Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSMIA Mumbai Update: मुंबई विमानतळावर ‘सेल्फ बॅग ड्रॉप’ सुविधा सुरू; प्रवाशांचा वेळ वाचणार आणि प्रवासाचा वेग वाढणार

मुंबई विमानतळाने टर्मिनल २ वर १४ हायब्रिड सेल्फ बॅग ड्रॉप (SBD) काऊंटर्स सुरू केले आहेत. यामुळे सामान हाताळणीची क्षमता ४ पटीने वाढली असून प्रवाशांचा प्रतीक्षा वेळ कमी होणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 06, 2026 | 04:28 PM
मुंबई विमानतळावर 'सेल्फ बॅग ड्रॉप' सुविधा सुरू; प्रवाशांचा वेळ वाचणार आणि प्रवासाचा वेग वाढणार (Photo Credit- X)

मुंबई विमानतळावर 'सेल्फ बॅग ड्रॉप' सुविधा सुरू; प्रवाशांचा वेळ वाचणार आणि प्रवासाचा वेग वाढणार (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मुंबई विमानतळावर ‘सेल्फ बॅग ड्रॉप’ सुविधा सुरू
  • प्रवाशांचा वेळ वाचणार आणि प्रवासाचा वेग वाढणार
मुंबई, ६ फेब्रुवारी २०२६: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (सीएसएमआयए)ने टर्मिनल २ (टी२) येथे १४ हायब्रिड सेल्‍फ बॅग ड्रॉप (एसबीडी) काऊंटर्स सुरू केले आहेत, जे तंत्रज्ञान-केंद्रित सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून डिपार्चर प्रक्रिया सहजसाध्य करण्‍यामध्‍ये महत्त्वाचे पाऊल आहे. लाँच करण्‍यात आलेले हायब्रिड एसबीडी काऊंटर्स २०२८ पर्यंत सर्व २१२ विद्यमान चेक-इन डेस्‍क्‍सचे टप्‍प्‍याटप्‍प्‍याने हायब्रिड स्‍वरूपात बदल करण्‍याच्‍या सीएसएमआयएच्‍या योजनेचा भाग आहेत. या उपक्रमाचा टर्मिनलमधील जागेचा उत्तमपणे वापर करण्‍याचा, सामान प्रक्रिया क्षमता वाढवण्‍याचा आणि गर्दीच्‍या, तसेच कमी गर्दीच्‍या काळात प्रवाशांचे उत्तम व्‍यवस्‍थापन करण्‍याचा मनसुबा आहे.

विमानतळावर सेल्‍फ-सर्विस बॅगेज सुविधांच्‍या अवलंबनामध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्‍यानंतर हे काऊंटर्स लाँच करण्‍यात आले आहेत. ऑटोनॉमस एसबीडी वापरामध्‍ये कॅलेंडर वर्ष २०२४ मधील ३८८,४४६ प्रवाशांच्‍या तुलनेत वार्षिक ४० टक्‍क्‍यांनी वाढून कॅलेंडर वर्ष २०२५ मध्‍ये ५६०,२७५ प्रवाशांपर्यंत वाढ झाली, ज्‍यामधून जलद व अधिक सुलभ प्रवासी प्रक्रियेला साह्य करण्‍याकरिता विकासात्‍मक पायाभूत सुविधेसाठी गरज दिसून येते.

एकाच प्रक्रियेमध्‍ये चेक-इन व बॅगेज ड्रॉपला एकीकृत करत हायब्रिड एसबीडी काऊंटर्स मॅन्‍युअल हस्‍तक्षेप कमी करतात, तसेच प्रवाशांचया प्रतिक्षा वेळ देखील कमी होतो. ही यंत्रणा पात्र प्रवाशांना त्‍याच काऊंटरवर सामानाशी संबंधित पेमेंट व्‍यवहार पूर्ण करण्‍याची सुविधा देते, ज्‍यासह प्रक्रिया सुव्‍यवस्थितपणे होते आणि स्‍वतंत्र एअरलाइन डेस्‍क्‍सवरील अवलंबन कमी होते.

सेल्‍फ-सर्विस मोडमध्‍ये सिंगल हायब्रिड एसबीडी काऊंटर समकालीन मॅन्‍युअल प्रक्रियेच्‍या माध्‍यमातून केल्‍या जाणाऱ्या २५ ते ३० प्रवाशांच्‍या सामानांच्‍या तुलनेत प्रतितासाला जवळपास १०० ते १२० प्रवाशांच्‍या सामानाला हाताळू शकते, ज्‍यामुळे सामान हाताळणी क्षमतेमध्‍ये जवळपास चारपट वाढ होते. या सुधारणेमुळे सामान स्वीकारण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, प्रवाशांची ये-जा अधिक सुलभ होईल आणि टर्मिनलच्या पायाभूत सुविधांचा अधिक कार्यक्षम वापर होईल.

SBI Mutual Fund कडून ‘InvesTap Nxt’ लाँच; आता AI च्या मदतीने करा स्मार्ट गुंतवणूक!

