
युट्यूबर ध्रुव राठीकडे किती कोटींची मालमत्ता? ( सौजन्य - सोशल मीडिया )
राजकारण आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवरील व्हिडिओंचा समावेश असलेल्या त्याच्या कमाई आणि एकूण संपत्तीबद्दलही लोकांना उत्सुकता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ध्रुव राठीची एकूण संपत्ती सुमारे ५८ कोटी रुपये आहे. पण प्रश्न असा आहे की, ध्रुव राठी इतके पैसे कसे कमावतो? यूट्यूब हे त्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे की त्याचे इतर व्यवसायही आहेत?
ध्रुव राठीने आपली संपूर्ण मालमत्ता आणि कमाई कधीही सार्वजनिकरित्या जाहीर केलेली नाही. त्याची अंदाजित एकूण संपत्ती ५८ कोटी रुपये आहे. त्याच्याकडे टेस्ला, रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज-बेंझ यांसारख्या गाड्याही आहेत. पण त्याच्या कमाईच्या आकड्यांपेक्षाही महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, जर्मनीमध्ये राहणारा ध्रुव राठी भारतातून जास्त कमावतो की जर्मनीतून?
ध्रुव राठी त्याच्या उत्पन्नाचा मोठा भाग यूट्यूबवरून मिळवतो. त्याचे व्हिडिओ राजकारण, अर्थशास्त्र, इतिहास, पर्यावरण आणि सामाजिक समस्यांवर केंद्रित असतात. हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात आणि यूट्यूब त्यासाठी पैसे देते. याव्यतिरिक्त, जेव्हा व्हिडिओवर जाहिराती दाखवल्या जातात, तेव्हा क्रिएटरला त्यातूनही कमाई होते.
यूट्यूबवरील कमाई केवळ सबस्क्राइबर्सवर अवलंबून नसते. व्ह्यूजची संख्या, दर्शकाचा मूळ देश, व्हिडिओचा कालावधी आणि जाहिरात कंपन्यांचा जाहिरातींवरील खर्च या सर्वांचा कमाईवर परिणाम होतो. त्याच्या चॅनलव्यतिरिक्त, ध्रुव राठीचे एक व्लॉग आणि शॉर्ट्स कंटेंट चॅनलसुद्धा आहे. यामुळे त्याला विविध प्रकारच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते. तथापि, त्याच्या मासिक यूट्यूब कमाईबद्दल कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.
प्रमुख डिजिटल क्रिएटर्सची कमाई केवळ युट्युबच्या व्हयूजवर नसते किंवा जाहिरातींपुरती मर्यादित नसते. कंपन्या त्यांच्या उत्पादनांचा आणि सेवांचा प्रचार करण्यासाठी क्रिएटर्ससोबत डील करते आणि त्या बदल्यात त्यांना पैसे दिले जातात. ब्रँड पार्टनरशिप आणि स्पॉन्सरशिप हे देखील ध्रुव राठीसारख्या प्रमुख क्रिएटर्ससाठी उत्पन्नाचे स्रोत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे हा देखील उत्तम पर्याय असतो.
ध्रुव राठीचे इतरही व्यावसायिक उपक्रम आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो ऑनलाइन कोर्सेस, मर्चंडाईज आणि ‘एआय फिएस्टा’ नावाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्ममधून कमाई करतो. पण या व्यवसायांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा नेमका आकडा त्याने कधीही सार्वजनिकरित्या उघड केलेला नाही. पण क्लासेससारखाच ऑनलाइन कोर्समध्येदेखील चांगला फायदा मिळतो.
सध्या सुरु असलेल्या CJP प्रोटेस्टमध्ये तो सहभागी होण्यासाठी म्हणून भारतात आला आहे. नेमकं पुढे काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.