Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nokia Strategic Partnership : Nokia चा भारतात मोठा गेमप्लॅन! AI बाबत तगडी रणनीती; 5 वर्षांच्या मेगा कराराची घोषणा

Nokia Strategic Partnership : जागतिक नेटवर्क आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी Nokia ने भारतीय बाजारात आपला विस्तार वाढवण्यासाठी एका प्रमुख तंत्रज्ञान कंपनीसोबत पुढील ५ वर्षांसाठी महत्त्वपूर्ण करार केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 26, 2026 | 12:25 PM
Nokia चा भारतात मोठा गेमप्लॅन! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Nokia चा भारतात मोठा गेमप्लॅन! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Nokia चा भारतात मोठा गेमप्लॅन!
  • AI बाबत तगडी रणनीती
  • 5 वर्षांच्या मेगा कराराची घोषणा
Nokia Strategic Partnership : नोकिया भारतातील नावाजलेली कंपनी. एक काळ होता जेव्हा भारतात प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीकडे पहिला फोन हा नोकियाचा होता. पण त्यानंतर परिस्थिती बदलली स्पर्धा वाढली. आता मात्र बाजारात बरीच स्पर्धा आहे. याच स्पर्धेला दोन हात करण्यासाठी नोकिया वेगळ्या अंदाजात परतत आहे. आता AI च्या मदतीने मोठा मास्टरप्लॅन आखायचं प्रयोजन आहे. नेमका काय आहे हा प्लॅन आणि नोकिया काय मोठी रणनीती आखत आहे? सगळं सविस्तर जाणून घेऊयात. ( Nokia Strategic Partnership ) 

Share Market Today: शेअर बाजारात घसरणीचे संकेत; या कंपन्यांचे शेअर्स चर्चेत, गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस LTTS, जी एल अँड टी ची उपकंपनी आहे, तिने भारतातील इंजीनियरिंग आणि आरएंडडी एक्टिविटीज कार्यांमध्ये सहकार्य करण्यासाठी नोकियासोबत पाच वर्षांचा करार केला आहे. एल अँड टीने यावेळी स्पष्ट म्हटलं आहे की, या भागीदारीमुळे एलटीटीएसची अभियांत्रिकी क्षमता आणि नोकियाचे टेलीकम्युनिकेशन टेक्नोलॉजीचे कार्य एकत्र येणार आहे.

या करारानुसार, LTTS उत्पादन अभियांत्रिकी, सॉफ्टवेअर विकास, सिस्टम इंटिग्रेशन आणि प्रोडक्ट सपोर्ट यांसारख्या क्षेत्रांमध्ये नोकियाच्या संशोधन व विकास कार्यक्रमांना पाठिंबा देईल. या बातमीमुळे LTTS च्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.

शेअरवर नेमका काय परिणाम?

नोकियासोबत भागीदारीची घोषणा केल्यानंतर LTTS च्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे. या शेअरने ₹४,००० चा टप्पा ओलांडला आहे. सकाळी १० वाजता, BSE वर हा शेअर ₹४,०४१.८० वर ट्रेड करत होता, जो ₹१३१.५० किंवा ३.३६ टक्क्यांनी वाढला आहे. शुक्रवारी, हा शेअर ₹३,९१० वर बंद झाला होता. त्यामुळे या निर्णयाचा शेअर मार्कटवर तरी फार चांगला परिणाम दिसून येत आहे.

ऑफशोअर डेव्हलपमेंट सेंटरची स्थापना

या भागीदारीअंतर्गत, LTTS नोकियाच्या इंजीनियरिंग आणि R&D इनिशिएटिव्स (R&D) उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी भारतात एक डेडिकेटेड ‘ऑफशोर डेवलपमेंट सेंटर’ स्थापन करणार आहे. हे LTTS च्या “लक्ष्य ३१” धोरणाशी आणि कंपनीच्या नेक्स्ट-जनरेशन कम्प्युट व एआय इन्फ्रास्ट्रक्चरवरील फोकस सारखा असेल.
LTTS जगभरातील नोकियाच्या तंत्रज्ञान केंद्रांना पाठिंबा देण्यासाठी भारतात एक समर्पित अभियांत्रिकी टीम देखील स्थापन करेल. यामध्ये ५जी नेटवर्क्स, इंटेलिजेंट ऑटोमेशन, एआय-सक्षम ऑपरेशन्स आणि एआय इन्फ्रास्ट्रक्चर यांसारख्या क्षेत्रांचा समावेश असणार आहे.

