
Donald Trump Russia biological weapon Pneumonic Plague Russia
जागतिक स्तरावर आरोग्य संकट आणि साथीच्या रोगांबद्दल भीतीचे वातावरण असतानाच रशियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रशियातील एका प्लेगविरोधी संशोधन संस्थेत (Anti-Plague Research Institute) काम करणाऱ्या एका २८ वर्षीय तरुण महिला कर्मचाऱ्याचा अनपेक्षित आणि रहस्यमय रीतीने मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर रशियात न्यूमोनिक प्लेगचा (Pneumonic Plague) प्रसार होण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात आहे. या संशयास्पद मृत्यूची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रकरणावरून राजकीय व वैद्यकीय चर्चांना उधाण आले आहे.(Plague Alert)
रशियन प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मृत महिला कर्मचाऱ्याला सुरुवातीला साध्या विषाणूजन्य श्वसनविकारासारखी (Viral Respiratory Infection) लक्षणे दिसून येत होती. मात्र, अल्पावधीतच तिची प्रकृती बिघडली आणि तिचा न्यूमोनियामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ही महिला प्लेगवर संशोधन करणाऱ्या अत्यंत संवेदनशील प्रयोगशाळेत कार्यरत असल्याने, तिच्या मृत्यूमागे न्यूमोनिक प्लेगचा संसर्ग असण्याची शक्यता बळावली आहे. न्यूमोनिक प्लेग हा प्लेगचा अत्यंत घातक प्रकार मानला जातो, जो थेट फुफ्फुसांवर हल्ला करतो आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हवेद्वारे पसरू शकतो.
या संपूर्ण प्रकरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी जैविक शस्त्रांच्या वापराबद्दलचा संशय तूर्तास फेटाळून लावला आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, “या प्रकरणात जैविक शस्त्रांचा वापर केला असल्याचे दिसत नाही, मात्र नक्की काय घडले आहे हे लवकरच स्पष्ट होईल.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार
ट्रम्प यांनी या प्रकरणी रशियाच्या अपुऱ्या पारदर्शकतेवर तीव्र बोट ठेवले. रशियन सरकार परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करत असले, तरी त्यांनी जगाला अतिशय कमी माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी या स्थितीची तुलना कोविड-१९ (Covid-19) साथीच्या सुरुवातीच्या काळातील चीनच्या भूमिकेशी केली. चीनने ज्याप्रमाणे सुरुवातीच्या काळात खरी माहिती जगापासून लपवून ठेवली होती, तसाच प्रकार रशियाकडूनही घडत असल्याचा संशय ट्रम्प यांनी व्यक्त केला. तसेच, ते लवकरच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून संवाद साधून या विषयावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
Q: Is the plague in Russia a bioweapon? Trump: We don’t think so. We’re going to find out soon enough, but we don’t think so. The Russians are saying that it’s very much under control. https://t.co/vfM9Spx5C5 — Clash Report (@clashreport) October 7, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : France Student Protest : ‘इस्लाम फ्रान्सवर ताबा मिळवतोय’; ट्रुथ सोशल’वर ट्रम्प यांची वादग्रस्त पोस्ट; आंदोलनाचा विस्फोटक उद्रेक
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या रहस्यमय मृत्यूची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. प्राथमिक तपासातील अहवाल या घटनेचा रोख न्यूमोनिक प्लेगकडे दाखवत असल्यामुळे डब्लूएचओने रशियन सरकारकडे सविस्तर माहिती आणि डेटा मागवला आहे. डब्लूएचओच्या वरिष्ठ अधिकारी मारिया व्हॅन केरखोव्ह (Maria Van Kerkhove) यांनी सांगितले की, या मृत्यूबाबत अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. रशियाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित भागात अलीकडच्या काळात प्लेगची कोणतीही नोंद झाली नव्हती आणि महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी करण्यात आली आहे.
स्थानिक पातळीवर खबरदारीचा उपाय म्हणून ज्या रुग्णालयात या २८ वर्षीय महिलेवर उपचार सुरू होते आणि जिथे तिचा मृत्यू झाला, ते संपूर्ण रुग्णालय तात्काळ विलगीकरणात (Quarantine) ठेवण्यात आले आहे. रशियाच्या आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आणि खोट्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, माहितीच्या अभावामुळे आणि अनिश्चिततेमुळे जागतिक आरोग्य संघटनेने सर्वसामान्य जनतेला असणाऱ्या धोक्याच्या पातळीबाबतच्या आपल्या आधीच्या मतावर पुनर्विचार करण्यास सुरुवात केली आहे.