Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BLS International ने नोंदवली आतापर्यंतची सर्वोच्च तिमाही कामगिरी; चीनमध्ये व्हिसा करार, जागतिक विस्तार

बीएलएस इंटरनॅशनल सर्विसेस लि.चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. शिखर अग्रवाल यांनी या निकालांवर समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, व्हिसा व कॉन्सुलर सेवा आणि डिजिटल सेवा क्षेत्रांमधील सततच्या गतीमुळे ही कामगिरी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 13, 2025 | 05:40 PM
BLS International ने नोंदवली आतापर्यंतची सर्वोच्च तिमाही कामगिरी (Photo Credit - X)

BLS International ने नोंदवली आतापर्यंतची सर्वोच्च तिमाही कामगिरी (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हिसा व डिजिटल सेवा क्षेत्रांत ४८.८% महसूल वाढ
  • चीन, कझाकस्तानमध्ये महत्त्वपूर्ण करार आणि आदरातिथ्य क्षेत्रात प्रवेश
  • आर्थिक कामगिरीचे प्रमुख वैशिष्ट्ये 

नवी दिल्ली: इंडियन मल्टी-नॅशनल कॉर्पोरेशन आणि सरकारी व नागरिकांसाठी जागतिक तंत्रज्ञान-सक्षम सेवा सहयोगी असलेल्या बीएलएस इंटरनॅशनल सर्विसेस लिमिटेड (BLS International Services Ltd.) ने ३० सप्टेंबर २०२५ रोजी समाप्त झालेल्या तिमाही आणि सहामाहीसाठी आपले एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने या तिमाहीत पुन्हा एकदा आपली सर्वोच्च कामगिरी नोंदवत जागतिक स्तरावर मजबूत उपस्थिती दर्शविली आहे.

प्रमुख धोरणात्मक यश आणि विस्तार

या तिमाहीत बीएलएस इंटरनॅशनलने अनेक महत्त्वाचे करार संपादन केले, ज्यामुळे त्यांचा पोर्टफोलिओ आणि भौगोलिक विस्तार वाढला आहे:

  • व्हिसा केंद्रे चीनमध्ये: भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने कंपनीला संपूर्ण चीनमध्ये भारतीय व्हिसा अर्ज केंद्रे स्थापन आणि चालवण्यासाठी तीन वर्षांचा करार दिला. हे यश भारत सरकारसोबतची दीर्घकालीन भागीदारी दर्शवते.
  • कझाकस्तानमध्ये सायप्रस व्हिसा: कंपनीने कझाकस्तानमध्ये सायप्रस व्हिसा प्रक्रिया कार्यान्वित करण्याची संधी मिळवली, ज्यामुळे मध्य आशियामध्ये त्यांची उपस्थिती आणखी दृढ झाली.
  • लॅटिन अमेरिकेत विस्तार: कंपनीने अर्जेंटिनामध्ये नवीन व्हिसा केंद्र सुरू केले; इक्वाडोरमधील केंद्र मोठे आणि आधुनिक केले; तसेच बोलिवियामध्ये भागीदार-चालित मॉडेलऐवजी स्व-चालित मॉडेल लागू केले.
  • UIDAI कडून मोठा करार: देशभरात जिल्हा-स्तरीय आधार सेवा केंद्रे स्थापन करण्यासाठी युनिक आयडेण्टिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडून अंदाजे ₹ २,०५५.३५ कोटी रुपयांचा दीर्घकालीन करार प्राप्त झाला.
  • आदरातिथ्य क्षेत्रात प्रवेश: कंपनीने युनायटेड किंग्डममधील ट्रेफेडियन हॉटेल ₹ ७८.३ कोटी रुपयांना संपादित करून आपल्या व्यवसाय पोर्टफोलिओमध्ये विविधता आणली.

Online Digital Life Certificate : जीवन प्रमाणपत्र सादर करताना घ्या काळजी..; नाहीतर सायबर चोरांकडून होऊ शकते आर्थिक फसवणूक

आर्थिक कामगिरीचे प्रमुख वैशिष्ट्ये (तिमाही – Q2 FY26)

बीएलएस इंटरनॅशनल सर्विसेस लि.चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. शिखर अग्रवाल यांनी या निकालांवर समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, व्हिसा व कॉन्सुलर सेवा आणि डिजिटल सेवा क्षेत्रांमधील सततच्या गतीमुळे ही कामगिरी साधली आहे.