नोकियासाठी भारत एक प्रमुख नवोन्मेष केंद्र

LTTS इंटीग्रेटेड ऑपरेटिंग मॉडलद्वारे नोकियाच्या ग्लोबल R&D संघांसोबत जवळून काम करणार आहे. या सहकार्यामध्ये संशोधन आणि विकास, उत्पादन अभियांत्रिकी, नवीन उत्पादन विकास, एम्बेडेड सिस्टीम्स, सॉफ्टवेअर विकास, सिस्टीम इंटिग्रेशन आणि निरंतर सहाय्य यांचा समावेश असेल.

विवेक जयस्वाल नेमकं काय म्हणाले?

नोकियाचे अभियांत्रिकी विभागाचे सीनियर वाइस प्रेसिडेंट विवेक जयस्वाल यांच्या मते, AI पायाभूत सुविधांमधील अग्रणी म्हणून नोकियाची संशोधन आणि विकासामधील निरंतर गुंतवणूक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यांनी पुढे सांगितले की, भारत नोकियासाठी एक प्रमुख नवोन्मेष केंद्र आहे आणि LTTS एक मौल्यवान भागीदार म्हणून पाहिलं जात आहे.

( Desclaimer : शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या.)

India vs China : सणासुदीच्या काळात चीनचा कट उधळला! भारतीय बाजारात स्वस्त माल खपवणाऱ्या चिनी कंपन्यांना चाबूक; केंद्राचा मोठा

💡

Frequently Asked Questions

  • Que: नोकियाने भारतात नक्की काय रणनीती आखली आहे?

    Ans: नोकियाने पुढील ५ वर्षांसाठी एका दिग्गज तंत्रज्ञान कंपनीसोबत भागीदारी केली असून, याद्वारे AI आणि प्रगत नेटवर्क सोल्यूशन्सच्या मदतीने भारतातील डिजिटल व टेलिकॉम सेवा सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

  • Que: एआय तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाईल?

    Ans: नेटवर्क ऑटोमेशन, ५जी/६जी तंत्रज्ञानाची क्षमता वाढवणे, डेटा प्रोसेसिंग जलद करणे आणि टेलिकॉम ऑपरेटर व उद्योगांना एआय-आधारित स्मार्ट सोल्यूशन्स पुरवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होईल.

  • Que: भारतीय ग्राहकांना काय फायदा होईल?

    Ans: या करारामुळे देशात अधिक जलद, विश्वासार्ह आणि स्मार्ट नेटवर्क सेवा मिळतील, तसेच IoTआणि एआय-सक्षम उपकरणांचा वापर सुलभ होईल.

Web Title: Ltts nokia 5 year partnership ai strategy india marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • ai
  • nokia
  • share market

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजारात घसरणीचे संकेत; या कंपन्यांचे शेअर्स चर्चेत, गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांनी दिला हा सल्ला
1

Share Market Today: शेअर बाजारात घसरणीचे संकेत; या कंपन्यांचे शेअर्स चर्चेत, गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

Share Market Outlook : शेअर बाजारात पुढच्या आठवड्यात मोठी हालचाल? गुंतवणूकदारांनो, गुंतवणुकीपूर्वी ‘या’ फॅक्टर्सकडे लक्ष ठेवा
2

Share Market Outlook : शेअर बाजारात पुढच्या आठवड्यात मोठी हालचाल? गुंतवणूकदारांनो, गुंतवणुकीपूर्वी ‘या’ फॅक्टर्सकडे लक्ष ठेवा

Viral Video: जन्मताच नवजात बाळाला चक्क मिशी अन् हनुवटीवर…! आई-बाबा म्हणाले…; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले
3

Viral Video: जन्मताच नवजात बाळाला चक्क मिशी अन् हनुवटीवर…! आई-बाबा म्हणाले…; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

AI in Education: जर मुलांना एआयसोबत ‘ही’ १० मानवी मूल्ये शिकवली नाहीत, तर त्यांची अवस्था…
4

AI in Education: जर मुलांना एआयसोबत ‘ही’ १० मानवी मूल्ये शिकवली नाहीत, तर त्यांची अवस्था…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.