Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP protest : जंतरमंतर आंदोलनाचे आंतरराष्ट्रीय पडसाद; संयुक्त राष्ट्रांची टिप्पणी भारताने फेटाळली, म्हटले, ‘हा आमचा अंतर्गत विषय

CJP protest : दिल्लीतील आंदोलने आणि कार्यकर्त्यांच्या अटकेवरून भारत आणि संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग यांच्यात संघर्ष झाला आहे. भारताने ही परिस्थिती अंतर्गत बाब असल्याचे म्हटले असून, हा हस्तक्षेप अनावश्यक असल्याचा आरोप केला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 11, 2026 | 10:08 AM
Jantar Mantar Delhi protest UN Human Rights India protest

Jantar Mantar Delhi protest UN Human Rights India protest

Follow Us
Follow Us:
  • जागतिक व्यासपीठावर वाद पेटला
  • भारताचे सडेतोड उत्तर
  • संविधानिक हक्क विरुद्ध सार्वजनिक सुव्यवस्था

देशाची राजधानी नवी दिल्लीत (CJP protest) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनादरम्यान आणि आंदोलनापूर्वी पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले आहेत. या कारवाईवर संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने (OHCHR) चिंता व्यक्त केल्यानंतर भारत सरकारने यावर अत्यंत तीव्र आक्षेप नोंदवला आहे. भारताने यूएनची ही टिप्पणी पूर्णपणे बिनबुडाची आणि देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये अनावश्यक हस्तक्षेप करणारी असल्याचे स्पष्ट करत ती थेट फेटाळून लावली आहे.

दिल्लीतील आंदोलनांवरून भारत आणि संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग आमनेसामने

जंतरमंतर येथे प्रस्तावित असलेल्या या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत आधीच परवानगी नाकारली होती. तरीही आंदोलनाची तयारी दर्शवणाऱ्या ‘सीजेपी’च्या प्रमुख नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि काही पत्रकारांना रविवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश होता. या प्रतिबंधात्मक अटकेनंतर राजधानीत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, ज्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Bank : भारत ‘दक्षिण आशिया’चा केंद्रबिंदू! पाकिस्तानला जागतिक बँकेच्या यादीतून काढले बाहेर; पाकिस्तानी संतप्त

संयुक्त राष्ट्रांची चिंता आणि भारताचा आक्रमक पवित्रा

या संपूर्ण घडामोडींवर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाने एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटले होते की, दिल्लीतील मोठ्या आंदोलनांपूर्वी नागरी समाजाशी संबंधित लोक, कार्यकर्ते, वकील आणि पत्रकारांना ज्या प्रकारे ताब्यात घेण्यात आले आहे, त्याबद्दल आम्हाला खोल चिंता वाटत आहे. यूएनच्या या वक्तव्यानंतर लगेचच आंतरराष्ट्रीय कूटनीतीच्या पटलावर भारत आक्रमक झाला.

We have seen the OHCHR’s remarks about today’s events in New Delhi. India is the world’s largest democracy, where the right to peaceful assembly is guaranteed by our Constitution and safeguarded by robust institutions, an independent judiciary and a free media. As in every democracy, Indian citizens exercise this right subject to reasonable restrictions in the interest of public order. The authorities, for their part, act in accordance with the law, and our courts remain available to all for redressal of any grievances. The OHCHR’s concerns are therefore misplaced and constitute an unwarranted interference in the internal affairs of India. In this context, OHCHR would also do well to devote comparable attention to large-scale protests elsewhere, consistent with its mandate of impartiality and non-selectivity. @MEAIndia @IndianDiplomacy @PMOIndia @DrSJaishankar @abagchimea — India at UN, Geneva (@IndiaUNGeneva) October 10, 2026

credit – social media and Twitter

जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी मिशनने तात्काळ अधिकृत निवेदन जारी करत या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. भारताने स्पष्ट केले की, देशात स्वतंत्र न्यायव्यवस्था, मोकळे माध्यम आणि भक्कम संविधानिक चौकट अस्तित्वात आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततेने एकत्र येण्याचा आणि आपले मत मांडण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. मात्र, लोकशाहीत सार्वजनिक सुव्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षा राखण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ते निर्बंध घालणे हा सरकारचा कायदेशीर अधिकार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Starlink India: ‘प्रिय पंतप्रधान अंबानी…’; इलॉन मस्क यांनी Mukesh Ambaniना पुन्हा डिवचले; केंद्र सरकारनेही दिले चोख प्रत्युत्तर

‘इतर ठिकाणच्या आंदोलनांकडेही बघा’  भारताचा निष्पक्षतेचा सल्ला

भारताने केवळ यूएनच्या टिप्पण्या फेटाळल्या नाहीत, तर मानवाधिकार आयोगाला एक महत्त्वाचा सल्लाही दिला. भारताने युक्तिवाद केला की, संयुक्त राष्ट्रांच्या या संस्थेने कोणत्याही एका देशाबाबत भेदभाव न करता संपूर्ण जगातील इतर भागात होणाऱ्या मोठ्या आंदोलनांकडेही तितक्याच तटस्थतेने पाहिले पाहिजे. यूएन मानवाधिकार आयोगाने कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय आणि राजकीय दबावाशिवाय आपल्या दिलेल्या अधिकारक्षेत्रात (Mandate) राहूनच कार्य केले पाहिजे, असे भारताने ठामपणे बजावले.

दिल्ली कॅन्टोन्मेंट पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या नेत्यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, दुसरीकडे या घटनेने आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी चर्चा घडवून आणली आहे. भारत आपल्या संप्रभुतेवर आणि अंतर्गत बाबींवरील कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाला अजिबात खपवून घेणार नाही, हाच संदेश या प्रत्युत्तरातून जागतिक समुदायाला देण्यात आला आहे.

Web Title: Delhi jantar mantar cjp protest india rejects un human rights statement hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • BJP Government
  • CJP Protest
  • Jantar Mantar
  • United Nations Security Council

संबंधित बातम्या

SIR आंदोलनाचा वाद आता सुप्रीम कोर्टात! मेट्रो ट्रेन बंद करणे सरकारला पडणार महागात? उद्या होणार सर्वोच्च सुनावणी
1

SIR आंदोलनाचा वाद आता सुप्रीम कोर्टात! मेट्रो ट्रेन बंद करणे सरकारला पडणार महागात? उद्या होणार सर्वोच्च सुनावणी

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा
2

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा

SIR आंदोलनाचा देशभर भडका! मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय घमासान, आता काँग्रेसने आखली देशव्यापी रणनीती
3

SIR आंदोलनाचा देशभर भडका! मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय घमासान, आता काँग्रेसने आखली देशव्यापी रणनीती

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन
4

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.