Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर बिटकॉइनचीही भरभराट, प्रथमच ओलांडला 80,000 डॉलरचा टप्पा

बिटकॉइनने प्रथमच 80,000 डॉलरचा स्तर ओलांडला आहे. अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर बिटकॉइनने तेजी अनुभवली आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी, क्रिप्टोकरन्सीने मोठ्या प्रमाणात खर्च केला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 11, 2024 | 11:38 AM
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर बिटकॉइनचीही भरभराट, प्रथमच ओलांडला 80,000 डॉलरचा टप्पा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर बिटकॉइनचीही भरभराट, प्रथमच ओलांडला 80,000 डॉलरचा टप्पा

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या 2024 च्या निवडणुकीचे निकाल अलीकडेच जाहीर झाले आहेत. या निकालात रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प 2025 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विजयानंतर क्रिप्टो मार्केटमध्ये भरभराट सुरु झाली आहे. विशेषत: क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन या क्षणी गगनाला भिडत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवार, 11 नोव्हेंबर 2024 रोजी, बिटकॉइनने जोरदार वाढीसह 80,000 डॉलरचा विक्रमी उच्चांक गाठला आहे.

हेदेखील वाचा- एअर इंडिया-विस्ताराच्या विलीनकरणापूर्वी सिंगापूर एअरलाइन्सची मोठी घोषणा; वाचा… काय आहे घोषणा?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासह बिटकॉइनमध्ये देखील तेजी अनुभवायला मिळत आहे. बिटकॉइन, जगातील सर्वात मान्यताप्राप्त क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉइनची किंमत जानेवारी 2023 मधील 38505 डॉलरच्या नीचांकावरून दुप्पट झाली आहे. आशियाई कालखंडानुसार, 11 नोव्हेंबर रोजी बिटकॉइन 81464 डॉलरच्या पातळीवर ट्रेडिंग करताना दिसले आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये वाढ का?

खरं तर, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे क्रिप्टोकरन्सीच्या प्रचाराचे समर्थक म्हणूनही पाहिले जाते. अशी अपेक्षा आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, क्रिप्टोकरन्सीच्या नियमनाशी संबंधित अडथळे आणि आव्हाने अधिक सुलभ होतील. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये सतत तेजी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतरच बिटकॉइनने 80,000 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच बिटकॉइनची अधिक भरभराट होईल, अशी सर्वांना आशा आहे.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान क्रिप्टोकरन्सीचा अफाट खर्च

यावेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान, क्रिप्टोकरन्सी उद्योगाने मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले आहेत. डेटानुसार, यूएस काँग्रेसमध्ये क्रिप्टोच्या बाजूने असलेल्या उमेदवारांवर एकूण 119 डॉलर दशलक्ष खर्च केले गेले आहेत.

हेदेखील वाचा- ‘हा’ शेअर 6 ते 9 महिन्यांत 340 रुपयांवर जाण्याची शक्यता; राष्ट्रपतींकडेही आहेत 373 कोटी शेअर्स!

क्रिप्टोकरन्सी उद्योगाला आशा आहे की या मोठ्या खर्चानंतर, क्रिप्टोकरन्सीला डिजिटल मालमत्ता म्हणून प्रोत्साहन दिले जाईल आणि क्रिप्टोकरन्सी वापरण्यास सुलभ करण्यासाठी अनेक कायदे केले जातील अशी आशा आहे.

यूएस निवडणुकीच्या दिवसापासून तेजी

गेल्या बुधवारी, जेव्हा अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीची मतमोजणी आणि मतदान होत होते, तेव्हा बिटकॉइनने 75,000 डॉलरची पातळी ओलांडली होती, म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये, बिटकॉइनने 63,14,109.26 रुपयांचा आकडा गाठला होता. याआधी, बिटकॉइनची मागील उच्च पातळी 73750 डॉलर होती.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प विजयी

डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवड्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवून रिपब्लिकन पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्याचा मार्ग मोकळा केला. त्यांच्या या विजयानंतर क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल मालमत्तांमध्ये तेजी पाहायला मिळाली.

गुरुवारी, अमेरिकेचे एक्सचेंज ट्रेडेड फंड ज्यावर बिटकॉइनचा व्यापार होतो त्यात लक्षणीय वाढ दिसून आली. याच वर्षात म्हणजेच 2024 मध्ये बिटकॉइनच्या किमतीत जवळपास 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) कडून जोरदार मागणी आणि यूएस फेडरल रिझर्व्हने प्रमुख व्याजदरात सतत कपात केल्यानंतर, बिटकॉइनचा दर सतत वाढीच्या मार्गावर आहे.

Web Title: Bitcoin tops record 80000 dollars as donald trump nears sweep of us congress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 11:33 AM

Topics:  

  • Donald Trump

संबंधित बातम्या

Trump Saudi Deal : ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला दिला ‘Major Non-NATO Allies’ दर्जा; पाकिस्तानसह फक्त 20 देशांना हा सन्मान
1

Trump Saudi Deal : ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला दिला ‘Major Non-NATO Allies’ दर्जा; पाकिस्तानसह फक्त 20 देशांना हा सन्मान

White House : व्हाईट हाऊसमध्ये रोनाल्डोचा जलवा! सौदी क्राउन प्रिन्सच्या स्वागतासाठी ट्रम्पचा विनोद; एलोन मस्क-टिम कुकचीही उपस्थिती
2

White House : व्हाईट हाऊसमध्ये रोनाल्डोचा जलवा! सौदी क्राउन प्रिन्सच्या स्वागतासाठी ट्रम्पचा विनोद; एलोन मस्क-टिम कुकचीही उपस्थिती

US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता
3

US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
4

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.