Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

50 कोटींची कंपनी विकून ‘हा’ Businessman घेणार संन्यास! जंगलात घालवणार उर्वरित आयुष्य

Businessman Decides To Monk : संपत्ती आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अचानक एका यशस्वी उद्योगपतीने आपला तब्बल ५० कोटी रुपयांचा व्यवसाय विकून संन्यास घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. सर्व ऐशोआराम सोडून उर्वरित आयुष्य जंगलात एका साध्या साधूच्या रूपात घालवण्याचा त्यांचा संकल्प आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 04, 2026 | 04:40 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘हा’ Businessman घेणार संन्यास!
  • 50 कोटींची कंपनी विकणारृ
  • जंगलात घालवणार उर्वरित आयुष्य
Business Empire To Monk : तुमच्या आयुष्यातलं अंतिम ध्येय काय असा प्रश्न विचारला तर तुम्ही वेगवेगळी उत्तर द्याल. पण असं म्हटलं जातं की पैसा आणि व्यवसाय हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं अंतिम ध्येय नसतं. कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभारल्यानंतर व्यवसायिक अचानक सर्व काही सोडून संन्सास घेण्याचा निर्णय घेतो. हे काहीसं आश्चर्यकारक वाटेल. पण हे खरं आहे. कोण आहेत हे बिजनेसमॅन ज्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला? ( Business Empire To Monk ) 

SBI बँकेत तुमचं अकाऊंट आहे का? तर आत्ताच Alert व्हा! बदलणार आहेत नियम; तुमच्या खिशावरही पडणार भार…

एकेकाळी व्यावसायिक जगतात नावलौकिक मिळवलेल्या व्यावसायिकाने हे उदारहरण घालून दिलं आहे. त्यांचं नाव आहे सिरिपोंग अक्काराश्रीउक. ‘हावेल्स’ या आईस्क्रीम ब्रँडचे चेअरमन असलेले सिरीपोंग, आपला व्यवसाय अंदाजे ६ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ५० कोटींहून अधिक रुपयांना विकण्याच्या तयारीत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपला व्यवसाय विकून दुसऱ्या व्यवसायात जाण्याऐवजी, त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. जंगलात ध्यान आणि आध्यात्मिक साधना करत आपले जीवन व्यतीत करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

कधी सुरु केला होता आईस्क्रीमचा व्यवसाय ?

उद्योजक सिरीपोंग अक्कारास्रिउक यांनी १९९९ मध्ये Howells हा आईस्क्रीम ब्रँड सुरू केला होता. एकेकाळी, हा ब्रँड थायलंडमध्ये खूप लोकप्रिय होता. त्यानंतर हळूहळू तो सगळीकडे विस्तारला आणि त्याची अनेक दुकाने उभारली. पण, गेल्या काही वर्षांपासून ‘हावेल्स’च्या दुकानांची संख्या कमी झाली आहे आणि आता फक्त एकच स्वतंत्र दुकान शिल्लक आहे.

किती दशलक्ष डॉलर्समध्ये विकला जाणार बिझनेस?

उद्योजक सिरीपोंग यांनी त्यांच्या संपूर्ण व्यवसायाची अंदाजे १६५ दशलक्ष बाथ, म्हणजेच ६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचं सांगितले आहे. या करारामध्ये केवळ आईस्क्रीम ब्रँडच नाही, तर अनेक प्रमुख व्यावसायिक मालमत्ता या सगळ्याचा समावेश असणार आहे. या पॅकेजमध्ये अंदाजे २.७७ एकर जमीन, ऑफिस, कारखाने, एक हॉवेल्स आउटलेट, ट्रेडमार्क्स, व्यावसायिक तज्ञ आणि आईस्क्रीमची रेसीपी यांचाही समावेश आहे.

हा व्यवसाय विकण्याचा निर्णय का घेतलाय?

सिरीपोंग यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्ट केले की, त्यांनी केवळ आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी आपला व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला नाही. तर हॉवेल्सचा व्यवसाय वाढवण्यात येणाऱ्या अडचणी हे देखील एक प्रमुख कारण आहे. त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या दोन वर्षांत शॉपिंग मॉल्समध्ये नवीन आउटलेट्स उघडण्याचे प्रयत्न केला गेला पण त्यांच्या दुकानासाठी जागा मिळू शकली नाही.

सिरीपोंग यांच्या मते, अनेक जुने भाडेकरू निघून गेल्यानंतर मॉल्समध्ये जागा रिकामी असूनही, हॉवेल्सला विस्तार करण्याची संधी मिळाली नाही. यामुळेच हॉवेल्स, जे एकेकाळी थायलंडमधील एक अत्यंत प्रसिद्ध व्यक्ती होते, ते आता केवळ एक स्वतंत्र अस्तित्व म्हणून मर्यादित राहिले आहेत.

15 वर्षांपासून या प्लॅनची तयारी सुरु

उद्योजक सिरीपोंग म्हणाले की, त्यांनी सुमारे १५ वर्षांपूर्वी आपल्या आयुष्याच्या पुढील टप्प्याची तयारी सुरू केली होती. आता त्यांनी भिक्षू बनण्याचा पूर्णपणे निश्चय केला आहे.

Free Recharge… एक फोटो पाठवा आणि FASTag वर मिळवा 1000 रुपये! कसा मिळणार लाभ? NHAI ने केला खुलासा

Web Title: Businessman sells 50 crore company to become monk live in forest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • Business Man

संबंधित बातम्या

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य
1

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य

Washim News: वाशिम जिल्ह्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद; दर बुधवारी एमआयडीसी अधिकाऱ्यांची उपस्थिती
2

Washim News: वाशिम जिल्ह्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद; दर बुधवारी एमआयडीसी अधिकाऱ्यांची उपस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.