Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran War: पेट्रोलच्या किमती आणि निवडणुकांचे गणित; ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचा निर्णय बदलला? ‘अशा’ एका पोस्टमुळे खळबळ

US-Iran War : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, मध्यावधी निवडणुकांपूर्वी अमेरिका इराणवर हल्ला करणार नाही. दरम्यान, इराणने आपला अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 09, 2026 | 09:30 AM
Pentagon Iran attack options Donald Trump Iran statement

Pentagon Iran attack options Donald Trump Iran statement

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांची माघार व भूमिका बदल
  • पेन्टागॉन आणि सेंट्रल कमांडची तयारी
  • इराणचे थेट आव्हान आणि अणुकार्यक्रम

मध्य पूर्वेतील (Middle East) वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी (Midterm Elections) अमेरिका इराणवर (US-Iran War) कोणताही नवा लष्करी हल्ला करणार नाही. गेल्या काही दिवसांपासून रिपब्लिकन उमेदवारांच्या प्रचार सभांमध्ये ट्रम्प यांच्या वक्तव्यातून इराणविरुद्धच्या संघर्षात मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई पुन्हा सुरू करण्याचे संकेत मिळत होते. मात्र, आता सोशल मीडियावरील आपल्या अधिकृत पोस्टद्वारे त्यांनी या सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला आहे.

मध्यावधी निवडणुकांआधी युद्धाचा धोका टळला?

या रणधुमाळीत ट्रम्प यांनी पूर्वी असेही नमूद केले होते की, निवडणुकांपूर्वी किंवा निवडणुकांनंतर लवकरच या संघर्षाचा निर्णायक टप्पा संपेल अशी त्यांना आशा आहे. आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, अमेरिकेत आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधन आणि पेट्रोलच्या वाढत्या किमती नियंत्रित ठेवणे आणि मतदारांना युद्धात अडकण्याऐवजी शांततेचा संदेश देणे ही ट्रम्प यांच्या या माघारीमागील मुख्य रणनीती असू शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

पेंटागॉन आणि सेंट्रल कमांड (CENTCOM) ला युद्धाचे पर्याय तयार करण्याचे आदेश

डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकांआधी हल्ला न करण्याचे आश्वासन दिले असले, तरी लष्करी पातळीवर अमेरिकेची तयारी पूर्ण वेगाने सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, व्हाईट हाऊसने अमेरिकेच्या संरक्षण विभागाला (پेंटागॉन) इराणविरुद्धच्या संभाव्य लष्करी हल्ल्यांचे विविध रणनीतिक पर्याय तयार ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अमेरिकेची सेंट्रल कमांड (CENTCOM) सध्या या संभाव्य लष्करी कारवाईच्या योजनांवर, हल्ल्याची तीव्रतेची पातळी आणि त्यामागील उद्दिष्टांवर अत्यंत बारकाईने काम करत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी केलेल्या एका वक्तव्यात असे म्हटले होते की, परिणामांची कोणतीही पर्वा न करता अमेरिकेला इराणसोबतचा हा प्रदीर्घ संघर्ष लवकरात लवकर संपवायचा आहे. त्यामुळे निवडणुका पार पडल्यानंतर अमेरिका पुन्हा एकदा इराणवर लष्करी दबाव वाढवू शकते, असा अंदाज संरक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

BREAKING: Trump rules out striking Iran before Nov 3 midterm elections, saying ‘productive discussions’ are ongoing https://t.co/sYLQy9kvKZ — Fox News (@FoxNews) October 8, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

दबाव आणि हल्ल्यांना न जुमानता अणुकार्यक्रम सुरूच राहणार’

दुसऱ्या बाजूला, अमेरिकेच्या या लष्करी धमक्या आणि माघारीच्या वक्तव्यानंतरही तेहरानने (Tehran) आपली भूमिका अत्यंत स्पष्ट केली आहे. इराणने जाहीर केले आहे की, ते कोणत्याही परिस्थितीत आपला राष्ट्रीय अणुऊर्जा कार्यक्रम थांबवणार नाहीत. इराणचे उपराष्ट्रपती आणि अणुऊर्जा संघटनेचे (AEOI) प्रमुख मोहम्मद इस्लामी यांनी तेहरानमधील एका कार्यक्रमात बोलताना ही महत्त्वाची घोषणा केली. तेहरानमधील लहान मुलांच्या कर्करोग निदान आणि उपचार केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

मोहम्मद इस्लामी यांनी स्पष्ट केले की, इराणचा अणुउद्योग हा नेहमीच आंतरराष्ट्रीय दबाव, आर्थिक निर्बंध आणि लष्करी हल्ल्यांच्या धमक्यांच्या सावटाखाली राहिला आहे. परंतु, या सर्व आव्हानांना तोंड देत इराणने वैद्यकीय, अन्नसुरक्षा आणि राष्ट्रीय विकासाच्या क्षेत्रात स्वावलंबन मिळवले आहे. इराणवर लादण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार असून, देशाचे वैद्यकीय आणि आरोग्य सेवांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा अणुऊर्जा प्रकल्प इराणसाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे.

Web Title: Us iran war update trump delays attack before midterm elections hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Donald Trump
  • elections
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
1

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Marco Rubio: ‘ट्रम्प इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाहीत’; मार्को रुबियो यांनी आखली ‘लक्ष्मणरेषा’, क्षेपणास्त्रे-ड्रोनवरही मोठे विधान
2

Marco Rubio: ‘ट्रम्प इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाहीत’; मार्को रुबियो यांनी आखली ‘लक्ष्मणरेषा’, क्षेपणास्त्रे-ड्रोनवरही मोठे विधान

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार
3

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार

US-Iran War: 60% संवर्धित इंधन कशासाठी? अन्यथा युद्ध सुरूच राहणार…; जेडी व्हान्स यांच्या अटींनी युद्धात शांततेच्या आशांना धक्का
4

US-Iran War: 60% संवर्धित इंधन कशासाठी? अन्यथा युद्ध सुरूच राहणार…; जेडी व्हान्स यांच्या अटींनी युद्धात शांततेच्या आशांना धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.