी प्रमुख आहे. या विषयावर चर्चा होऊनही अपेक्षित निर्णय न झाल्याने कर्मचारी संघटनांनी एकदिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे. पाच दिवसांचा आठवडा लागू झाल्यास शनिवार आणि रविवार अशा दोन्ही दिवशी बँकांना सुट्टी देण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे. सध्या महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते.

Share Market: शेअर बाजारात हाहाःकार! सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला, काय आहे मोठं कारण

सलग चार दिवस बँकांची कामे प्रभावित?

11 सप्टेंबरच्या संपानंतर लगेचच नियमित सुट्ट्या येत असल्याने शाखांमधील कामकाजावर सलग काही दिवस परिणाम होण्याची शक्यता आहे.

11 सप्टेंबर, शुक्रवार : देशव्यापी बँक संपामुळे शाखांमधील कामकाज प्रभावित होण्याची शक्यता.

12 सप्टेंबर, शनिवार : महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँकांना नियमित सुट्टी.

13 सप्टेंबर, रविवार : साप्ताहिक सुट्टी असल्याने बँक शाखा बंद.

14 सप्टेंबर, सोमवार : काही राज्यांमध्ये स्थानिक सणानिमित्त बँकांना सुट्टी असू शकते. त्यामुळे ही सुट्टी संपूर्ण देशभर लागू आहे असे समजू नये. ग्राहकांनी आपल्या राज्यातील अधिकृत बँक हॉलिडे कॅलेंडर तपासणे आवश्यक आहे.

कोणत्या सेवांवर होणार परिणाम?

बँक संपाचा मुख्य परिणाम शाखांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कराव्या लागणाऱ्या कामांवर होऊ शकतो. रोख रक्कम जमा करणे किंवा काढणे, चेक जमा करणे आणि त्यासंबंधित प्रक्रिया, खातेविषयक कागदपत्रे सादर करणे, KYC तसेच इतर शाखास्तरीय सेवांमध्ये अडचणी येऊ शकतात. संप आणि त्यानंतरच्या सुट्ट्यांमुळे चेक क्लिअरन्ससारख्या काही प्रक्रियांनाही विलंब होण्याची शक्यता आहे.

UPI आणि नेट बँकिंग सुरू राहणार?

बँक शाखांमधील प्रत्यक्ष सेवा प्रभावित झाल्या तरी UPI, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवा सामान्यतः सुरू राहतात. त्यामुळे पैसे ट्रान्सफर करणे, बिल भरणे किंवा ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी ग्राहक डिजिटल बँकिंगचा पर्याय वापरू शकतात.

एटीएम सेवा सुरू राहण्याची अपेक्षा असली तरी सलग सुट्ट्यांमुळे काही ठिकाणी रोख रकमेच्या उपलब्धतेवर ताण येऊ शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोख रकमेची आवश्यकता असल्यास ग्राहकांनी त्यानुसार नियोजन करणे फायदेशीर ठरू शकते.

ग्राहकांनी आधी तपासावी स्थानिक सुट्टी

बँकांच्या सुट्ट्या राज्य आणि शहरानुसार वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे 14 सप्टेंबरची सुट्टी आपल्या शहरात किंवा राज्यात लागू आहे की नाही, हे संबंधित बँकेच्या अधिकृत माहितीतून तपासणे महत्त्वाचे आहे. तातडीचे शाखास्तरीय काम असल्यास संबंधित शाखेशी संपर्क साधून कामकाजाची स्थिती जाणून घेणे योग्य ठरेल.

‘थोडा प्लॅन, थोडा कॉम्प्लॅन’! Sachin Tendulkar चा रेकॉर्ड मोडणारा Vaibhav Sooryavanshi भारताचा नवा Complan Boy

Web Title: Bank strike today september 11 2026 four day bank holidays banking services affected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • Bank
  • Bank Holiday
  • Business News

संबंधित बातम्या

‘दिवाळीत धंदा बुडवू नका!’ Rahul Gandhi यांच्या रॅलीवरून दिल्लीतील व्यापारी आक्रमक; 10000 कोटींच्या व्यापारावर परिणामाची भीती
1

‘दिवाळीत धंदा बुडवू नका!’ Rahul Gandhi यांच्या रॅलीवरून दिल्लीतील व्यापारी आक्रमक; 10000 कोटींच्या व्यापारावर परिणामाची भीती

Avadhut Sathe : Trading च्या नावाखाली फसवणूक? विना नोंदणी क्लास; अवधुत साठेंना 546 कोटी रुपये परत करण्याचे SEBI कडून आदेश
2

Avadhut Sathe : Trading च्या नावाखाली फसवणूक? विना नोंदणी क्लास; अवधुत साठेंना 546 कोटी रुपये परत करण्याचे SEBI कडून आदेश

अरे वाह… एकाच फंडमध्ये सर्वकाही! इक्विटी, सोने, चांदी, REITs मध्ये गुंतवणुकीची भारी संधी; Motilal Oswal चा नवीन Fund लाँच
3

अरे वाह… एकाच फंडमध्ये सर्वकाही! इक्विटी, सोने, चांदी, REITs मध्ये गुंतवणुकीची भारी संधी; Motilal Oswal चा नवीन Fund लाँच

भारत बनणार जागतिक केमिकल हब? ‘इंडिया केम २०२६’च्या माध्यमातून मोदींनी व्यक्त केला मोठा विश्वास
4

भारत बनणार जागतिक केमिकल हब? ‘इंडिया केम २०२६’च्या माध्यमातून मोदींनी व्यक्त केला मोठा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.