Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

EPF Claim : तुमच्याशी थेट वरिष्ठ अधिकारी बोलणार… PF चे पैसे अडकलेत, क्लेम रिजेक्ट झालाय? मग 28 तारखेला या ठिकाणी होईल काम

EPF Claim Status Update : नोकरदार वर्गाचा PF चा क्लेम अडकला असेल, पेन्शन मिळण्यात अडचण येत असेल किंवा KYC ची समस्या असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO २८ सप्टेंबर रोजी देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये 'निधी आपके निकट २.०' या विशेष जनसंवाद उपक्रमाचे आयोजन करत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 26, 2026 | 07:15 PM
PF चे पैसे अडकलेत, क्लेम रिजेक्ट झालाय? ( सौजन्य - ChatGPT )

PF चे पैसे अडकलेत, क्लेम रिजेक्ट झालाय? ( सौजन्य - ChatGPT )

Follow Us
Follow Us:
  • तुमच्याशी थेट वरिष्ठ अधिकारी बोलणार…
  • PF चे पैसे अडकलेत, क्लेम रिजेक्ट झालाय?
  • मग 28 तारखेला इथे होईल काम
EPF Claim Status Update : नोकरदार वर्गाचा सगळ्यात मोठा भाग म्हणजे PF. हा क्लेम अडकला असेल आणि पेन्शन मिळण्यात अडचण येत असेल आणि तुम्ही प्रयत्न करुनही तुमचं काम होत नसेल तर काळजी करु नका. आता तुमचं हे अडकलेलं काम झटपट होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ‘निधी आपके पास २.०’ या उपक्रमांतर्गत २८ सप्टेंबर रोजी एका शिबिराचे आयोजन करत आहे. या शिबिराचा नोकरदारांना कसा फायदा होणार आणि याचा लाभ मिळवण्यासाठी काय करायला हवं? ( EPF Claim Status Update ) 

Kerala Onam Bumper Result 2026 : एका रात्रीत चमकले नशीब! केरळ लॉटरीच्या इतिहासातील मोठा जॅकपॉट! 30 कोटींचे पहिलं बक्षीस कोणाला?

तुमच्या शंकांचं त्वरित होणार निराकरण

या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आपल्या सदस्यांची प्रलंबित PF संबंधित प्रकरणे आणि शंकांचे त्वरित निराकरण करणे, हा यामागील उद्देश आहे. EPFO ​​ने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘निधी आपके पास २.०’ या उपक्रमाबद्दल माहिती दिली आहे. तसेच, संस्थेच्या योजना, लाभ आणि सेवांविषयी माहिती देण्यासाठी EPFO ​​२८ सप्टेंबर रोजी एका शिबिराचे आयोजन करणार असल्याचेही त्यात नमूद केले आहे.

‘निधी आपके पास २.०’ शिबिराला भेट द्या

या उपक्रमाचा उद्देश EPFO ​​च्या सेवा सदस्यांच्या अधिक जवळ आणणे हा आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या प्रलंबित PF संबंधित प्रकरणांसाठी केवळ ऑनलाइन प्रक्रियेवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्या पोस्टमध्ये, EPFO ने लिहिले आहे, “EPFO च्या योजना आणि लाभांबद्दल जाणून घेण्यासाठी, अधिकाऱ्यांकडून सेवा आणि प्रक्रिया समजून घेण्यासाठी, आणि आपल्या तक्रारींचे तात्काळ निराकरण मिळवण्यासाठी, २८ सप्टेंबर २०२६ रोजी ‘निधी आपके पास २.०’ शिबिराला भेट द्या.”

अधिकारी ऐकणार तक्रारी

EPFO ने दिलेल्या माहितीनुसार, या शिबिरात तुम्हाला अधिकाऱ्यांशी थेट तुमच्या समस्यांवर चर्चा करता येणार आहे. त्यामुळे, जर तुमचे कोणतेही काम ऑनलाइन पूर्ण होत नसेल किंवा एखाद्या विशिष्ट परिस्थितीमुळे अडकले असेल, तर तुम्ही तुमच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडू शकता. ज्यामुळे तुमच्या समस्या लवकरात लवकर सोडवले जाऊ शकतील.

‘निधी आपके पास २.०’ अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांचे वैशिष्ट्य हे आहे की, येथे केवळ तक्रारी ऐकूनच घेतल्या जाणार नाहीत, तर त्यांच्या तात्काळ तुमच्या समस्येचं निराकरणही केलं जाईल. त्यामुळे, तुमची एखादी तक्रार प्रलंबित असल्यास किंवा तुम्हाला एखाद्या सेवेमध्ये समस्या येत असल्यास, तुम्ही शिबिरातील संबंधित अधिकाऱ्याकडे तुम्ही ती मांडू शकता. त्यामुळे जर तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी नक्की या दिवशी भेट द्या.

Digital Payments ला मोठा फटका! दुकानदारांनी घेतला निर्णय, 2 ऑक्टोबरला चालणार नाही UPI; काळ्या कपड्याने झाकणार QR कोड

Web Title: Epf nidhi aapke nikat camp on 28th september meet officers for pf claim issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • epf
  • EPFO
  • EPFO Pension

संबंधित बातम्या

PF Withdrawal: PF काढण्यापूर्वी EPFO मध्ये ‘या’ 6 गोष्टी तपासा; छोटी चूकही अडकवू शकते तुमचे पैसे, कसं ते जाणून घ्या
1

PF Withdrawal: PF काढण्यापूर्वी EPFO मध्ये ‘या’ 6 गोष्टी तपासा; छोटी चूकही अडकवू शकते तुमचे पैसे, कसं ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.