
Croma and Kearney Reveal Changing Consumer Electronics Buying Trends in India ( क्रोमा (Croma) आणि किर्नी (Kearney) यांनी भारतातील ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स खरेदीच्या बदलत्या कलानंविषयी माहिती दिली ) फोटो सौजन्य AI
भारतातील ग्राहकांचा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला आहे, हे या अहवालातून दिसून येते. यासोबतच, देशातील खरेदीच्या पुढील नवीन पर्वाला दिशा देणाऱ्या मुख्य कारणांचाही या अहवालात वेध घेण्यात आला आहे.
शिबाशिष रॉय, सीईओ आणि एमडी, इन्फिनिटी रिटेल लिमिटेड-क्रोमा म्हणाले की,“गेल्या दोन दशकांत भारतातील ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ पहिल्यांदाच एखादी वस्तू खरेदी करण्याच्या टप्प्यापासून पुढे सरकली आहे. आता ग्राहकांचा कल अधिक चांगला अनुभव, उच्च आकांक्षांची पूर्तता आणि सतत ‘अपग्रेड’ होण्याकडे वाढत असल्याचे आम्ही पाहिले आहे. ‘हाऊ इंडिया अपग्रेड्स’ या अहवालाद्वारे आम्ही ग्राहकांच्या सवयींमधील हेच बदल आणि या क्षेत्राची भविष्यातील दिशा समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
Sahara Refunds: मोठी अपडेट! बँक खात्यात 7 दिवसात पाठविण्यात आले तब्बल 22,10,00,000 रुपये
तंत्रज्ञान जसजसे अधिक आधुनिक होत आहे, तसतशी क्रोमामधील आमची भूमिका हीच आहे की आम्ही योग्य उत्पादने, तज्ञांचा सल्ला, किफायतशीर योजना आणि विक्रीनंतरची उत्तम सेवा देऊन ग्राहकांचा इलेक्ट्रॉनिक्स खरेदी आणि वापराचा प्रवास सोपा करावा; जेणेकरून देशभरातील ग्राहक पूर्ण विश्वासाने अपग्रेड करू शकतील.”
कौशिका माधवन, चेअरमन, कार्नी इंडिया म्हणाल्या की,“भारतातील ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाचे भविष्य केवळ किती उपकरणांची विक्री होते यावर ठरणार नाही, तर ग्राहक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपले जीवनमान कसे उंचावतात यावर ठरेल. प्रीमियम उत्पादनांना मिळणारी वाढती पसंती, उदयोन्मुख लहान शहरांतील वाढती मागणी आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा यांचा हा संगम नावीन्य, मूल्यनिर्मिती आणि दीर्घकालीन विकासाच्या नव्या संधी निर्माण करत आहे.”