संग्रहित फोटो
ही घटना ३१ मे २०१८ रोजी रात्री कात्रज बोगद्याजवळील दरीपूल परिसरात घडली होती. याबाबत ट्रकमालक इब्राहिम सय्यद यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. मृत ट्रकचालक लालजी पाल यांच्या ट्रकचा आरोपींच्या ट्रॅव्हलर बसच्या आरशाला धक्का लागला होता. यावरून झालेल्या वादात आरोपींनी पाल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. तसेच, त्यांचे डोके सिमेंटच्या ठोकळ्यावर आपटल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. घटनास्थळी पोहोचलेले पोलिस कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. मृत्यूपूर्वी पाल यांनी फिर्यादी आणि पोलिसांना दिलेली तोंडी माहिती न्यायालयाने मृत्यूपूर्व जबाब म्हणून ग्राह्य धरली. तर आरोपींचा खून करण्याचा पूर्वनियोजित हेतू नसल्याने न्यायालयाने खुनाऐवजी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोघांना दोषी ठरवले.
मृताचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळालेला असतानाही तपास अधिकाऱ्यांनी तो न्यायालयात सादर न केल्याने पोलिसांच्या कामावर न्यायालयाने ताशेरे ओढले. मात्र, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या साक्षीतून डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तपासातील त्रुटींचा फायदा आरोपींना देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
बसच्या आरशाला धक्का लागणे हे मारहाणीचे कारण ठरू शकत नाही. आरोपींकडे कायदेशीर मार्ग उपलब्ध असतानाही त्यांनी हिंसक मार्ग स्वीकारला. अशा घटनांचे प्रमाण वाढत असल्याने आरोपींना कठोर शिक्षा सुनावणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद कोंघे यांनी केला. आरोपींचा खून करण्याचा हेतू नव्हता. तसेच त्यांच्यावर कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी आहे. या बाबी विचारात घेऊन न्यायालयाने त्यांना पाच वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
Ans: ट्रकचालकाला मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमोल गाडेकर आणि अस्लम मुल्ला या दोघांना सत्र न्यायालयाने प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
Ans: ट्रकचालकाच्या मारहाणीचे नेमके कारण काय होते?
Ans: आरोपींचा खून करण्याचा पूर्वनियोजित हेतू नसल्याने न्यायालयाने त्यांना खुनाऐवजी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले. दोघांना प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.






