
गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित ‘इंडिया केम २०२६’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय रसायने मंत्री जगतप्रसाद नड्डा यांच्या हस्ते झाले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्यासह विविध राज्यांचे प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि देश-विदेशातील गुंतवणूकदार उपस्थित होते. या प्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘इंडिया केम २०२६’ निमित्त दिलेल्या संदेशात भारताच्या रासायनिक आणि पेट्रोकेमिकल उद्योगाचे अर्थव्यवस्थेतील महत्व अधोरेखित केले. केंद्रीय मंत्री नड्डा यांनी हा संदेश वाचून दाखवला.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी; CM Fadnavis यांनी राष्ट्रपतींना दिले निमंत्रण
Advantage Bharat: An Emerging Global Chemicals Hub 🔸 Inauguration of India Chem 2026 at the hands of Union Minister J.P. Nadda and in the presence of CM Devendra Fadnavis.
CM of Madhya Pradesh Dr. Mohan Yadav, CM of Odisha Mohan Charan Majhi, Union MoS Anupriya Patel, MoS of Gujarat Praful Pansheriya, Chairman of FICCI National Petrochemicals Committee & MD and CEO of HMEL Prabh Das, Chairman & Group CEO of UPL Jai Shroff and other dignitaries were present. 🔸 केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत India Chem 2026 चे उदघाटन.
यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, गुजरातचे राज्यमंत्री प्रफुल पानशेरिया, फिक्की राष्ट्रीय पेट्रोकेमिकल्स समितीचे अध्यक्ष, एचएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभ दास, यूपीएलचे अध्यक्ष आणि समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय श्रॉफ व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸 केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा इनके करकमलों से एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में India Chem 2026 का उदघाटन।
इस अवसर पर मध्य प्रदेश के मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, ओडिशा के मुख्यमंत्री मोहन चरण माझी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, गुजरात के राज्यमंत्री प्रफुल पानशेरिया, फिक्की राष्ट्रीय पेट्रोकेमिकल्स समिति के अध्यक्ष, एचएमईएल के प्रबंध निदेशक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभ दास, एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕥 10.25am | 22-10-2026📍Mumbai | स. १०.२५ वा. | २२-१०-२०२६📍मुंबई. @JPNadda @Dev_Fadnavis @DrMohanYadav51 @MohanMOdisha @AnupriyaSPatel @prafulpbjp @ficci_india @UPLLtd
#Maharashtra #DevendraFadnavis #IndiaChem2026 — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 22, 2026
कृषी, औषधनिर्मिती, वस्त्रोद्योग आणि वाहननिर्मिती यांसारख्या विविध क्षेत्रांसाठी रासायनिक उत्पादनांची आवश्यकता असून, या उद्योगाची वाढ देशांतर्गत उत्पादन आणि आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टांशी निगडित आहे, असेही त्यांनी संदेशात म्हटले.
रासायनिक उद्यानांच्या विकासासाठी भव्य रसायन योजनेची अंमलबजावणी आणि संशोधन, विकास व नवोन्मेष योजनेत रासायनिक व पेट्रोकेमिकल क्षेत्राचा समावेश हे उद्योगाच्या वाढीसाठी महत्त्वाचे टप्पे आहेत. सेमीकंडक्टर उत्पादन, स्वच्छ ऊर्जा आणि विद्युत वाहनांसाठी आवश्यक प्रगत रसायनांची वाढती मागणी लक्षात घेता, भारतीय उद्योगांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये गुंतवणूक करावी. शाश्वत उत्पादन पद्धती आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर यांनाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
Devendra Fadnavis : दहा हजार मते बाद, तर पदवी कोणी दिली? सांगलीत फडणवीसांचा शिक्षक-पदवीधरांना टोला
रासायनिक व पेट्रोकेमिकल उद्योगाच्या विकासासाठी केंद्र सरकार अनुकूल धोरणे, पायाभूत सुविधा आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यावर भर देत आहे. भारताची रासायनिक उद्योगातील सध्याची बाजारपेठ सुमारे २२० अब्ज अमेरिकी डॉलरची असून, २०४० पर्यंत ती एक ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत आणि २०४७ पर्यंत १.६ ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे, उद्योग क्षेत्र, संशोधक आणि गुंतवणूकदार यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय रसायने मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी सांगितले.