प्रत्‍येक हायब्रिड एसबीडी काऊंटर ऑपरेशनल स्थिरतेसाठी डिझाइन करण्‍यात आले आहे आणि साध्‍या यंत्रणेच्‍या माध्‍यमातून मॅन्‍युअल व सेल्‍फ-सर्विस मोड्सदरम्‍यान स्विच करू शकते. यामुळे विमानतळ व एअरलाइन टीम्‍सना ऑपरेशनल आवश्‍यकतांनुसार कार्यक्षमतेसह वैयक्तिक साह्यतेमध्‍ये संतुलन राखता येते.

या विकासाबाबत मत व्‍यक्‍त करत सीएसएमआयएचे प्रवक्‍ता म्‍हणाले, ”सामानाची हाताळणी करणे हे डिपार्चर प्रवासामधील महत्त्वाचे आहे. प्रवाशांच्‍या वाढत्‍या संख्‍येसह सीएसएमआयए आपल्‍या चेक-इन व बॅगेज ड्रॉप पायाभूत सुविधेमध्‍ये टप्‍प्‍याटप्‍प्‍याने बदल करत आहे, ज्‍यामुळे कार्यक्षमता वाढण्‍यासह स्थिरता कायम आहे. हायब्रिड सेल्‍फ बॅग ड्रॉप काऊंर्ट्स आम्‍हाला मागणीनुसार क्षमता वाढवण्‍याची सुविधा देतात, तसेच आम्‍ही सहाय्यक सेवांची आवश्‍यकता असलेल्‍या प्रवाशांना मदत करणे सुरू ठेवले आहे.”

सध्‍या, इंडिगो व एअर इंडियाने टी२ येथे हायब्रिड एसबीडी यंत्रणा तैनात करण्‍याचा अवलंब केला आहे. आंतरराष्‍ट्रीय एअरलाइन्‍स जसे लुफ्थान्‍सा, एअर फ्रान्‍स, कतार, स्विस आणि केएलएम विद्यमान ऑटोनॉमस एसबीडी सुविधेचा वापर करत आहे, तसेच त्‍यांना हायब्रिड एसबीडी प्‍लॅटफॉर्मवर स्‍थलांतरित करण्‍याची प्रक्रिया सुरू आहे.

हायब्रिड एसबीडी यंत्रणा डिजियात्रा बायोमेट्रिक तंत्रज्ञानासह देखील एकीकृत करता येऊ शकते, ज्‍यासह नोंदणीकृत प्रवाशांना जलद प्रक्रिया आणि कमी मॅन्‍युअल डॉक्‍यूमेंट तपासणीसाठी फेशियल रेकग्निशनचा वापर करता येईल.

या परिवर्तनादरम्‍यान प्रवाशांना साह्य करण्‍यासाठी सीएसएमआयएने टर्मिनलमध्‍ये प्रशिक्षित एसबीडी सहाय्यक तैनात केले आहेत, जे पहिल्‍यांदाच या सुविधेचा वापर करणाऱ्या आणि वृद्ध प्रवाशांना सेल्‍फ-सर्विस प्रक्रियेमध्‍ये मार्गदर्शन करतात.

लाँच करण्‍यात आलेल्‍या हायब्रिड एसबीडी काऊंटर्ससह सीएसएमआयए टी२ येथे ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवत आहे, तसेच वेग, सोयीसुविधा आणि विश्वासार्हतेच्या जागतिक विमानतळ मानकांशी सुसंगत राहून भविष्यातील प्रवाशांच्या वाढत्या संख्येला सामावून घेण्यासाठी ही यंत्रणा सक्षम केली जात आहे.

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची आर्थिक कोंडी! UAE ने दिला परतफेडीसाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम

Web Title: Csmia mumbai airport t2 hybrid self bag drop counters increase departure capacity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • Business News
  • mumbai airport

संबंधित बातम्या

SBI Mutual Fund कडून ‘InvesTap Nxt’ लाँच; आता AI च्या मदतीने करा स्मार्ट गुंतवणूक!
1

SBI Mutual Fund कडून ‘InvesTap Nxt’ लाँच; आता AI च्या मदतीने करा स्मार्ट गुंतवणूक!

AM/NS इंडियाचा ऐतिहासिक टप्पा! ‘मिनिस्ट्री ऑफ स्टील’कडून ‘ग्रीन स्टील सर्टिफिकेशन’ मिळवणारी पहिली कंपनी
2

AM/NS इंडियाचा ऐतिहासिक टप्पा! ‘मिनिस्ट्री ऑफ स्टील’कडून ‘ग्रीन स्टील सर्टिफिकेशन’ मिळवणारी पहिली कंपनी

Personal Loan Trends India: ‘स्मार्ट अर्नर्स’ गरज नसतानाही कर्ज का घेत आहेत? गुंतवणुकीला धक्का न लावता स्वप्नपूर्तीचा नवा फंडा!
3

Personal Loan Trends India: ‘स्मार्ट अर्नर्स’ गरज नसतानाही कर्ज का घेत आहेत? गुंतवणुकीला धक्का न लावता स्वप्नपूर्तीचा नवा फंडा!

Service Sector Growth: भारताच्या सेवा क्षेत्राला जोरदार गती; जानेवारीमध्ये मिळाली परदेशी ऑर्डर  
4

Service Sector Growth: भारताच्या सेवा क्षेत्राला जोरदार गती; जानेवारीमध्ये मिळाली परदेशी ऑर्डर  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.