Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंतवणूकदारांना मिळणार लार्ज-कॅप शेअर्समध्ये अधिक रिटर्न? Edelweiss च्या Altiva SIF ने लाँच केला नवा लाँग-शॉर्ट फंड

Edelweiss Mutual Fund Altiva SIF : Edelweiss Mutual Fund च्या 'अल्टिव्हा एसआयएफ'ने नवीन 'अल्टिव्हा इक्विटी लाँग-शॉर्ट फंड' लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा मुक्त-कालावधीचा लार्ज-कॅप-केंद्रित फंड १० सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान NFO साठी खुला असणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 10, 2026 | 04:57 PM
Edelweiss च्या Altiva SIF ने लाँच केला नवा लाँग-शॉर्ट फंड

Edelweiss च्या Altiva SIF ने लाँच केला नवा लाँग-शॉर्ट फंड

Follow Us
Follow Us:
  • गुंतवणूकदारांना मिळणार लार्ज-कॅप शेअर्समध्ये अधिक रिटर्न?
  • Edelweiss च्या Altiva SIF ने लाँच केला नवा लाँग-शॉर्ट फंड
  • ३ ते ५ वर्षांच्या गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय
Edelweiss Mutual Fund Altiva SIF : Altiva SIF या Edelweiss Mutual Fund (Edelweiss MF / EMF / EAMC) च्या प्लॅटफॉर्मने आज Altiva Equity Long-Short Fund लॉन्च करण्याची घोषणा केली. हा एक मुक्त-कालावधीचा (open-ended) Equity Long-Short गुंतवणूक पर्याय असून, सूचीबद्ध इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवली वृद्धी साधण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. नवीन फंड ऑफर (NFO) 10 सप्टेंबर 2026 रोजी सुरू होऊन 24 सप्टेंबर 2026 रोजी बंद होईल. किमान अर्जाची रक्कम ₹10 लाख आहे. ( Edelweiss Mutual Fund Altiva SIF ) 

आता पेमेंट फेल नाही होणार… NPCI ने लाँच केला eNACHLite; जाणून घ्या कसं काम करते?

Altiva हा सर्वात मोठ्या SIF प्लॅटफॉर्मपैकी एक

लॉन्चच्या प्रसंगी Radhika Gupta, MD & CEO, Edelweiss Mutual Fund म्हणाल्या, “Altiva SIF ला गुंतवणूकदार आणि भागीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि प्लॅटफॉर्मवर ठेवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत आमच्या पहिल्या दोन फंडांनी ₹11,000 कोटींचा AUM पार केला आहे. त्यामुळे Altiva हा सर्वात मोठ्या SIF प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणून उदयास आला आहे. ग्राहकांचा विश्वास आणि गुंतवणूकदारांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करून हा प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे.

हा दृष्टिकोन Large Cap+ क्षेत्रापर्यंत

आमच्या यापूर्वीच्या रणनीतींमध्ये Altiva Hybrid Long Short Fund आणि Altiva Equity Ex Top 100 Long Short Fund यांचा समावेश आहे. या दोन्ही रणनीती अनुक्रमे Arbitrage+ आणि Mid Cap+ मधील विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या. Altiva Equity Long-Short Fund च्या या नवीन लॉन्चसह, आम्ही आता हा दृष्टिकोन Large Cap+ क्षेत्रापर्यंत नेत आहोत. लार्ज-कॅप-केंद्रित मुख्य पोर्टफोलिओवर डेरिव्हेटिव्ह्जमधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या माध्यमातून लार्ज-कॅप समभागांमधील अस्थिर अल्फाच्या आव्हानावर उपाय शोधण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

विविध बाजार चक्रांमध्ये अतिरिक्त रिटर्न

Altiva Equity Long-Short Fund हा Large Cap+ रणनीती म्हणून सादर करण्यात आला आहे. यात लार्ज-कॅप-केंद्रित इक्विटी पोर्टफोलिओसोबत उत्पन्न-केंद्रित डेरिव्हेटिव्ह्जचा अतिरिक्त स्तर जोडण्यात आला आहे. विविध बाजार चक्रांमध्ये अतिरिक्त परतावा मिळण्याची संभाव्यता ठेवत गुंतवणूकदारांना बाजारातील सहभागाची संधी देण्याचे या रणनीतीचे उद्दिष्ट आहे. या गुंतवणूक रणनीतीमध्ये दीर्घकालीन बाजार भांडवलाच्या आधारे अंदाजे 80% वाटप लार्ज-कॅप समभागांमध्ये आणि 20% वाटप मिड- आणि स्मॉल-कॅप समभागांमध्ये असेल.

