Bank Holiday April 2026: अरे देवा! एप्रिलमध्येच बँकांची दिवाळी घडणार, 'इतक्या' दिवसांची सुट्टी; सामान्यांचे होणार हाल (फोटो क्रेडिट- AI)
Bank Holiday April 2026: आर्थिक वर्ष २०२६ च्या एप्रिल महिन्यात सण, सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त आणि नियमित आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमुळे देशभरातील बँका अनेक दिवस बंद राहणार आहे. मात्र, ऑनलाइन व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी त्यांच्या बँकिंग व्यवहारांचे नियोजन करण्याआधी ही बातमी सविस्तर वाचा.
एप्रिल महिन्याची सुरुवातच बँक सुट्टीने होते. १ एप्रिल हा आर्थिक वर्षाच्या अखेरचा दिवस असल्याने बहुतांश बँका बंद असतात. या दिवशी बँका वार्षिक लेखापरीक्षण आणि खात्यांची पूर्तता करतात, त्यामुळे शाखांमध्ये व्यवहार होत नाहीत. याशिवाय, एप्रिल महिन्यात विविध सणांमुळेही अनेक दिवस सुट्ट्या असणार आहेत. २ एप्रिलला मौंडी निमित्त कोची, तिरुवनंतपुरम शहरातील बँका बंद राहतील. तसेच, ३ एप्रिलला गुड फ्रायडे असल्याने बहुतेक शहरांमध्ये देखील बँका बंद राहतील.
१४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बैसाखी आणि तमिळ नववर्षामुळे देशातील अनेक भागांत बँका बंद राहतील. १५ एप्रिलला बंगाली नववर्ष, बोहाग बिहू, विशू आणि हिमाचल दिनानिमित्त निवडक शहरांमध्ये देखील सुट्टी असेल. १६ एप्रिलला गुवाहाटीत बोहाग बिहूची सुट्टी असेल. तसेच, २० एप्रिल रोजी बसव जयंती आणि अक्षय तृतीया असल्याने बंगळूरू आणि काही शहरात सुट्टी असेल. २१ एप्रिलला गारिया पूजा निमित्त बँका बंद राहतील.
Ram Navami च्या दिवशी सोनंचांदीचे भाव कडाडले, किती महागला 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅमचा दर
याशिवाय, नियमित साप्ताहिक सुट्ट्यांमुळेही बँका बंद राहतील. ५, १२, १९, २६ एप्रिलला रविवार असल्याने सुट्टी राहील आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी अनुक्रमे ११ एप्रिल आणि २५ एप्रिलला सुट्टी असेल. या सर्व सुट्ट्यांमुळे एप्रिल महिन्यात बँक शाखांचे कामकाज अनेक दिवस ठप्प राहणार आहे. मात्र, ग्राहकांना दिलासा देणारी बाब म्हणजे इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि UPI सेवा सुरू राहतील, त्यामुळे पैसे ट्रान्सफर, बिल भरणे यांसारखे व्यवहार सहज करता येतील.
सुट्ट्यांचा विचार करून ग्राहकांनी बँकेतील कामे जसे की चेक जमा करणे, रोख रक्कम काढणे किंवा इतर महत्त्वाची बँकिंग कामे सुट्ट्यांचे नियोजन करून करावी जेणेकरून शेवटच्या क्षणी होणारी गैरसोय टाळता येईल.






