सहकारी बँकांचे कामकाज नियमित सुरू राहणार! ( सौजन्य - सोशल मीडिया )
सहकारी बँकांमध्ये राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था PACS या संस्थांचा यात समावेश आहे. या सर्व बँका संपात सहभागी होणार नाहीत आणि नेहमीप्रमाणे सुरू राहतील. सहकारी बँक कर्मचारी संघटनांनी स्पष्ट केले आहे की, त्यांच्या शाखांमध्ये रोख रक्कम जमा करणे आणि काढणे, ग्रामीण व्यवहार आणि चेक क्लिअरन्स यांसारख्या सर्व अत्यावश्यक सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.
या संपाच्या काळात सहकारी बँकांनी ग्राहकांना आश्वासन दिले आहे की, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स म्हणजेच UFBU ने पुकारलेल्या २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत तीन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. या काळात देशभरातील बँकांच्या शाखा बंद राहतील. पण, एटीएम आणि ऑनलाइन बँकिंग सेवा विनाअडथळा सुरू राहतील. या संपासंदर्भात, NAFCUB, NUCFDC आणि NAFSCoB सारख्या प्रमुख सहकारी बँकिंग संस्थांनी स्पष्ट केले आहे की, सहकारी बँका या तीन दिवसांच्या संपात सहभागी होणार नाहीत. या काळात, सर्व सहकारी बँका सुरू राहतील आणि कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील.
सहकारी बँकिंग नेटवर्कमध्ये खालील बँकांचा समावेश आहे…
१,४५० शहरी सहकारी बँका (UCBs)
३४ राज्य सहकारी बँका (STCBs)
आणि ३५१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका (DCCBs)
सहकारी बँका गावे, शहरे आणि महानगरांमध्ये यांचा विस्तार पसरलेला आहेत. त्या प्रामुख्याने शेतकरी, ग्रामीण कुटुंबे, छोटे व्यावसायिक, व्यापारी आणि उद्योजकांना सेवा देतात. ठेवी, पैसे काढणे आणि हस्तांतरण यांसारख्या सामान्य बँकिंग सेवा बँकेच्या शाखांमध्ये नेहमीप्रमाणे सुरू राहतील. ग्राहकांना संबंधित बँक शाखेच्या नियमांनुसार या सेवा मिळत राहतील.






