Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PF खात्यात किती पैसे जमा आहेत? घरबसल्या मोबाईलवर मिळवा एका क्लिकमध्ये माहिती

घराच्या दुरुस्ती किंवा नूतनीकरणासाठी महागडं पर्सनल लोन घेण्याऐवजी कर्मचारी आपल्या PF खात्यातील जमा रकमेचा वापर करू शकतात. यासाठी नोकरीची 5 वर्षे पूर्ण असणे आवश्यक असून स्वतःच्या किंवा जोडीदाराच्या नावावरील घराच्या दुरुस्तीसाठी EPFO च्या Form 31 द्वारे PF अॅडव्हान्सचा क्लेम करता येतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 09, 2026 | 01:33 PM
PF (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

PF (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

महागाचं पर्सनल लोन घेण्याऐवजी नोकरीतील 5 वर्ष पूर्ण झालेले कर्मचारी स्वतःच्या किंवा जोडीदाराच्या नावावरील घराच्या दुरुस्तीसाठी PF खात्यातून ‘फॉर्म 31’ भरून पैसे काढू शकतात. आपल्या खात्यात नेमकी किती रक्कम जमा आहे, हे तपासण्यासाठी फक्त एक मिस्ड कॉल किंवा अधिकृत उमंग अॅपचा वापर करून तुम्ही थेट स्टेटस पाहू शकता.

सणासुदीच्या किंवा नवीन वर्षाच्या काळात अनेकांना आपल्या घराचं नूतनीकरण किंवा दुरुस्ती करण्याची इच्छा असते. मात्र, ऐनवेळी पैशांची चणचण भासल्यास पर्सनल लोन घेण्याऐवजी तुमच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील जमा पुंजी हा एक उत्तम आणि स्वस्त पर्याय ठरू शकतो.

कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या काळात घराच्या दुरुस्तीसाठी पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम काढण्याची अधिकृत परवानगी मिळते. यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही. तुमच्या मोबाईलवर फक्त 5 मिनिटांत पीएफ बॅलन्स कसा तपासायचा आणि रिनोव्हेशनसाठी पैसे काढण्याचे नियम काय आहेत, याचा हा सविस्तर गाईड. PF

कुठेही न जाता, 5 मिनिटांत मोबाईलवर PF बॅलन्स तपासण्याच्या 3 सोप्या पद्धती

1. फक्त एक मिस्ड कॉल देऊन

तुम्हाला इंटरनेट न वापरता अवघ्या काही सेकंदांत बॅलन्स तपासायचा असेल, तर ईपीएफओच्या अधिकृत नंबरवर मिस्ड कॉल द्या.
तुमच्या पीएफ खात्याशी नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबरवरून 9966044425 या नंबरवर कॉल करा.
दोन रिंगनंतर कॉल आपोआप कट होईल आणि पुढील 2 मिनिटांत तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल. ज्यामध्ये तुमचा यूएएन नंबर, शेवटचं योगदान आणि खात्यातील एकूण जमा रक्कम स्पष्ट दिसेल.

तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवरून 7738299899 या नंबरवर EPFOHO UAN LAN (LAN म्हणजे तुमची भाषा, जसे मराठीसाठी MAR किंवा इंग्रजीसाठी ENG) असा मेसेज पाठवा.
उदा. जर तुम्हाला मराठीत माहिती हवी असेल, तर EPFOHO UAN MAR लिहून पाठवा. काही वेळातच बॅलन्सचा मेसेज येईल.

Oppo Reno 17 स्मार्टफोनचा लूक आला समोर; कॅमेरा मॉड्यूलसह दिसणार ‘ग्लोइंग कॅट’ डिझाईन, चाहते थक्क

3. UMANG अॅप किंवा अधिकृत ई-पासबुक पोर्टल

केंद्र सरकारच्या अधिकृत UMANG App वर जाऊन ईपीएफओ सेवा निवडा. तुमचा यूएएन नंबर टाका आणि मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉगिन करा. ‘View Passbook’ वर क्लिक करून तुम्ही जमा झालेली एकूण रक्कम पाहू शकता. याशिवाय अधिकृत EPFO Member Passbook Portal ला थेट भेट देऊनही पासबुक डाऊनलोड करता येते.

फॉर्म 31 म्हणजे काय?

बऱ्याच लोकांना वाटतं PF चे पैसे फक्त निवृत्तीनंतरच मिळतात. पण तसं नाहीये. सरकारने काही खास कारणांसाठी आधीच पैसे काढायची सोय करून दिलीये. त्यातलाच एक म्हणजे घराची दुरुस्ती.जर तुमची नोकरी 5 वर्ष पूर्ण झाली असेल, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या किंवा तुमच्या बायको / नवऱ्याच्या नावावर असलेल्या घराच्या दुरुस्तीसाठी पैसे काढू शकता. घराला रंग लावणे, छत गळत असेल तर ते ठीक करणे, टॉयलेट-बाथरूमचं काम, किंवा घरात नवीन खोलीचं काम… अशा कामांसाठी हा पैसा वापरता येतो.

