Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Best FD Interest Rates : काय सांगताय? सरकारी बँकांपेक्षाही जास्त रिटर्न, ‘या’ बँका FD वर देताहेत 8.5% पर्यंत व्याज

Best FD Interest Rates : सुरक्षित गुंतवणुकीसाठी आणि चांगल्या परताव्यासाठी FD हा आजही अनेकांचा आवडता पर्याय आहे. सध्या अनेक खाजगी आणि स्मॉल फायनान्स बँका सरकारी बँकांच्या तुलनेत मुदत ठेवींवर ८.५ टक्क्यांपर्यंत आकर्षक व्याज देत आहेत. पण असे काही पर्याय आहेत ज्यातून तुम्हाला जास्त व्याज मिळेल.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 26, 2026 | 03:55 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सरकारी बँकांपेक्षाही जास्त रिटर्न,
  • ‘या’ बँका FD वर देताहेत 8.5% पर्यंत व्याज
  • स्मॉल फायनान्स बँकेत FD सुरक्षित आहे का?
Best FD Interest Rates : सुरक्षित गुंतवणुकीसाठी आणि चांगल्या परताव्यासाठी बरेच जण एफडी पर्याय निवडतात. अनेकांसाठी आजही हा आवडता पर्याय आहे. पण नेमकं गुंतवणूक करायची कुठे ? असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा बरेच जण सरकारी मालकीच्या बँकांची नावं सुचवतात. बरेच जण सरकारी बँकांनाच आपली पहिली पसंती मानतात. ज्याचा साधारणपण मुदत ठेवींवर ६.५% ते ७% व्याजदर देतात. पण वाढत्या महागाईचा विचार केला तर या ठेवींवरील मिळणारा हा व्याजदर कधीकधी कमी वाटू शकतो. पण सरकारी बँकांव्यतिरिक्त असे काही पर्याय आहेत जे तुम्हाला तगडा इंट्रेस रेट देतील. नेमक्या कोणत्या बँकां आहेत ज्यातून तुम्ही बंपर नफा कमवू शकतात? ( Best FD Interest Rates ) 

Kitchen Budget Hike : देवा रे देवा… किचनमधील गोडवा तर महागला; पाठोपाठ ‘या’ वस्तूंच्या किमतीही कडाडल्या

आज गुंतवणुकीच्या जगात स्मॉल फायनान्स बँका नवीन खेळाडू म्हणून उदयास येत आहेत. काही स्मॉल फायनान्स बँका एफडीवर ८.५% पर्यंत व्याजदर देत आहेत, जो सरकारी बँकांपेक्षा १ ते १.५% जास्त आहे. अशा काही बँकांचे पर्याय सुचवते ज्या एफडीवर उच्च व्याजदर देऊन आपल्या ग्राहकांसाठी भरीव उत्पन्न मिळवत आहेत. पाहूयात सविस्तर

FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या  स्मॉल फायनान्स बँका

Suryoday Small Finance Bank- ही बँक ५ वर्षांच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांसाठी ८.२५% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ८.५०% पर्यंत सर्वाधिक व्याजदर देते.

Shivalik Small Finance Bank- ही बँक २३ महिने १ दिवस ते २७ महिन्यांपर्यंतच्या मुदतीच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी ८.५०% आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ८.००% व्याज देते.

Equitas Small Finance Bank- ही बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी ८.५०% आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ८.००% पर्यंत व्याजदर देते.

Jana Small Finance Bank-येथे, ज्येष्ठ नागरिकांना २ ते ३ वर्षांच्या एफडीवर ८.३०% आणि सर्वसामान्य नागरिकांना ८.००% व्याज मिळत आहे.

Utkarsh Small Finance Bank- ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर ८.२५% आणि सर्वसामान्य नागरिकांना ८.१०% पर्यंत परतावा मिळत आहे.

Unity Small Finance Bank- युनिटी स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य नागरिकांसाठी ८.००% पर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ८.५०% पर्यंत व्याजदर देत आहे.

स्मॉल फायनान्स बँकेत FD ठेवणं सुरक्षित आहे का?

स्मॉल फायनान्स बँका पूर्णपणे सुरक्षित आहेत. सर्व स्मॉल फायनान्स बँका DICGC (डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन) च्या अंतर्गत येतात, जी भारतीय रिझर्व्ह बँकेची पूर्ण मालकीची संस्था आहे. त्यामुळे जर भविष्यात एखादी बँक दिवाळखोर झाली किंवा अयशस्वी ठरली, तर DICGC प्रत्येक ठेवीदाराला ₹५,०००,००० पर्यंतची रक्कम म्हणजे तुमची मुद्दल आणि जमा झालेले व्याज दोन्हीसह परत करण्यास कायदेशीररित्या बांधील आहे. याचा अर्थ असा की, जर तुमच्या दोन वेगवेगळ्या स्मॉल फायनान्स बँकांमध्ये प्रत्येकी ₹५ लाखांच्या एफडी असतील, तर तुमचे ₹१० लाख सुरक्षित आहेत.

Multibagger Penny Stock : ‘या’ शेअरमध्ये तुफान तेजी! गुंतवणूकदारांचे पैसे झाले डबल? कंपनीने दिला 2 वेळा बोनस

Web Title: Best fd interest rates offered by private and small finance banks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Business News
  • FD
  • Interest rate

संबंधित बातम्या

घर घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! लाखो रुपयांची होणार बचत; ‘या’ 12 सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त Home Loan
1

घर घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! लाखो रुपयांची होणार बचत; ‘या’ 12 सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त Home Loan

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल
2

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल

अरे वाह… FD वर मिळणार 7.85% पर्यंत व्याज! 11 ऑक्टोबरपासून लागून होणार नवे दर; कोणाला मिळणार सर्वाधिक फायदा?
3

अरे वाह… FD वर मिळणार 7.85% पर्यंत व्याज! 11 ऑक्टोबरपासून लागून होणार नवे दर; कोणाला मिळणार सर्वाधिक फायदा?

व्हिस्की शौकीनांसाठी दिवाळीची खास भेट! Indri चे दुर्मिळ Ruby Port Cask व्हर्जन लाँच; लंडननंतर आता भारतात उपलब्ध
4

व्हिस्की शौकीनांसाठी दिवाळीची खास भेट! Indri चे दुर्मिळ Ruby Port Cask व्हर्जन लाँच; लंडननंतर आता भारतात उपलब्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.