Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahadev Betting App: महादेव ॲप घोटाळ्यात ईडीची कारवाई; बुर्ज खलिफातील व्हिलासह तब्बल ‘इतकी’ संपत्ती केली जप्त 

महादेव ॲप मनी लॉड्रिंग प्रकरणात एका मोठ्या कारवाईत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुख्य आरोपी सौरभ चंद्रकर याची १,७०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेत दुबईच्या बुर्ज खलिफामधील महागड्या व्हिला आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 26, 2026 | 03:24 PM
Mahadev Betting App: महादेव ॲप घोटाळ्यात ईडीची कारवाई; बुर्ज खलिफातील व्हिलासह तब्बल 'इतकी' संपत्ती केली जप्त 

Mahadev Betting App: महादेव ॲप घोटाळ्यात ईडीची कारवाई; बुर्ज खलिफातील व्हिलासह तब्बल 'इतकी' संपत्ती केली जप्त 

Follow Us
Close
Follow Us:
  • महादेव ॲप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई
  • सौरभ चंद्रकरची १७०० कोटीची मालमत्ता जप्त
  • आतापर्यंत ४३०० कोटींपर्यंत पोहोचली जप्ती

Mahadev Betting App: महादेव ॲप
मनी लॉड्रिंग प्रकरणात एका मोठ्या कारवाईत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुख्य आरोपी सौरभ चंद्रकर याची १,७०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेत दुबईच्या बुर्ज खलिफामधील महागड्या व्हिला आणि घरांचा समावेश आहे. सौरभ चंद्रकर सध्या दुबईत आहे. ईडीने या प्रकरणात आतापर्यंत ४,३०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यापूर्वी, जानेवारीमध्ये, ईडीने महादेव ऑनलाइन बुक आणि स्कायएक्सचेंजशी संबंधित अवैध सट्टेबाजी नेटवर्क विरोधात मोठी कारवाई केली होती.

Bank Holiday April 2026: अरे देवा! एप्रिलमध्येच बँकांची दिवाळी घडणार, ‘इतक्या’ दिवसांची सुट्टी; सामान्यांचे होणार हाल

या कारवाईचा एक भाग म्हणून, ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) ९१.८२ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. या कारवाईत दुबईस्थित दोन कंपन्यांच्या खात्यांमधील ७४.२८ कोटी रुपयांहून अधिक बँक ठेवी जप्त करण्याचाही समावेश होता. परफेक्ट प्लॅन इन्व्हेस्टमेंट एलएलसी आणि एक्झिम जनरल ट्रेडिंगचा यात समावेश होता. संबधित आरोपीने जुगाराचा पैसा कायदेशीर म्हणून दाखवलयाचे उघड झाले आहे.

कारवाईसंदर्भात ईडीने म्हटले आहे की, सौरभ चंद्रकर, अनिल कुमार अग्रवाल आणि विकास छपरिया यांच्याशी संबंधित असलेल्या महादेव ॲप आणि स्कायएक्सचेंज कंपन्यांचा वापर अवैध जुगारातून कमावलेला पैसा वैध करण्यासाठी केला जात होता. इतकेच नाही, तर ईडीने गगन गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेली १७.५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. गगन गुप्ता हे स्कायएक्सचेंजचे मालक हरी शंकर तिब्रेवाल यांच्या जवळचे असल्याचे म्हटले जाते. ईडीच्या म्हणण्यानुसार, या महागड्या मालमत्ता आणि तरल संपत्ती अवैध मार्गाने मिळालेल्या पैशातून खरेदी करण्यात आल्या होत्या.

Bank Of Baroda UPI Overdraft: ग्रामीण महिलांना मोठा दिलासा; Bank of Baroda कडून नवीन सुविधा सुरू, जाणून घ्या सविस्तर..

ईडीच्या तपासात असे उघड झाले आहे की, महादेव ऑनलाइन बुक आणि स्कायएक्सचेंज यांसारख्या अनेक अवैध सट्टेबाजी ॲप आणि वेबसाइट्सच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा काळा पैसा निर्माण झाला होता. महादेव ऑनलाइन बुक ॲप ग्राहकांना विविध अवैध सट्टेबाजी ॲप पर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार हाताळण्यासाठी तयार करण्यात आले होते. तपास यंत्रणेनुसार, या वेबसाइट्स आणि ॲप मध्ये जाणीवपूर्वक फेरफार करण्यात आला होता, जेणेकरून ग्राहकांचे अंतिम नुकसान होईल. व्यक्तींकडून कोट्यवधी रुपये गोळा केले जात होते आणि एका निश्चित वाट्याच्या सूत्रानुसार या पैशांचे वाटप केले जात होते.

Web Title: Ed takes action in mahadev app scam seizes assets worth a staggering amountincluding a villa in the burj khalifa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Enforcement Directorate
  • Mahadev Betting App

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.