तपशील (कोटी रूपये) आ.व. २६ ची दुसरी तिमाही आ.व. २५ ची दुसरी तिमाही वार्षिक वाढ
कार्यसंचालनांमधून महसूल ७३६.३ ४९५.० ४८.८ %
ईबीआयटीडीए २१२.८ १६४.० २९.७ %
करोत्तर नफा (PAT) १८५.७ १४५.७ २७.४ %
ईबीआयटीडीए मार्जिन २८.९ % ३३.१ % –
पीएटी मार्जिन २५.२ % २९.४ % –

इतर महत्त्वपूर्ण बाबी:

  • निव्वळ रोख शिल्लक: कंपनीने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ₹ १,३०६ कोटी रुपयांची मजबूत निव्वळ रोख शिल्लक राखली आहे (३१ मार्च २०२५ रोजी ₹ ९२८ कोटी).

विभागीय कामगिरीचा आढावा

१) व्हिसा व कॉन्सुलर व्यवसाय (एकूण महसूलात ६२% योगदान)

  • महसूल वाढ: वार्षिक ९.८% वाढीसह महसूल ₹ ४५८.६ कोटी रुपयांवर पोहोचला.
  • अर्ज वाढ: व्हिसा अर्जांची संख्या ११.७% ने वाढून ११.३ लाख झाली.
  • ईबीआयटीडीए मार्जिन: मार्जिनमध्ये वाढ होऊन ते ४१.९% झाले. याचे श्रेय भागीदार-चालित मॉडेलऐवजी स्व-व्यवस्थापित मॉडेल लागू करण्याला जाते.

२) डिजिटल व्यवसाय (एकूण महसूलात ३८% योगदान)

  • महसूल वाढ: महसूल वार्षिक २५९.३% च्या प्रचंड वाढीसह ₹ २७८.० कोटी रुपयांवर पोहोचला. हे प्रामुख्याने नोव्हेंबर २०२४ मध्ये अधिग्रहित केलेल्या अॅडिफिडेलिस सोल्यूशन्सच्या एकत्रीकरणामुळे झाले.
  • जी.टी.व्ही. (GTV): बिझनेस करस्पॉन्डंट विभागात तिमाहीत ₹ २७,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त ग्रॉस ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू दिसून आली.
  • कर्ज वितरण: आर्थिक संस्थांसाठी ₹ ८,६०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण सुलभ केले (मागील वर्षाच्या याच तिमाहीत ₹ १,४०० कोटी).
  • टचपॉइंट्स: व्यवसायाचे ४५,००० हून अधिक सीएसपी आणि १,४७,००० हून अधिक टचपॉइण्‍ट्स आहेत.

LNG Project: दहशतवादी हल्ल्यामुळे थांबलेला मोझांबिक एलएनजी प्रकल्प 53 महिन्यांनंतर पुन्हा मार्गावर; या प्रकल्पात भारताचा मोठा वाटा

Web Title: Bls international posts highest ever quarterly performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 05:38 PM

Topics:  

  • Business
  • Business News

संबंधित बातम्या

LNG Project: दहशतवादी हल्ल्यामुळे थांबलेला मोझांबिक एलएनजी प्रकल्प 53 महिन्यांनंतर पुन्हा मार्गावर; या प्रकल्पात भारताचा मोठा वाटा
1

LNG Project: दहशतवादी हल्ल्यामुळे थांबलेला मोझांबिक एलएनजी प्रकल्प 53 महिन्यांनंतर पुन्हा मार्गावर; या प्रकल्पात भारताचा मोठा वाटा

IEA Global Outlook 2025 : ऊर्जा क्रांतीकडे भारताचे पाऊल! ‘या’ विकसित देशांनाही मागे टाकत तेल मागणीत अव्वल स्थान पटकावणार?  
2

IEA Global Outlook 2025 : ऊर्जा क्रांतीकडे भारताचे पाऊल! ‘या’ विकसित देशांनाही मागे टाकत तेल मागणीत अव्वल स्थान पटकावणार?  

Gold Rate : सोनं 8 लाखांवर अन् चांदी 3 लाख रुपये प्रति किलोने विकली जाणार, धडकी भरवणारी भविष्यवाणी कोणी केली?
3

Gold Rate : सोनं 8 लाखांवर अन् चांदी 3 लाख रुपये प्रति किलोने विकली जाणार, धडकी भरवणारी भविष्यवाणी कोणी केली?

12 वर्षात पहिल्यांदाच घडले! ऑक्टोबरमध्ये महागाईचा विक्रमी निचांकी टप्पा, 0.25% वर किरकोळ महागाई दर
4

12 वर्षात पहिल्यांदाच घडले! ऑक्टोबरमध्ये महागाईचा विक्रमी निचांकी टप्पा, 0.25% वर किरकोळ महागाई दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.