ही गुंतवणूक रणनीती Nifty 100 TRI ला बेंचमार्क

कव्हर्ड कॉल्स, स्ट्रॅडल्स आणि स्ट्रॅंगल्स यांसारख्या डेरिव्हेटिव्ह रणनीतींसह इतर परवानगी असलेल्या रणनीतींचा वापर करून परताव्याचा अतिरिक्त स्रोत मिळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. डेरिव्हेटिव्ह्जचा हा अतिरिक्त स्तर निश्चित किंवा नियमित उत्पन्नाची हमी देत नाही आणि त्यातून मिळणारे योगदान त्या वेळच्या बाजार परिस्थितीवर अवलंबून असेल. ही गुंतवणूक रणनीती Nifty 100 TRI ला बेंचमार्क मानते. इक्विटी पोर्टफोलिओचे व्यवस्थापन Bharat Lahoti आणि Bhavesh Jain करतील, तर Amit Vora हे Overseas Fund Manager म्हणून काम पाहतील.

कमी कालावधीची गुंतवणूक अपेक्षित

हा फंड कोअर इक्विटी गुंतवणूक, पारंपरिक लार्ज-कॅप गुंतवणुकीपेक्षा अधिक परतावा मिळण्याची संभाव्यता आणि तीन ते पाच वर्षांचा गुंतवणूक कालावधी अपेक्षित असलेल्या गुंतवणूकदारांसाठी योग्य ठरू शकतो. मात्र, शुद्ध इंडेक्स-ट्रॅकिंग गुंतवणूक, अल्पकालीन परतावा किंवा तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीची गुंतवणूक अपेक्षित असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड योग्य ठरणार नाही.

या रणनीतीमध्ये दररोज गुंतवणूक करण्याची आणि गुंतवणूक काढून घेण्याची सुविधा उपलब्ध असेल. हा फंड Direct आणि Regular Plans अंतर्गत उपलब्ध असेल आणि त्यामध्ये Growth आणि IDCW पर्याय असतील. वाटपाच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत किंवा 90 व्या दिवशी युनिट्सची विक्री किंवा एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्गीकरण केल्यास 0.50% exit load लागू होईल. त्यानंतर कोणताही exit load लागू होणार नाही. ज्या विद्यमान Altiva SIF गुंतवणूकदारांनी लागू असलेली ₹10 लाखांची किमान गुंतवणूक मर्यादा आधीच पूर्ण केली आहे, ते अंतिम ऑफर दस्तऐवजांमध्ये नमूद केलेल्या अटींच्या अधीन राहून ₹1,000 आणि त्यानंतर ₹1 च्या पटीत गुंतवणूक करू शकतात.

Success Story : शाळेत नापास, 30 इंटर्व्ह्यूमध्ये रिजेक्शन… तरीही बनला अब्जाधीश! Jack Ma कसे बनले अलिबाबाचे बॉस?

Web Title: Edelweiss mutual fund altiva sif launches equity long short fund nfo details marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Mutual Fund
  • share market

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजारात पुन्हा घसरणीचे संकेत! कोणते स्टॉक्स ठरणार महत्त्वाचे? पाहा संपूर्ण यादी
1

Share Market Today: शेअर बाजारात पुन्हा घसरणीचे संकेत! कोणते स्टॉक्स ठरणार महत्त्वाचे? पाहा संपूर्ण यादी

Nokia Strategic Partnership : Nokia चा भारतात मोठा गेमप्लॅन! AI बाबत तगडी रणनीती; 5 वर्षांच्या मेगा कराराची घोषणा
2

Nokia Strategic Partnership : Nokia चा भारतात मोठा गेमप्लॅन! AI बाबत तगडी रणनीती; 5 वर्षांच्या मेगा कराराची घोषणा

Share Market Today: शेअर बाजारात घसरणीचे संकेत; या कंपन्यांचे शेअर्स चर्चेत, गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांनी दिला हा सल्ला
3

Share Market Today: शेअर बाजारात घसरणीचे संकेत; या कंपन्यांचे शेअर्स चर्चेत, गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

Share Market Outlook : शेअर बाजारात पुढच्या आठवड्यात मोठी हालचाल? गुंतवणूकदारांनो, गुंतवणुकीपूर्वी ‘या’ फॅक्टर्सकडे लक्ष ठेवा
4

Share Market Outlook : शेअर बाजारात पुढच्या आठवड्यात मोठी हालचाल? गुंतवणूकदारांनो, गुंतवणुकीपूर्वी ‘या’ फॅक्टर्सकडे लक्ष ठेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.