Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा

सीजेपीच्या एसआयआरविरोधी आंदोलनावरून राजकीय वातावरण तापलं आहे. अभिजीत दीपके यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतल्याच्या पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांनी सरकारला इशारा दिला आहे. उद्यापर्यंत नेत्यांची सुटका न झाल्यास उपोषण किंवा पदयात्रा सुरू करण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 10, 2026 | 08:50 PM
Sonam Wangchuk (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Sonam Wangchuk (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • उद्यापर्यंत नेत्यांची सुटका करा; वांगचुक यांचा इशारा
  • सुटका न झाल्यास उपोषण किंवा पदयात्रेचा मार्ग
  • देशात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप
 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आता रान पेटले आहे. आधी विरोधी पक्षांनी आंदोलन करून दिल्ली दणाणून सोडली. आता कॉकरोच जनता पार्टीनेसुद्धा आंदोलनाची हाक दिली. पण त्यापूर्वीच, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना दिल्ली विमानतळावर दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. विरोधी पक्षांतील काही नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घडामोडींनंतर आता पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांची मैदानात एंट्री झाली असून त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

उद्यापर्यंत नेत्यांची सुटका करा; वांगचुक यांचा इशारा

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात असल्याने आंदोलनाचं नेतृत्व अजिंक्य शिंदे करत असल्याचं सांगितलं जात आहे. काहीही झालं तरी आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका शिंदे यांनी घेतली आहे.

यावरून सोनम वांगचुक यांनी ताब्यात घेतलेल्या विरोधी पक्षातील नेत्यांची लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी केली. उद्यापर्यंत सर्व नेत्यांची सुटका झाली नाही, तर आपल्याला उपोषण किंवा पदयात्रा सुरू करण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे या आंदोलनाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.

SIR आंदोलनाचा देशभर भडका! मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय घमासान, आता काँग्रेसने आखली देशव्यापी रणनीती

देशात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप

देशातील सर्वात मोठी लोकशाही सध्या अघोषित आणीबाणीच्या परिस्थितीत असल्याचा आरोप सोनम वांगचुक यांनी केला. आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी अनेक नेते पुढे आले होते, हे पाहून आपल्याला आनंद झाला होता. मात्र, या नेत्यांना अटक करण्यात आल्याने त्यांनी सरकार आणि पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

याआधीही सीजेपीसोबत आंदोलन

यापूर्वी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपी आणि सोनम वांगचुक यांनी एकत्र आंदोलन केल्याचा उल्लेख करण्यात येत आहे. त्या आंदोलनादरम्यान वांगचुक यांनी उपोषण केलं होतं. आता ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनात त्यांनी पुन्हा हस्तक्षेप केला आहे.

दरम्यान, ताब्यात घेतलेल्या नेत्यांची सुटका होते का आणि सोनम वांगचुक प्रत्यक्षात उपोषण किंवा पदयात्रा सुरू करतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. पुढील घडामोडींवर या आंदोलनाची दिशा अवलंबून राहणार आहे.

Mamta Banerjee : ‘आम्हाला किडनॅप केलं’ ममता बॅनर्जींचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप, पोलीस ठाण्यातच केलं आंदोलन सुरु

Web Title: Sonam wangchuk warning cjp sir protest gyanesh kumar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 08:50 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Gyanesh Kumar
  • SIR
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

SIR आंदोलनाचा देशभर भडका! मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय घमासान, आता काँग्रेसने आखली देशव्यापी रणनीती
1

SIR आंदोलनाचा देशभर भडका! मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय घमासान, आता काँग्रेसने आखली देशव्यापी रणनीती

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन
2

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
3

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Mamta Banerjee : ‘आम्हाला किडनॅप केलं’ ममता बॅनर्जींचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप, पोलीस ठाण्यातच केलं आंदोलन सुरु
4

Mamta Banerjee : ‘आम्हाला किडनॅप केलं’ ममता बॅनर्जींचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप, पोलीस ठाण्यातच केलं आंदोलन सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.