Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गावात सुरु करा ‘हे’ व्यवसाय; कमी भांडवलात मिळेल बक्कळ कमाई!

Business ideas : गावात करण्यासारखे असे अनेक व्यवसाय आहेत. जे तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकतात. किराणा दुकान, पिठाची गिरणी हे काही व्यवसाय ग्रामीण भागात करता येणारे प्रभावी व्यवसाय आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jun 14, 2024 | 11:52 AM
Business ideas for rural area that can earn more profit

Business ideas for rural area that can earn more profit

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या घडीला ग्रामीण भागात शेतीवरील अवलंबित्व वाढले आहे. त्या तुलनेत नैसर्गिक संकटे आणि पिकांना न मिळणारा योग्य भाव यामुळे अनेक जण अन्य व्यवसाय क्षेत्राकडे वळण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आता तुम्हाला तुमचे गाव न सोडता, काही उद्योगधंदा सुरु करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण गावाकडे करता येणाऱ्या पाच सर्वाधिक नफा मिळवून देण्याऱ्या पाच महत्वाच्या व्यवसायांबद्दल माहिती सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गावातच रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.

‘हे’ आहेत ५ महत्वाचे व्यवसाय

किराणा दुकान

गावामध्ये राहणाऱ्या लोकांना दैनंदिन जीवनातील विविध प्रकारचे सामान खरेदीसाठी नेहमीच शहराची वाट धरावी लागली. तर ते त्यांच्यासाठी खर्चिक ठरते. याशिवाय त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास देखील सहन करावा लागतो. मात्र, गावातील नागरिकांना गावातच सर्व वस्तू मिळणारे दुकान उपलब्ध झाले तर त्यांना शहरात जाण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे गावातील लोकांची तर सोय होणारच आहे. मात्र, तुम्हाला देखील व्यवसायाचा चांगला पर्याय उपलब्ध होऊन, तुम्हाला चांगली कमाई देखील होणार आहे. मात्र, किराणा दुकान उभारताना तुम्ही सुरु करत असलेल्या भागात दुसरे किराणा दुकान जवळपास नसावे.

पिठाची गिरणी

गावात पीठाची गिरणी सुरु करणे, हा एक उत्तम नफा मिळवून देणारा व्यवसाय ठरू शकतो. खेड्यांमध्ये, शेतकरी गहू, तांदूळ, मका, बाजरी, ज्वारी यांसारखी विविध तृणधान्ये पिकवतात. त्यामुळे गावांमध्ये रेडिमेड पिठाची मागणी खूपच कमी असते. अशावेळी तुम्ही गावामध्ये पिठाची गिरणी सुरु करून प्रभावीपणे व्यवसाय करू शकतात.

[read_also content=”देशात गव्हाचा मुबलक राखीव साठा; गहू दरवाढीबाबत केंद्राचे स्पष्टीकरण! https://www.navarashtra.com/business/sufficient-stock-of-wheat-in-the-country-government-explanation-547827.html”]

कापड दुकान

आजकाल फॅशनेबल कपड्यांची मागणी ही केवळ शहरी भागातच नाही तर गावांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे तुम्ही गावात एखादे स्वस्त आणि मस्त कपड्यांचे दुकान गावात सुरु केले तर गावातील लोकांची कपडे खरेदीसाठी शहरात जाण्याची पायपीट वाचणार आहे. परिणामी, एक चांगले कपड्यांचे दुकान हे गावात सुरु करता येणारी एक व्यवसाय कल्पना ठरू शकते. तसेच तुम्हाला रोजगाराचे साधन देखील उपलब्ध होणार आहे.

खते आणि कीटकनाशकांचे दुकान

ग्रामीण भागाचा आणि शेतीचा थेट संबंध आहे. शेतीसाठी शेतकऱ्यांना नेहमीच मोठ्या प्रमाणात साधनांची आवश्यकता असते. ज्यासाठी शेतकऱ्यांना नेहमीच शहरात जावे लागते. याशिवाय खते घरी आणण्यासाठीचा त्यांचा वाहतूक खर्च देखील वाढतो. त्यामुळे तुम्हीही ग्रामीण भागात एखादे खते आणि कीटकनाशकांचे दुकान सुरू केले तर हा एक चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय ठरू शकतो. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला अधिकच्या भांडवलाची देखील आवश्यकता नसते.

डेअरी व्यवसाय

गाव म्हटले की शेती आणि शेती म्हटले जनावरे यांचा जवळचा संबंध आहे. ज्यात दुग्ध व्यवसाय देखील मोडतो. मात्र, शेतकऱ्यांना आपल्या गायी-म्हशींचे दूध शहरी भागातील डेअरी घेऊन जावे लागते. अशावेळी तुम्ही गावातच एखादी डेअरी सुरु केली तर शेतकऱ्यांसह तुम्हाला देखील मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे. तसेच रोजगाराचे एक प्रभावी साधा उपलब्ध होणार आहे.

Web Title: Business ideas for rural area that can earn more profit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2024 | 11:52 AM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

Bank of India FD Rates: कमाईची मोठी संधी! बँक ऑफ इंडियाचे नवे FD दर जाहीर , जाणून घ्या किती होईल फायदा
1

Bank of India FD Rates: कमाईची मोठी संधी! बँक ऑफ इंडियाचे नवे FD दर जाहीर , जाणून घ्या किती होईल फायदा

भारतीय विमा क्षेत्रात मोठी घडामोडी! लिबर्टी म्युच्युअलने ‘लिबर्टी जनरल इन्शुरन्स’मधील हिस्सा ७४ टक्क्यांवर नेला
2

भारतीय विमा क्षेत्रात मोठी घडामोडी! लिबर्टी म्युच्युअलने ‘लिबर्टी जनरल इन्शुरन्स’मधील हिस्सा ७४ टक्क्यांवर नेला

Narendra Modi : “भारतात गुंतवणुकीची सुवर्णसंधी…”, युरोप दौऱ्यात पीएम मोदींची मोठी घोषणा
3

Narendra Modi : “भारतात गुंतवणुकीची सुवर्णसंधी…”, युरोप दौऱ्यात पीएम मोदींची मोठी घोषणा

FD, Mutual Fund की Gold? 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवल्यास कोण देईल सर्वात तगडा रिटर्न?
4

FD, Mutual Fund की Gold? 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवल्यास कोण देईल सर्वात तगडा रिटर्न?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.