CobraPost investigation: ५ वर्षांत २५ हजार कोटी रोख व्यवहार; १४ बँकांचा उल्लेख, कोबरापोस्टचा खळबळजनक अहवाल
कोबरापोस्टने असा आरोपही केला आहे की त्यांच्या विश्लेषणात काही क्रेडिट रेटिंग एजन्सी, ऑडिटिंग फर्म्स आणि ईशा फाउंडेशनसारख्या नॉन-प्रॉफिट संस्थांची ओळख पटली आहे,
CobraPost investigation: चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनीचे शेअर्स मंगळवारी ६% पर्यंत वाढले, त्यामुळे सोमवारी झालेला संपूर्ण तोटा भरून निघाला. सोमवारी बाजार बंद होईपर्यंत मागील सहा ट्रेडिंग सत्रांपैकी पाच सत्रांत हा शेअर घसरला होता आणि या कालावधीत सुमारे ९% घसरण झाली होती. डिजिटल पोर्टल कोबरापोस्टने चोलामंडलम, मुरुगप्पा ग्रुप ऑफ कंपनिज आणि त्यांच्या प्रमोटर्सवर कॉपेरिट गव्हर्नन्ससंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. कोबरापोस्टच्या अहवालानुसार, १०, २६२ कोटी रुपयांचे रिलेटेड पार्टी ट्रान्झेंक्शन्स झाले असून त्यात मुरुगप्पा ग्रुपच्या कंपन्यांशी झालेले व्यवहारही समाविष्ट आहेत. या व्यवहारांची नियामक तपासणी होणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
अहवालात पुढे म्हटले की, मुरुगप्पा ग्रुपने गेल्या पाच वर्षांत २५,०८९ कोटी रुपयांच्या रोख ठेवींची नोंद केली आहे. ही रक्कम अत्यंत मोठी व असामान्य असून सीआयएफसीएलसाठी अॅसेट क्वालिटी रिस्क दर्शवते. याशिवाय, ऑडिटरच्या फीमध्ये अचानक झालेल्या वाढीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कंपनी आणि चोला एमएस इन्शुरन्सने केलेल्या रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर्समध्ये नॉन-डिस्क्लोजर व नॉन-कम्प्लायन्सचे अनेक आरोप आहे.
मुरुगप्पा कुटुंबातील सदस्यांना करण्यात आलेल्या पेमेंटबाबतही कोबरापोस्टने चिंता व्यक्त केली असून ही रक्कम खूप जास्त असल्याचे म्हटले आहे. तसेच क्रेडिट रेटिंग एजन्सींना दिलेल्या पेमेंटवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
कोबरापोस्टने असा आरोपही केला आहे की त्यांच्या विश्लेषणात काही क्रेडिट रेटिंग एजन्सी, ऑडिटिंग फर्म्स आणि ईशा फाउंडेशनसारख्या नॉन-प्रॉफिट संस्थांची ओळख पटली आहे, ज्यांना सीआयएफसीएल आणि मुरुगाध्या ग्रुपच्या इतर कंपन्यांकडूनही निधी मिळाला आहे. न्यूज वेबसाइटच्या निवेदनानुसार, कोबरापोस्टने तपासलेल्या फाइलिंग्स आणि संबंधित नोंदीवरून या संस्थांना तपास कालावधीत एकूण सुमारे १२० कोटी रुपये मिळाल्याचे आढळले आहे.
याशिवाय, इन्कम टॅक्स अॅक्टच्या सेवशन २६९ टीनुसार, एखाद्या आर्थिक वर्षात रोख पावत्या २०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यास टॅक्स ऑडिट अहवालात ओळख व पॅनची माहिती देणे बंधनकारक आहे.
कोबरापोस्ट अहवालातील आरोपांवर विश्लेषकानी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, २५,००० कोटी रुपयांची रोख ठेव ही चोलामंडलम इन्व्हेस्टमेंटच्या एकूण कलेक्शनच्या १२% पेक्षाही कमी आहे आणि ती सकारात्मक मानली पाहिजे, कारण रोख कलेक्शन एकूण कलेक्शनच्या सुमारे २०% ते ४०% असते.
विश्लेषकांचे म्हणणे आहे की चोला एमएसकडून विविध ग्रुप कंपन्यांना केलेले पेमेंट हे उद्योगातील प्रचलित पद्धतीनुसार आहे आणि ऑडिटरचे मानधन त्यांना जास्त वाटत नाही, इन्शुरन्सच्या बाबतीत, अनेक इतर एनबीएफसीनेही आर्थिक वर्ष २०२५ पासून इन्शुरन्स उत्पन्नाबाबत आपली पद्धत बदलली आहे. स्टैंडअलोन इन्शुरन्स फी उत्पन्नात १३५% वाढ झाली असली तरी कन्सॉलिडेटेड आधारावर वर्षांगणिक ही वाढ ४३% पर्यंत घटते.
कंपनीची भूमिका
चोलामंडलमने मंगळवारी दिलेल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, कंपनीची अॅसेट क्वालिटी, लिक्विडिटी पोझिशन आणि इतर अॅसेट्स हे फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये दाखविल्याप्रमाणे मजबूत आहेत. यापूर्वी दिलेल्या मार्गदर्शनात कोणताही बदल केलेला नाही आणि कंपनी बोर्डाने मंजूर केलेल्या बिझनेस प्लॅननुसारच काम करत राहील, चोलामंडलमने हे आरोप दुर्भावनापूर्ण आणि फसवे असल्याचे म्हटले आहे. सर्व रिलेटेड पार्टी ट्रान्झेंक्शन्सची माहिती फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये पूर्ण आणि तपशीलवार दिली असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
Web Title: Cobrapost investigation 25000 crore cash deposits in 5 years cobrapost makes explosive revelations