Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Currency Crisis 2025: डॉलरच्या तुलनेत कोणत्या देशाचे चलन सर्वात कमकुवत, भारतीय रुपयाची स्थिती काय?

जगभरातील अनेक देशांची चलने भारतीय रुपयापेक्षा खूपच कमकुवत आहेत. काही देशांची चलने इतकी कमजोर आहेत की, अमेरिकेचा एक डॉलर खरेदी करम्यासाठी हजारो किंवा लाखो, युनिट खर्च करावे लागतात.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 03, 2025 | 04:25 PM
Weakest currency in the world 2025

Weakest currency in the world 2025

Follow Us
Close
Follow Us:
  • रुपया पहिल्यांदाच प्रति डॉलर ९० रुपयांच्या खाली घसरला
  • १ डॉलरची किंमत पहिल्यांदाच ₹९०/$ ओलांडली
  • लेबनानचे चलन लेबनीज पाउंड हे जगातील सर्वात कमकुवत चलन
Currency Crisis 2025: भारतीय चलनासाठी २०२५ हे वर्ष सर्वात कठीण वर्ष असल्याचे दिसत आहे. बाजार उघडताच, रुपया पहिल्यांदाच प्रति डॉलर ९० रुपयांच्या खाली घसरला, या घसरणीने विक्रमी नीचांकी पातळी नोंदवली आहे. १ डॉलरची किंमत पहिल्यांदाच ₹९०/$ ओलांडली. बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात तो २७ पैशांनी घसरून ₹९०.१४/$ या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला. ही केवळ आकडेवारी नाही तर देशाचे चलन किती दबावाखाली असल्याचे दिसून येते. परकीय गुंतवणूक येत आहे, डॉलर मजबूत होत आहे आणि जागतिक वातावरण शांत आहे, परंतु हे केवळ भारतापुरते मर्यादित नाही.

जगभरातील अनेक देशांची चलने भारतीय रुपयापेक्षा खूपच कमकुवत आहेत. काही देशांची चलने इतकी कमजोर आहेत की, अमेरिकेचा एक डॉलर खरेदी करम्यासाठी हजारो किंवा लाखो, युनिट खर्च करावे लागतात. पण भारतच नाही तर इतर अनेक देशही आहेत ज्या देशांचे चलन डॉलरच्या तुलनेत सर्वात कमकुवत आहे, यात भारतीय रुपया कोणत्या क्रमांकावर आहेत. असाही प्रश्न उपस्थित होतो.

 

Rupee Vs Dollar: रुपया विक्रमी निचांकी पातळीवर! 1 डॉलर 90 रुपयांवर, कारण काय?

कोणत्या देशाचे चलन डॉलरच्या तुलनेत सर्वात कमकुवत आहे?

लेबनानचे चलन लेबनीज पाउंड हे जगातील सर्वात कमकुवत चलन आहे. लेबनॉन हा पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर स्थित एक देश आहे. लेबनॉन गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. सरकारी गोंधळ, भ्रष्टाचार, बँकिंग व्यवस्थेचे पतन आणि परकीय चलनाचा ऱ्हास यामुळे लेबनीज पौंड जगातील सर्वात कमकुवत चलनांपैकी एक बनले आहे. १ एलबीपी = ०.०००११ अमेरिकन डॉलर आणि १ यूएस डॉलर = ८९,८१९.५१ अमेरिकन डॉलर.

इराण आणि व्हिएतनामच्या चलनांचे अवमूल्यन — जागतिक आर्थिक स्थिरतेसाठी इशारा

आंतरराष्ट्रीय चलनांच्या तुलना करताना, सध्या इराणचे रियाल हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमकुवत चलन बनले आहे. अमेरिका आणि इतर अनेक देशांनी लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे, इराणचा जागतिक आर्थिक व्यापार जवळपास थांबला आहे. तेलावरून मिळणाऱ्या उत्पन्नावर तीव्र अवलंबित्व असून, देशाच्या अर्थव्यवस्थेत विविधतेचा गंभीर अभाव आहे. याशिवाय, उच्च महागाई आणि देशात सुरू असलेला राजकीय तणाव आर्थिक अस्थिरतेला कारणीभूत झाला आहे.

या आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे, रियालचे मूल्य खाल्याहोण्यास सुरुवात झाली आहे. सध्या १ आयआरआर (इराणी रियाल) = ०.०००२४ अमेरिकन डॉलर इतकी खालची किंमत आहे, तर १ यूएस डॉलर = ४२,११२.११ आयआरआर इतक्या प्रमाणात त्याचे अवमूल्यन झाले आहे.

Russia-India Trade: आता रुपया-रुबलमध्ये होणार व्यवसाय! रशिया म्हणतो, अनेक देशांसोबत डॉलर.. 

त्याचवेळेस, व्हिएतनामचे चलन व्हिएतनामी डोंग देखील जगातील सर्वात कमकुवत चलनांपैकी एक मानले जाते. सध्याच्या विक्रमी विनिमय दरानुसार, १ व्हिएतनामी डोंग = ०.०००३८ अमेरिकन डॉलर इतकी किंमत आहे, आणि १ यूएस डॉलर = २६,३७०.०२ डोंग इतकी किंमत आहे. जरी व्हिएतनामची अर्थव्यवस्था वाढत असली तरी, निर्यातीला चालना देण्यासाठी त्यांच्या सरकारने डोंगचा विनिमय दर जानबू न कमी ठेवला आहे. यामुळे, विनिमय दराच्या दृष्टीने डोंग देखील कमकुवत दिसतो.

विश्लेषकांचे म्हणणे आहे की, दोन्ही देशांमधील चलनांचे हे अवमूल्यन जागतिक आर्थिक स्थिरतेसाठी चिंता निर्माण करणारे आहे. महत्त्वपूर्ण निर्यातदार असलेल्या देशांमध्ये अशा कमकुवतीमुळे व्यापारात अस्थिरता येऊ शकते, आणि जागतिक चलन बाजारावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

भारतीय रुपया कुठे आहे?

२०२५ मध्ये भारतीय रुपया प्रति डॉलर ९० रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. परंतु जगभरातील डझनभर चलने खूपच कमकुवत आहेत. जगातील टॉप २५ सर्वात कमकुवत चलनांच्या यादीत भारतीय रुपया दिसत नाही. मात्र भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची आहे. शिवाय, परकीय कर्ज, महागाई आणि राजकीय स्थिरतेच्या बाबतीत भारताचे स्थान अनेक देशांपेक्षा चांगले आहे. त्यामुळे, भारतीय रुपया कमकुवत होतो, परंतु तो सर्वात कमकुवत श्रेणीपासून खूप दूर आहे.

 

Web Title: Currency crisis 2025 which currency is the weakest against the us dollar and where does the indian rupee stand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 04:25 PM

Topics:  

  • Financial News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.