Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget 2024: ‘बजेट’ हा शब्द नेमका आला तरी कुठून? जाणून घ्या भारताच्या बजेटचे फ्रान्ससोबत असणारे कनेक्शन

मोदी सरकाच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला बजेट दिनांक २३ जुलै रोजी सादर होणार असून देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण हा बजेट सादर करणार आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे, की रोजच्या व्यवहारात वापरला जाणारा 'बजेट' शब्द नेमका आला तरी कुठून? चला जाणून घेऊया, या विशेष लेखामधून.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 19, 2024 | 05:57 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:

देशाचा बजेट सादर होण्यास आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहे. बजेट सादर करण्याची तयारी सध्या जोरात चालू असून सामान्य नागरिकांना या बजेटकडून खूप अपेक्षा आहे. तसेच अनेक उद्योजकांची नजर सुद्धा या बजेटकडे आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण २३ जुलैला भारताचा बजेट सादर करणार आहेत.

दरवर्षी केंद्र सरकार लोकसभेत बजेट सादर करीत असतात, परंतु आश्चर्याची बाब ही आहे की भारताच्या संविधानात बजेट या शब्दचा उल्लेख देखील नाही. मग प्रश्न असा निर्माण असा होतो की हा बजेट नावाचा शब्द नेमका आला कुठून? आता काहीजण म्हणतील, अनेक शब्दांसारखा हा शब्द देखील इंग्रजांसोबतच आला असेल, पण हे सत्य नाही. चला जाणूया, बजेट शब्द नेमका आला कुठून आणि त्याचे फ्रांससोबत असणारे कनेक्शन.

असा तयार झाला ‘बजेट’ शब्द

बजेट हा आज जरी इंग्रजी शब्द मानला गेला असला तरी त्याची उत्पत्ती Bougette या फ्रेंच शब्दापासून झाली आहे. या फ्रेंच शब्दाचा अर्थ बॅग किंवा पाकीट असा होतो. Bougette हा शब्द देखील Bouge पासून घेतला आहे ज्याचा अर्थ लेदर ब्रीफकेस असा आहे.

भारतीय अर्थसंकल्पाचा इतिहास खूप जुना आहे. 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर ब्रिटीश सरकारने भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून घेतला. यानंतर 1860 मध्ये भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्याच वर्षी ब्रिटनमध्ये चामड्याच्या ब्रीफकेसमध्ये बजेट आणण्याची परंपरा सुरू झाली. 1860 मध्ये, ब्रिटनचे चॅन्सेलर ऑफ द एक्स्चेक्वर चीफ विल्यम इवर्ट ग्लॅडस्टन लेदर बॅगमध्ये बजेट पेपर्स सादर करण्यासाठी आले. या बॅगवर ब्रिटीश राणीचा मोनोग्राम देखील होता, ज्याला ग्लॅडस्टन बॉक्स असे नाव देण्यात आले होते. तसेच अर्थसंकल्प सादर करताना ब्रीफकेस आणण्याची परंपरा सुरू झाली.

निर्मला सीतारमण यांचा बदल

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या पहिल्या बजेटदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या ब्रीफकेस परंपरेला छेद दिला आणि ब्रीफकेसऐवजी लाल कपड्यात गुंडाळलेले बजेट आणण्यास सुरुवात केली. या कृतीवर तत्कालीन मुख्य आर्थिक सल्लागार के सुब्रमण्यन यांनी पाश्चिमात्य मानसिकतेच्या गुलामगिरीतून बाहेर येण्याचे प्रतिक असे वर्णन केले होते.

Web Title: Union budget 2024 where exactly does the word budget come from know the connection of indias budget with france

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 05:57 PM

Topics:  

  • Budget
  • Budget 2024
  • union budget
  • Union Budget 2024
  • Viksit Bharat

संबंधित बातम्या

Sangli Budget: सांगली मनपाने जाहीर केले अकराशे कोटींचे बजेट; नागरिकांवर वाढीव घरपट्टीचा बोजा…
1

Sangli Budget: सांगली मनपाने जाहीर केले अकराशे कोटींचे बजेट; नागरिकांवर वाढीव घरपट्टीचा बोजा…

Pune News: पुणे महापालिकेची ‘ही’ शेवटची बैठक; तब्बल 150 कोटींच्या प्रस्तांवाना मंजुरी
2

Pune News: पुणे महापालिकेची ‘ही’ शेवटची बैठक; तब्बल 150 कोटींच्या प्रस्तांवाना मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.