Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅफे अकासाचा ‘मॉन्सून स्पेशल मील’ लॉन्च; पावसाळ्यातील चवींचा खास आस्वाद आता विमानप्रवासातही

कॅफे अकासाने पावसाळ्याच्या निमित्ताने ‘मॉन्सून स्पेशल मील’ ची चौथी आवृत्ती सादर केली आहे. या विशेष मेनूमध्ये पोटली, चायनीज समोसे, टोमॅटो साल्सा, रबडीसह मालपुआ आणि पेय यांचा समावेश आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 04, 2026 | 06:11 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

अकासा एअरची ऑनबोर्ड भोजन सेवा कॅफे अकासा पुन्हा एकदा प्रवाशांसाठी खास हंगामी मेनू घेऊन आली आहे. पावसाळ्याच्या स्वागतासाठी कंपनीने आपल्या ‘मॉन्सून स्पेशल मील’ ची चौथी आवृत्ती सादर केली असून, पारंपरिक आणि आवडीच्या पदार्थांचा अनोखा संगम या मेनूमध्ये अनुभवायला मिळणार आहे. आरामदायी आणि पावसाळ्यात खाण्याची इच्छा होणाऱ्या पदार्थांना लक्षात घेऊन हा विशेष मेनू तयार करण्यात आला आहे. या मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असलेल्या जेवणामध्ये पोटली, चायनीज समोसे, त्यासोबत टोमॅटो साल्सा, गोडासाठी रबडीसह मालपुआ आणि आवडीचे पेय असा स्वादिष्ट मेनू समाविष्ट करण्यात आला आहे. कुरकुरीत, चविष्ट आणि पारंपरिक भारतीय गोड पदार्थांचा मिलाफ या जेवणात करण्यात आला असून, पावसाळ्याच्या आठवणींना उजाळा देणारा अनुभव प्रवाशांना मिळणार आहे.

कांद्याने नाही तर आता टोमॅटोने रडवलं, भाव पुन्हा कडाडले; काही दिवसांत 100 रुपये किलो होणार?

हे विशेष ‘मॉन्सून स्पेशल मील’ अकासा एअरच्या संपूर्ण नेटवर्कवर १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत उपलब्ध असणार आहे. प्रवासी हे जेवण अकासा एअरच्या अधिकृत वेबसाइट आणि मोबाईल ॲपद्वारे आगाऊ बुक करू शकतात. त्यामुळे प्रवासादरम्यान आपल्या आवडीचे हंगामी जेवण सहज उपलब्ध होणार आहे.

पावसाळा म्हटला की गरमागरम आणि चविष्ट पदार्थांची आठवण प्रत्येकाला येते. याच भावनेला अनुसरून कॅफे अकासाने हा मेनू तयार केला आहे. विमानप्रवासातही पावसाळ्यातील खास चवींचा आनंद घेता यावा, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

कॅफे अकासा वर्षभर विविध सण आणि ऋतूनुसार विशेष मर्यादित आवृत्तीचे मेनू सादर करत असते. मकरसंक्रांत, व्हॅलेंटाईन डे, होळी, ईद, इस्टर, मदर्स डे, आंतरराष्ट्रीय योग दिन, नवरोज, ओणम, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, बालदिन आणि ख्रिसमस अशा विविध सणांच्या निमित्ताने प्रवाशांसाठी खास पदार्थ उपलब्ध करून दिले जातात. तसेच विमानातच वाढदिवस किंवा इतर खास प्रसंग साजरे करण्यासाठी केक प्री-बुक करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारने कांदा खरेदी दरात केली वाढ, आता प्रति क्विंटल मिळणार तब्बल इतकी रक्कम

सध्या कॅफे अकासाच्या मेनूमध्ये ४५ हून अधिक खाद्यपदार्थांचे पर्याय उपलब्ध असून, त्यात फ्युजन मील, प्रादेशिक चवींचा समावेश असलेले स्नॅक्स, विविध प्रकारची मिठाई आणि ताजेतवाने पेये यांचा समावेश आहे. भारतातील नामांकित शेफ यांच्या मार्गदर्शनाखाली हे पदार्थ तयार करण्यात आले असून, विविध खाद्यपसंती आणि आहाराच्या गरजा लक्षात घेऊन हा मेनू विकसित करण्यात आला आहे.

Web Title: Cafe akasas monsoon special meal launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • coffee
  • monsoon recipe

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.