
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
तर त्याचं उत्तर हो आहे. अनेक बँका बँक खाते नसलेल्यांनाही क्रेडिट कार्ड देतात. पण तज्ञांच्या मते, बँका सर्वप्रथम अर्जदाराचे उत्पन्न, व्यवसाय, क्रेडिट स्कोअर आणि वेळेवर पैसे भरण्याची क्षमता विचारात घेतात. जर हे निकष पूर्ण झाले, तर बँक खाते नसतानाही क्रेडिट कार्ड देऊ शकते. नेमके कोणते कोणते पर्याय आहेत?
कधीकधी, काही व्यक्तींकडे बँक अकाऊंट नसतं आणि क्रेडिट हिस्ट्रीदेखील नसते. अशा परिस्थितीत, काही बँका एफडीच्या आधारातवर तुम्हाला क्रेडिट कार्ड जारी करतात. यामुळे व्यक्तींना एक मजबूत क्रेडिट हिस्ट्री तयार करण्याची संधी मिळते. याचा अर्थ, त्यांना क्रेडिट कार्ड मिळते आणि त्यांची क्रेडिट हिस्ट्रीसुद्धा अधिक मजबूत होते. त्यामुळे जर तुम्हालाही क्रेडिट कार्ड हवं असेल तर तुम्ही FD च्या आधारावर तुम्हाला ते मिळून जाईल.
क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना तुम्हाला तुमची काही कागदपत्र सादर करवी लागतात. त्याच तुमच्या ओळखीचा प्रुफ म्हणून तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि उत्पन्नाशी संबंधित इतर काही कागदपत्रे सादर करावी लागतात. पण इतकंच पुरेसं नसत. प्रत्येक बँकेच्या स्वतःच्या अटी आणि नियम वेगळे असतात. त्यामुळे त्यानुसार तु्म्हाला कागदपत्रांची गरज लागते.
लोकांचा अनेकदा असा समज होतो की प्रीपेड कार्ड हे क्रेडिट कार्डला पर्याय आहेत. पण हा सगळा समज पण तसे नाही. प्रीपेड कार्डमध्ये आधीच पैसे भरून तुम्ही तुमचे स्वतःचे पैसे खर्च करू शकता. पण क्रेडिट कार्डचा वापर तुमच्या खिशात पैसे नसतानाही करु शकतात.
क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड आहेत. क्रेडिट कार्डचा योग्य वापर केला तर तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकतो, आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या पुढच्या खर्चात मिळणाऱ्या सोयींसाठी होतो. तर प्रीपेड कार्ड वापरल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरवर कोणताही परिणाम होत नाही.
प्रीपेड कार्ड हे एक असे कार्ड आहे ज्यामध्ये आधीच काही रक्कम भरलेली असते. वापरकर्ता फक्त कार्डवर आधीपासून असलेल्या रकमेपर्यंतच खर्च करू शकतो. त्यामुळे, प्रीपेड कार्डला क्रेडिट कार्ड मानले जात नाही.
तज्ञांच्या मते, क्रेडिट कार्डचा वापर नेहमीच विचारपूर्वक केला पाहिजे. तुम्हाला जमेल तितका खर्च करा आणि वेळेवर परतफेड करा. योग्य प्रकारे वापरलेले क्रेडिट कार्ड गरजेच्या वेळी खूप उपयुक्त ठरू शकते. तज्ञ असाही सल्ला देतात की, क्रेडिट कार्ड खरेदी करण्यापूर्वी, त्याचा व्याजदर, वार्षिक शुल्क, विलंब शुल्क आणि इतर शुल्के यांची संपूर्ण माहिती करून घेणं गरजेचं आहे.