Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांना मोठा दिलासा! ED चा क्लोजर रिपोर्ट मंजूर, मनी लाँड्रिंग प्रकरणाला पूर्णविराम

Hasan Mushrif : मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट मुंबईतील विशेष PMLA न्यायालयाने स्वीकारला आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 05, 2026 | 09:43 PM
hasan mushrif

hasan mushrif

Follow Us
Follow Us:
  • हसन मुश्रीफांना न्यायालयाकडून मोठा दिलासा
  • ED चा क्लोजर रिपोर्ट मंजूर
  • मूळ गुन्हेच रद्द झाल्याने PMLA कारवाई संपुष्टात
 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांविरोधात सुरू असलेला ईडीचा तपास आता अधिकृतपणे बंद झाला आहे. मुंबईतील विशेष PMLA न्यायालयाने ईडीचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारल्याने 2022 पासून सुरू असलेल्या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे.

मूळ गुन्हाच रद्द झाल्याने ईडीची कारवाई बंद

विशेष PMLA न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी या प्रकरणावर निर्णय दिला. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी मूळ गुन्हा अस्तित्वात असणं आवश्यक आहे. मात्र, या प्रकरणातील मूळ तक्रारी आणि एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच रद्द केले आहेत. त्यामुळे PMLA अंतर्गत पुढील कारवाई सुरू ठेवता येणार नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. न्यायालयाने 4 एप्रिल 2022 रोजी दाखल केलेला ECIR रद्द करत प्रकरणातील कागदपत्रे ईडीकडे परत करण्याचे निर्देशही दिले.

Kolhapur Gokul Politics : गोकुळच्या वादात रोहित पवारांची उडी! ‘फडणवीसांचा इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड?’

नेमकं प्रकरण काय होतं?

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांवरून ईडीने हसन मुश्रीफ, त्यांच्या मुलांची चौकशी सुरू केली होती. 2013-14 या आर्थिक वर्षात कोलकात्यातील कथित शेल कंपन्यांच्या माध्यमातून 11.35 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळवल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला होता. या तपासादरम्यान जुलै 2024 मध्ये ईडीने 2.07 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आणि 7.70 लाख रुपयांची रोकड जप्त केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रकरणाला कलाटणी

हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाईविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. जून 2025 मध्ये न्यायालयाने मुरगूड पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द केला. त्यानंतर कंपनी कायद्यातील तरतुदींच्या आधारे दाखल केलेली तक्रारही 6 नोव्हेंबर 2025 रोजी रद्द करण्यात आली.

दोन्ही मूळ प्रकरणे रद्द झाल्यानंतर ईडीने स्वतः क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. आता विशेष न्यायालयानेही तो स्वीकारला आहे. या निर्णयामुळे हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Kolhapur Golkul Politics : गोकुळच्या सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंची एन्ट्री! सतेज पाटलांना फोन करत दिला पाठिंबा

💡

Frequently Asked Questions

  • Que: हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरण बंद झालं का?

    Ans: होय. मुंबईतील विशेष PMLA न्यायालयाने ईडीचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारल्याने हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांविरोधातील संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरण बंद करण्यात आलं आहे.

  • Que: हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने कोणते आरोप केले होते?

    Ans: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला कोलकात्यातील कथित शेल कंपन्यांच्या माध्यमातून 11.35 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाल्याचा आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप ईडीने केला होता.

  • Que: न्यायालयाने ईडीचा क्लोजर रिपोर्ट का स्वीकारला?

    Ans: या प्रकरणातील मूळ गुन्हे मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले होते. त्यामुळे PMLA अंतर्गत कारवाई सुरू ठेवण्याचा आधार उरला नसल्याचं विशेष न्यायालयाने नमूद केलं.

Web Title: Hasan mushrif pmla case closed ed closure report mumbai court vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 09:41 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • Enforcement Directorate
  • Hasan Mushrif

संबंधित बातम्या

Kolhapur Gokul Politics : वोट चोरीनंतर आता सत्ता चोरी; गोकुळवरून सतेज पाटलांचा सरकारवर घणाघात
1

Kolhapur Gokul Politics : वोट चोरीनंतर आता सत्ता चोरी; गोकुळवरून सतेज पाटलांचा सरकारवर घणाघात

Kolhapur News : ‘जनता कधीही माफ करणार नाही…’ गोकुळच्या सत्तासंघर्षावरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांना थेट इशारा
2

Kolhapur News : ‘जनता कधीही माफ करणार नाही…’ गोकुळच्या सत्तासंघर्षावरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांना थेट इशारा

Dia Mirza Controversy : हायकोर्टाने फटकारल्यानंतर अमित साटम यांची पहिली प्रतिक्रिया, ‘आमचा विरोध कायम राहणार’ म्हणत घेतली भूमिका
3

Dia Mirza Controversy : हायकोर्टाने फटकारल्यानंतर अमित साटम यांची पहिली प्रतिक्रिया, ‘आमचा विरोध कायम राहणार’ म्हणत घेतली भूमिका

Dia Mirza Controversy : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून भाजप नेत्यांना हायकोर्टाचा दणका! मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
4

Dia Mirza Controversy : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून भाजप नेत्यांना हायकोर्टाचा दणका! मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.