किती पैसे काढता येतात?

यात एक नियम आहे. तुम्ही तुमच्या PF खात्यातून किती पैसे काढू शकता, हे तुमच्या जमा रकमेवर ठरतं. साधारणपणे कर्मचारी आणि कंपनीने मिळून जमा केलेली रक्कम आणि त्यावरचं व्याज, यातून काही भाग तुम्हाला मिळतो. हा पैसा परत भरावा लागत नाही. म्हणजे हे लोन नाहीये, तुमचेच पैसे आहेत.

क्लेम कसा करायचा?

सगळं काम ऑनलाईन होतं. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही.आधी unifiedportal-mem.epfindia.gov.in या वेबसाईटवर जा. तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. नंतर Online Services मध्ये जा आणि Claim (Form-31, 19, 10C) हा पर्याय निवडा. तिथे तुमचा बँक अकाउंट नंबर टाकून व्हेरिफाय करा. नंतर “I Want To Apply For” मध्ये PF Advance (Form 31) निवडा. कारणामध्ये “Repair of House” निवडा. किती रक्कम हवीये ते टाका आणि सबमिट करा.

आता थेट 3 वर्षे रिचार्जची नो चिंता! Jio च्या नव्या प्लॅनने सर्वांनाच केल चकित, किंमत पाहून उडतील होश

तुमचा क्लेम कंपनीकडे जातो, कंपनीने मान्यता दिली की 7 ते 10 दिवसात पैसे तुमच्या बँक खात्यात येतात.एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवाPF चा पैसा हा तुमच्या म्हातारपणासाठी आहे. त्यामुळे गरज नसेल तर तो काढू नका. पण घराची खरंच गरज असेल आणि बँकेचं 14-16% व्याजाचं पर्सनल लोन घेण्यापेक्षा स्वतःच्याच PF मधून पैसे काढणं कधीही चांगलं.घराचं नूतनीकरण करताना कोणत्याही खाजगी बँकेकडून महागडं कर्ज घेण्याऐवजी, वरील अधिकृत मार्गांचा वापर करून आपला बॅलन्स तपासा आणि ईपीएफओच्या ई-सेवा पोर्टलवर ‘Form 31’ ऑनलाईन भरून रिनोव्हेशनसाठी पैशांचा क्लेम करा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मोबाईलवरून PF बॅलन्स कसा तपासता येतो?

    Ans: मिस्ड कॉल, SMS, UMANG अॅप किंवा EPFO ई-पासबुक पोर्टलद्वारे PF बॅलन्स तपासता येतो.

  • Que: मिस्ड कॉल देऊन PF बॅलन्स तपासण्यासाठी कोणता नंबर आहे?

    Ans: तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 9966044425 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा.

  • Que: SMS द्वारे PF बॅलन्स कसा तपासावा?

    Ans: 7738299899 या नंबरवर EPFOHO UAN MAR असा SMS पाठवून मराठीमध्ये PF बॅलन्सची माहिती मिळवता येते.

Web Title: How to check pf balance and withdraw pf for home renovation form 31 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • EPFO
  • Marathi News
  • PF
  • PF withdrawal

संबंधित बातम्या

Refrigerator Not Cooling? फ्रिज बिघडलाय की फक्त सेटिंग चुकलीय? मेकॅनिकला बोलावण्याआधी करा हे 5 चेक
1

Refrigerator Not Cooling? फ्रिज बिघडलाय की फक्त सेटिंग चुकलीय? मेकॅनिकला बोलावण्याआधी करा हे 5 चेक

Cost of Studying Abroad: विदेशात शिक्षण किती महाग? बीए सारख्या सामान्य पदवीसाठीही मोजावे लागतात लाखो रुपये!
2

Cost of Studying Abroad: विदेशात शिक्षण किती महाग? बीए सारख्या सामान्य पदवीसाठीही मोजावे लागतात लाखो रुपये!

NTA Observer Recruitment 2026: शिक्षक आणि प्राध्यापकांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये मोठी संधी; ६ डिसेंबरपर्यंत करा
3

NTA Observer Recruitment 2026: शिक्षक आणि प्राध्यापकांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये मोठी संधी; ६ डिसेंबरपर्यंत करा

US Midterm Elections :डेमोक्रॅट्सचा ऐतिहासिक विजय ट्रम्प यांच्या जिव्हारी;रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का पराभवाचे खापर इतरांवर फोडले
4

US Midterm Elections :डेमोक्रॅट्सचा ऐतिहासिक विजय ट्रम्प यांच्या जिव्हारी;रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का पराभवाचे खापर इतरांवर फोडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.