Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“बँकांनी कापले सर्वसामान्यांचे खिसे..!” मिनिमम बॅलन्स नावाखाली कमावलेत 8500 कोटी रुपये

देशातील सरकारी बँकांनी 2020 ते 2024 या पाच आर्थिक वर्षात 8500 कोटी रुपये कमावले आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी एक विशिष्ट रक्कम खात्यावर नेहमी ठेवावी लागते. अशी रक्कम न ठेवल्यास बँका सर्वसामान्यांकडून दंड आकारतात. याच रकमेतून आता देशातील सरकारी बँकांनी देशभरातील सर्वसामान्यांच्या खिशातून तब्बल 8500 कोटी रुपये उकळले आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 30, 2024 | 06:28 PM
"बँकांनी कापले सर्वसामान्यांचे खिसे..!" मिनिमम बॅलन्स नावाखाली कमावलेत 8500 कोटी रुपये

"बँकांनी कापले सर्वसामान्यांचे खिसे..!" मिनिमम बॅलन्स नावाखाली कमावलेत 8500 कोटी रुपये

Follow Us
Close
Follow Us:

सर्वसामान्य ग्राहकांना बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी एक विशिष्ट रक्कम खात्यावर नेहमी ठेवावी लागते. अशी रक्कम न ठेवल्यास बँका खातेधारकांकडून दंड आकारतात. मात्र, आता बँकांनी खातेधारकांकडून ही रक्कम आकारण्याचा मुद्दा आता थेट संसदेत उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मागील पाच वर्षात सरकारी बँकांनी मिनिमम बॅलन्स नसलेल्या खातेधारकांकडून दंडाच्या स्वरूपात 8500 कोटी रुपये इतकी रक्कम वसूल केली आहे. अशी माहिती लोकसभा सभागृहाला दिली आहे.

राहुल गांधींचा ट्विट करत सरकारवर निशाणा

यावर आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सामान्य जनतेचे खिसे कापले जात आहे. ज्या केंद्र सरकारकडून देशातील उद्योगपतींचे तब्बल 16 लाख कोटींचे रुपये कर्ज माफ केले जाते. त्याच सरकारकडून सर्वसामान्यांच्या खिशातून सरकारी बँका 8500 कोटी रुपये दंड वसूल करतात. हा दंड प्रामुख्याने ज्यांना बँक खात्यात कमी रक्कम ठेवणे शक्य नसते. अशा गरीब जनतेकडून आकारला जातो, असेही राहुल गांधी यांनी लोकसभेत म्हटले आहे.

हेही वाचा : अंबानींच्या अँटिलिया हाऊसचे वीज बिल माहितीये का? आयुष्यभर कमवाल तरी…नाही होणार कमाई!

बड्या बँकांची दंडातून मोठी कमाई

दरम्यान, बँक खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल बँका खातेधारकांकडून दंड वसूल करतात. विशेष म्हणजे यात सरकारी बँकांनी गेल्या पाच वर्षांत किमान शिल्लक दंडातून 8500 कोटी रुपये कमावले आहेत. पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक या देशातील मोठ्या सरकारी बँका आहेत. कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडियाने किमान शिल्लक रकमेवर दंड आकारून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या किमान शिल्लक रकमेच्या दंडामध्ये ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा : मुकेश अंबानींच्या अँटीलिआ हाऊसपेक्षाही मोठ्या घरात राहते ‘ही’ भारतीय महिला, वाचा… तिचे नाव?

कोणत्या बँकेने कमावलेत दंडाचे सर्वाधिक रुपये

विशेष म्हणजे देशातील सरकारी बँकांनी वर्ष 2020 ते 2024 या पाच आर्थिक वर्षात किमान शिल्लक दंडातून 8500 कोटी रुपये कमावले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने वर्ष 2019-20 मध्ये किमान शिल्लक दंडातून सर्वाधिक 640 कोटी रुपये कमावले. तर पंजाब नॅशनल बँकेने वर्ष 2023-24 मध्ये 633 कोटी रुपये कमावले. त्याचप्रमाणे 2023-24 या आर्थिक वर्षात बँक ऑफ बडोदाने 387 कोटी रुपये, इंडियन बँकेने 369 कोटी रुपये, कॅनरा बँकेने 284 कोटी रुपये आणि बँक ऑफ इंडियाने 194 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Web Title: Banks have collected 8500 crores for not maintaining minimum balance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 05:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.