Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका झटक्यात डी-मार्टचा शेअर 9 टक्क्यांनी घसरला; प्रमोटर्संचे हजारो कोटींचे नुकसान!

राधाकिशन एस. दमानी यांच्या डी-मार्ट चालवणाऱ्या ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड कंपनीला सोमवारी शेअर बाजारात चांगलाच फटका बसला आहे. आज मुंबई शेअर बाजारात (बीएसई) कंपनीचा शेअर्स 8.45 टक्क्यांनी घसरून, 4185.85 रुपये झाला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 14, 2024 | 03:58 PM
एका झटक्यात डी-मार्टचा शेअर 9 टक्क्यांनी घसरला; प्रमोटर्संचे हजारो कोटींचे नुकसान!

एका झटक्यात डी-मार्टचा शेअर 9 टक्क्यांनी घसरला; प्रमोटर्संचे हजारो कोटींचे नुकसान!

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. ज्यामुळे काही शेअरमध्ये घसरण तर काही शेअर्सने आपली घोडदौड कायम सुरु ठेवली आहे. अशातच आता रिटेल स्टोअर चेन डी-मार्ट चालवणारी कंपनी ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लि.बद्दल तुम्हाला माहिती आहेच. सोमवारी शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्सला चांगलाच फटका बसला आहे. सोमवारी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) कंपनीचा शेअर्स 8.45 टक्क्यांनी घसरून, 4185.85 रुपये झाला आहे. अर्थात सोमवारी डी-मार्ट चालवणारी कंपनी ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लि.च्या शेअरमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली आहे.

हे देखील वाचा – रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांचा बॅंकांना सतर्क राहण्याचा इशारा, वाचा… असे का म्हणाले गव्हर्नर शक्तिकांत दास!

सोमवारी शेअर बाजार बंद होताना, मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स ६२२.३४ अंकांच्या उसळीसह ८२,००३.७० अंकांवर बंद झाला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी १८०.४५ अंकांच्या वाढीसह, २५,१४४.७० अंकांवर बंद झाला आहे.

स्टॉकची कामगिरी काय होती?

दरम्यान, शेअर बाजारातील गेल्या सत्रात डीमार्टचे शेअर्स ४५७२.३५ रुपयांवर बंद झाले होते. स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीच्चांक 3618.85 रुपयांवर आहे. आणि उच्चांक 5484.0 रुपयांवर आहे. आज बीएसईवर कंपनीचे मार्केट कॅप 2,72,270.73 कोटी रुपये इतके दिसून आले आहे.

हे देखील वाचा – सणासुदीत सर्वसामान्यांना महागाई झटका; सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दर 1.84 टक्क्यांवर!

आज दुपारी 02:20 वाजेपर्यंत मुंबई शेअर बाजारात डी-मार्ट चालवणारी कंपनी ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडच्या 1,14,780 शेअर्सचे व्यवहार झाले आहेत. सध्याच्या किमतीनुसार, शेअरने त्याच्या मागील 12 महिन्यांच्या ईपीएस 41.3 प्रति शेअरच्या 101.22 पट आणि त्याच्या पुस्तकी मूल्याच्या 15.76 पटीने व्यापार केला आहे. इक्विटीवर परतावा 13.56 रुपये होता.

हे देखील वाचा – रतन टाटांच्या मुंबईतील आलिशान घराची किंमत माहितीये का? साधेपणा पाहून भारावून जाल…

काय झाला त्याचा परिणाम?

30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडने 14478.02 कोटींची एकत्रित विक्री नोंदवली आहे. जी एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहींच्या तुलनेत 14.35 टक्के अधिक आहे. कंपनीने ताज्या तिमाहीत 659.58 कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्यात वार्षिक 5.78 टक्के वाढ नोंदवली आहे. दरम्यान, राधाकिशन एस. दमानी हे भारतीय अब्जाधीश गुंतवणूकदार, उद्योगपती आणि डी मार्टचे संस्थापक आहेत.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: D marts share fell by 9 percent promoters lost thousands of crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2024 | 03:58 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.