
Jimmy Tata News (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
टाटा ग्रुपच्या नियंत्रणावरून सुरू असलेल्या वादाला आता एक नवीन वळण आले आहे. टाटा घरात सध्या सगळं काही ठीक नाहीये, हे सगळ्यांनाच माहितीये. टाटा सन्सचा चेअरमन कोण राहणार, कंपनी शेअर बाजारात आणायची का नाही, यावरून वाद चालू आहे. आता या वादात जिमी टाटा यांची एंट्री झाली. Tata Group
दिवंगत रतन टाटा यांचे धाकटे बंधू, जिमी नवल टाटा यांनी अखेर या विषयावर आपले मौन सोडले. त्यांनी घरात सुरू असलेल्या वादावर आपले तोंड उघडले.
‘द इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, जिमी टाटा यांनी एन. चंद्रशेखरन यांना ‘टाटा सन्स‘चे अध्यक्ष म्हणून तिसऱ्या कार्यकाळासाठी मुदतवाढ देण्याचे समर्थन केले आहे.
पहिली गोष्ट
त्यांनी चंद्रशेखरन यांना पाठिंबा दिला. एन. चंद्रशेखरन हेच टाटा सन्सचे चेअरमन राहावेत, त्यांना तिसऱ्यांदा पण संधी द्यावी, असं जिमी टाटांचं म्हणणं आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या त्या नियमाचेही समर्थन केले आहे, ज्यानुसार ‘टाटा सन्स’ला शेअर बाजारात लिस्ट करणे अनिवार्य आहे.
दुसरी गोष्ट
टाटा सन्सला शेअर बाजारात आणावं, असं RBI म्हणतंय. जिमी टाटांनी त्या नियमाला पण होकार देऊन लिस्टिंगमध्ये झाले पाहिजे, असे त्याचं मत आहे. जिमी टाटाचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांचे मात्र याबाबत उलटे मत आहे. त्याचमुळे या सगळ्यावा वेगळं वळण आले.
जिमी यांचे मत नोएल टाटांच्या मतापेक्षा वेगळे! अलीकडेच टाटा समूहामध्ये, ‘टाटा सन्स’चे मंडळ आणि नोएल टाटा यांच्यात विविध मुद्द्यांवरून मतभेद निर्माण झाले आहेत. टाटा सन्सचं बोर्ड आणि नोएल टाटा यांच्यात सध्या खटके उडतायत. यातील एक म्हणजे नोएल टाटा यांचा ‘टाटा सन्स’ला शेअर बाजारात लिस्ट करण्याच्या प्रस्तावाला विरोध आहे.
नोएल टाटांना लिस्टिंग नकोय. टाटा सन्स शेअर बाजारात आणू नये, असं त्यांना वाटतंय. यासोबतच चंद्रशेखरन यांच्या पुन्हा चेअरमन बनण्याच्या विरोधात असून चंद्रशेखरन परत चेअरमन होऊ नयेत, असं पण नोएल टाटांना वाटतंय. यादरम्यान जिमी टाटा यांनी चंद्रशेखरन आणि शेअर बाजारात लिस्ट करण्याच्या प्रस्तावाचे समर्थन करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. याच अर्थ एका भावाने दुसऱ्या भावाच्या विरोधात मत दिलंय. जिमी टाटा यांनी एका सह-विश्वस्ताशी झालेल्या संभाषणादरम्यान ही मते व्यक्त केली होती, जी नंतर त्या विश्वस्ताने इतर विश्वस्तांपर्यंत पोहोचवली.
त्यांनी हे मत कुणाला जाहीरपणे सांगितलं नाही. एका सह-विश्वस्ताशी बोलताना सांगितलं. मग त्या विश्वस्ताने ते इतरांना सांगितलं.
सर रतन टाटा ट्रस्टचे सर्वाधिक काळ कार्यरत असलेले विश्वस्तजिमी टाटा हे 1989 पासून सर टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहेत. एवढंच नाही तर ते सर्वात जास्त वेळेसाठी सेवा देणारे ट्रस्टी आहेत. 1989 पासून ते ट्रस्टी 35 वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असून त्यांच्यापेक्षा जास्त काळ कोणीच ट्रस्टी नाहीये.
या ट्रस्टमध्ये त्यांच्याशिवाय नोएल टाटा आणि जहांगीर हे सुद्धा कायमस्वरूपीचे ट्रस्टी आहेत. पुण्यात राहणारे जहांगीर हे जिमी टाटा त्यांच्यासारखेच साधं जीवन जगतात. या ट्रस्टमध्ये नोएल टाटा आणि जहांगीर पण आहेत. जहांगीर पण पुण्यातच राहतात, जिमी सारखेच साधं जीवन जगतात. आजवर या दोघांपैकी कोणीही टाटा समूहातील अंतर्गत वादांवर उघडपणे भाष्य केलेले नाही.
जिमी टाटा हे ‘बाई हिराबाई जमशेटजी टाटा नवसारी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन’ आणि ‘पब्लिक सर्व्हिस ट्रस्ट’चेही विश्वस्त आहेत. हे दोन्ही ट्रस्ट ‘टाटा ट्रस्ट्स’चाच भाग आहेत.
टाटा ट्रस्ट्सची एकत्रितपणे टाटा सन्समध्ये सुमारे 66% भागेदारी आहे. यापैकी केवळ एसआरटीटीकडे 23.56% हिस्सा आहे. टाटा ट्रस्ट्सकडे टाटा सन्समध्ये 66% हिस्सा आहे. त्यात एकट्या सर रतन टाटा ट्रस्टकडे 23.56% आहे. परिणामी, समूहाच्या भविष्याशी संबंधित निर्णयांमध्ये या ट्रस्टची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
RBI ने टाटा सन्सला अप्पर-लेअर एनबीएफसी श्रेणीत ठेवलं आहे. निमयांनुसार या श्रेणीत येणाऱ्या पुढील 3 वर्षाच्या आत कंपनी शेअर बाजार लिस्टमध्ये यावं लागेल.
अप्पर-लेअर NBFC मध्ये असलेल्या कंपनीला 3 वर्षात लिस्ट व्हावंच लागतं. टाटा सन्सने ‘कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनी’ म्हणून आपली नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज केला होता, परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही विनंती फेटाळून लावली. टाटा सन्सने RBI ला सांगितलं होतं, आम्हाला या नियमातून सोडा. पण RBI ने नाही म्हटलं.आता जिमी टाटांचं मत समोर आल्यावर काय होणार, हे बघायचं आहे. जोपर्यंत ते स्वतः बैठकीला येऊन आपलं मत नोंदवत नाहीत, तोपर्यंत काहीच फायनल नाही.
Ans: जिमी नवल टाटा हे दिवंगत रतन टाटा यांचे धाकटे बंधू असून ते सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत.
Ans: जिमी टाटा यांनी एन. चंद्रशेखरन यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदी तिसरा कार्यकाळ देण्याचे समर्थन केले आहे.
Ans: त्यांनी टाटा सन्सला शेअर बाजारात लिस्ट करण्याच्या RBI च्या नियमाला पाठिंबा दिला आहे.