Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Snack Market: ईमामी अ‍ॅग्रोटेकचे स्नॅकिंग क्षेत्रात दमदार पदार्पण; WeMe ब्रँडसाठी 750 कोटींची गुंतवणूक

India Snack Market: ईमामी अ‍ॅग्रोटेक लिमिटेडने 'WeMe' या नव्या स्नॅकिंग ब्रँडसह भारताच्या पॅकेज्ड स्नॅकिंग बाजारात प्रवेश केला आहे. कंपनी पुढील 5 ते 7 वर्षांत 750 कोटी रुपयांची गुंतवणूक करून WeMe ला 1,000 कोटी रुपयांचा ब्रँड बनवण्याचे लक्ष्य ठेवत असून, यामुळे सुमारे 4,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार..

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 06, 2026 | 06:37 PM
ईमामी अ‍ॅग्रोटेकचे स्नॅकिंग क्षेत्रात दमदार पदार्पण; WeMe ब्रँडसाठी 750 कोटींची गुंतवणूक

ईमामी अ‍ॅग्रोटेकचे स्नॅकिंग क्षेत्रात दमदार पदार्पण; WeMe ब्रँडसाठी 750 कोटींची गुंतवणूक

Follow Us
Follow Us:
  • येत्या 5-7 वर्षांमध्ये रु 1000 कोटीचा स्नॅकिंग ब्रँड बनण्याचा संकल्प
  • 4000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराची संधी
  • क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल-फर्स्ट एंट्री
ईमामी अ‍ॅग्रोटेक लिमिटेड (ईएएल), रु. 30,000 कोटिच्या ईमामी ग्रूपचा एक ब्रँडेड फूड्स व्यवसाय आहे. ह्या संसेथेने आज WeMe सादर करुन, भारताच्या वेगवान पॅकेज्ड स्नॅकिंग बाजारामध्ये आपल्या रणनीतिपूर्ण प्रवेशाची घोषणा केली आहे. WeMe चॉको हेजलनट स्प्रेड, झुरी आलू भाजा, पोटेटो चिप्स या तीन उत्पादनांच्या श्रेणींसह बाजारात प्रवेश करीत आहे. या नव्या उपक्रमासाठी कंपनी पुढील 5 ते 7 वर्षांत सुमारे 750 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, WeMe ला 1,000 कोटी रुपयांचा स्नॅकिंग ब्रँड बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

तीन उत्पादनांसह बाजारात प्रवेश

WeMe ब्रँडची सुरुवात तीन उत्पादन श्रेणींसह करण्यात आली आहे. यामध्ये WeMe Choco Hazelnut Spread, Jhuri Aloo Bhaja, Potato Chips याचा समावेश असणार आहे.

Ganesh Murti Price Hike: यंदा ‘गणपती बाप्पा’ महागणार! वाहतूक, रंग आणि मजुरी वाढल्याने मूर्ती महागल्या

या उत्पादनांद्वारे कंपनी आधुनिक भारतीय ग्राहक, विशेषतः Gen Z आणि Millennials यांना लक्षात घेऊन स्नॅकिंग क्षेत्रात आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे.

डिजिटल-फर्स्ट आणि क्विक-कॉमर्सवर भर

कंपनीने WeMe ची डिजिटल-फर्स्ट रणनीती स्वीकारली असून, सुरुवातीला क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला जाणार आहे. ग्राहकांच्या अभिप्रायाच्या आधारे नवीन उत्पादने जलद विकसित करून बाजारातील बदलत्या ट्रेंडनुसार ब्रँड विकसित करण्याची कंपनीची योजना आहे.

4,000 रोजगार निर्मिती

ईमामी ग्रुपचे संचालक आदित्य वर्धन अग्रवाल यांनी सांगितले की, WeMe प्रकल्पामुळे 1,000 प्रत्यक्ष आणि 3,000 अप्रत्यक्ष, असे एकूण 4,000 रोजगार निर्माण होतील. कंपनीचे उद्दिष्ट केवळ स्नॅकिंग व्यवसाय वाढवणे नसून, भारतातील व्यापक फूड कंपनी म्हणून स्वतःची ओळख अधिक मजबूत करणे आहे.

बदलत्या ग्राहकांच्या सवयींवर लक्ष

ईमामी ग्रुपचे संचालक मनीष गोयंका यांनी सांगितले की, भारतीय ग्राहकांमध्ये चवदार, सोयीस्कर आणि दर्जेदार स्नॅक्सची मागणी सातत्याने वाढत आहे. WeMe हा ब्रँड या बदलत्या गरजांची पूर्तता करेल आणि भविष्यात विविध स्नॅकिंग श्रेणींमध्ये नवीन उत्पादने सादर केली जातील.

नव्या पिढीच्या अपेक्षांनुसार ब्रँड

ईमामी ग्रुपच्या संचालिका विदुला अग्रवाल यांनी सांगितले की, आजची तरुण पिढी केवळ उत्पादन खरेदी करत नाही, तर डिजिटल कंटेंट, क्रिएटर्स आणि कम्युनिटीच्या माध्यमातून उत्पादनाची माहिती घेते. त्यामुळे WeMe ला कंटेंट, कॉमर्स आणि ग्राहक अनुभव यांचा संगम असलेला डिजिटल-फर्स्ट ब्रँड म्हणून विकसित करण्यात आले आहे. कंपनीच्या मते, WeMe हा केवळ स्नॅकिंग ब्रँड न राहता ग्राहकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवण्याचे उद्दिष्ट आहे. भविष्यात नवीन उत्पादनांची भर घालत भारताच्या वाढत्या स्नॅकिंग बाजारपेठेत आपले मजबूत स्थान निर्माण करण्याचा कंपनीचा मानस आहे.

आशीर्वादने आणला भारताचा अस्सल प्रोटीन पर्याय; वाळूत भाजलेल्या चणा सत्तूचा हेल्दी इनोव्हेशन,10 रुपयांत मिळणार 10 ग्रॅम प्रोटीन

Web Title: Emami agrotech launches weme snacking brand to invest rs 750 crore create 4000 jobs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 06:37 PM

Topics:  

  • Business News
  • india
  • Market

संबंधित बातम्या

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती
1

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती

Indus Towers चा मोठा सामाजिक उपक्रम! FY26 मध्ये 3.38 कोटी लोकांना फायदा; एकूण लाभार्थ्यांची संख्या 9 कोटींवर
2

Indus Towers चा मोठा सामाजिक उपक्रम! FY26 मध्ये 3.38 कोटी लोकांना फायदा; एकूण लाभार्थ्यांची संख्या 9 कोटींवर

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ
3

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ
4

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.