रतन टाटांच्या मुंबईतील आलिशान घराची किंमत माहितीये का? साधेपणा पाहून भारावून जाल...
प्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. टाटा यांचे निधन होऊन २ दिवस उलटले. मात्र, अजूनही त्यांच्याविषयीची चर्चा थांबायला तयार नाही. रतन टाटा यांच्या सेवाभावी आणि साध्या जीवनाबद्दल सर्वजण बोलत आहेत. याच पार्श्वभुमीवर आज आपण कोट्यवधींची संपत्ती असलेल्या रतन टाटा यांच्या मुंबईतील आलिशान घराची किंमतीबाबत जाणून घेणार आहोत…
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाज उभारणीच्या कामातही रतन टाटा यांचे योगदान मोठे आहे. रतन टाटा हे भारताचा अभिमान होते. रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर 2024 रोजी जगाचा निरोप घेतला. ते 86 वर्षांचे होते. रतन टाटांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली. रतन टाटा हे महान परोपकारी व्यक्तींपैकी एक होते.
3800 कोटींची संपत्ती
अत्यंत साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी असलेल्या रतन टाटांकडे इतर अब्जाधीशांच्या तुलनेत खूपच कमी संपत्ती होती. कारण रतन टाटा यांनी आपली बहुतेक संपत्ती दान केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रतन टाटा यांच्याकडे अंदाजे 3800 कोटी रुपयांची संपत्ती आणि काही आलिशान कार होत्या. यासोबतच त्यांच्याकडे एक आलिशान घर आहे.
हे देखील वाचा – रतन टाटा यांनी झिरोपासून हिरो बनवलेल्या 7 कंपन्या; काहींचा परदेशातही आहे डंका!
कितीये घराची किंमत
रतन टाटा हे मुंबईतील कुलाबा परिसरातील आपल्या एका घरात राहत होते. हे घर 14000 स्क्वेअर फूट परिसरात पसरलेले आहे. रिपोर्ट्सनुसार, या आलिशान घराची किंमत जवळपास 150 कोटी रुपये आहे. म्हणजेच देशातील अनेक सेलिब्रेटींच्या घरांपेक्षा ही किंमत कमी आहे. रतन टाटा यांच्या या आलिशान घरात स्विमिंग पूल, अनेक रूम्स, सन डेस्क, बार आणि लाऊंज अशा अनेक सुविधा आहेत.
साधेपणा असलेली घराची रचना
रतन टाटा यांच्या साध्या स्वभावानुसार त्यांनी आपल्या घराची रचना केली होती अशी माहिती समोर आली आहे. हे घर बाहेरून सुद्धा खूपच भव्य दिसते. टाटा समूहाचा व्यवसाय जगभरात पसरलेला आहे. स्वयंपाकघरापासून ते आकाशात उड्डाण करणाऱ्या विमानांपर्यंत टाटा समूहाचे व्यवसाय आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या रतन टाटा यांच्याकडे या आलिशान घराच्या व्यतिरिक्त रतन टाटा यांच्याकडे इतरही मोठी संपत्ती, आलिशान कार कलेक्शन आहे.